दिवाळी हा सण कुटुंब, मित्रांसोबत मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. फराळाचे आयोज केले जाते, पार्ट्या देखिल दिल्या जातात. घरी नातेवाइकांचे आगमन होते. सर्व तयारी करताना थकवा जाणवने हे स्वाभाविक आहे. मिठाई आणि इतर चमचमीत पदार्थांच्या सेवनाने वजन वाढण्याची देखिल शक्यता असते. सणासुदीमुळे घरी लगबग असल्याने झोपेवर देखिल परिणाम होतो. पुरेशी झोप न घेतल्यासही आरोग्यावर परिणाम होऊ शकते. या पार्श्वभूमीवर आज आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत जे दिवाळीदरम्यान तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करतील.

१) बिंज ड्रिंकिंग करू नका

This is what happens when you chew cloves everyday
रोज एक-दोन लवंग चघळल्या तर शरीरावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उत्तर…
Is Beetroot Really Vegetable Viagra How Eating Beet Helps For Sex Drive
बीट हे भाजीच्या रूपातील Viagra आहे का? सेक्स लाइफशिवाय बीट खाल्ल्याने काय फायदा होऊ शकतो?
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Money Mantra, insurance, tax saving, investments
Money Mantra: कर बचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीत विम्याचे काही चांगले पर्याय आहेत का?

सणासुदीच्या दिवसांमध्ये अनेक लोक मद्यपान करतात. परंतु, बिंज ड्रिंकिंगमुळे तुमच्या आरोग्याला नुकसान होऊ शकते. एकावेळी ५ किंवा त्यापेक्षा अधिक ड्रिंक्सच्या सेवनाला बिंज ड्रिंकिंग म्हटले जाते. त्यामुळे, मद्यपान करण्यापूर्वी नेहमी काहीतरी खाण्याचा सल्ला दिला जातो. दिवसभरात भरपूर पाणी प्यायले पाहिजे.

२) खाण्यात संतुलन ठेवा

मिष्ठाणाशिवाय दिवाळी अपुरीच आहे. मात्र, एकावेळी तुम्ही किती गोड पदार्थ खाता याकडे लक्ष देण्याची गरज आहे. योग्य प्रमाणात खाल्ल्यास तुमचे आरोग्य चांगले राहू शकते. अधिक प्रमाणात मिठाईचे सेवन करू नका. जास्त आणि मर्यादित खाणे यात संतुलन साधा.

३) भरपूर पाणी प्या

शरिरात पाण्याची कमतरता होऊ नये यासाठी भरपूर पाणी प्या. पाणी हे कॅलरी घालवण्यात मदत करते, तसेच त्याच्या सेवनाने भूकही कमी लागते. म्हणून दिवसातून ३ लिटर पाणी पिण्याचा सल्ला आहार तज्ज्ञांकडून दिला जातो.

४) व्यायाम करा

निरोगी आहार आणि योग्य व्यायाम दिनचर्या वजन नियंत्रणात ठेवण्यात मदत करू शकते. यासाठी दिवसातून २० ते ३० मिनिटे व्यायाम केला पाहिजे.

५) पौष्टिक पदार्थांचे सेवन

सणासुदीच्या काळात आहारात प्रथिने, कार्बोहायड्रेट आणि पोषक तत्व असलेल्या पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे. या काळात मिठाईचे आणि इतर पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणात होते आणि अशा काळात आरोग्यावर लक्ष देणे शक्य होत नाही. त्यामुळे, वजन वाढू शकते. वजन कमी करण्यासाठी नाश्त्यामध्ये फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करा. त्याचबरोबर, तुम्ही किती कॅलरीचे सेवन करत आहात याची देखील नोंद घ्या.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)