पूर्ण दिवस काम केल्यानंतर चांगली झोप घेणे हे अत्यंत आवश्यक असते. चांगली झोप घेतल्याने फक्त शारीरिक विकासच होत नाही, तर मानसिक विकासासाठीही झोप खूप आवश्यक आहे. मात्र, झोपण्याची पद्धत योग्य नसेल तर चांगली झोप लागत नाही. अशावेळी कोणत्या स्थितीत झोपल्याने आपल्याला योग्य झोप लागणार नाही हे जाणून घेतले पाहिजे. आज आपण, एखाद्या व्यक्तीची झोपण्याची मुद्रा कशी असावी, हे जाणून घेणार आहोत.
तुम्ही कोणत्या स्थितीत झोपता?
१ – एखादी व्यक्ती जर त्याच्या पाठीवर झोपत असेल आणि त्याचे हात तो डोक्यावर ठेवून झोपू शकतो, तर या स्थितीला स्टारफिश पोझिशन असे म्हणतात. या स्थितीत झोपल्याने ऍसिड रिफ्लक्स कमी होण्यास मदत होते, तसेच पाठीचा कणा आणि मानेच्या आरोग्यास देखील आराम मिळतो.
तुम्हालाही छातीच्या उजव्या बाजूला वेदना जाणवतात का? यामागे असू शकते ‘हे’ कारण
२ – तुमच्या पाठीवर झोपा आणि तुमचे हात तुमच्या दोन्ही बाजूला ठेवा. या स्थितीला ‘सैनिक मुद्रा’ म्हणतात. या स्थितीत झोपल्याने मणक्याचे आरोग्य सुधारते आणि मानदुखी आणि पाठदुखी टाळता येते.
३ – तुम्ही तुमचे दोन्ही हात सरळ रेषेत खाली ठेऊन झोपू शकता. याला ‘लॉग’ मुद्रा म्हणतात. या आसनात झोपल्याने मणक्याचे आणि पाठीचे आरोग्य चांगले राहते.
४ – तुम्ही तुमचे दोन्ही गुडघे वाकवून आणि छातीवर ठेवून झोपू शकता. या स्थितीला गर्भ किंवा गर्भाची स्थिती म्हणतात. या स्थितीत झोपल्याने घोरण्याची समस्या कमी होते आणि गर्भवती महिलांसाठी ही स्थिती चांगली आहे.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)