मासिक पाळीदरम्यान प्रत्येक महिला मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जात असते. परंतु ओटोपोटी होणारी वेदना अत्यंत त्रासदायक असते. अशावेळी बहुतेक महिला पेनकिलरची मदत घेतात. परंतु त्यांच्या सेवनामुळे भविष्यात शारीरिक नुकसान होऊ शकते. मात्र, काही घरगुती उपचार करून आपण या त्रासापासून मुक्ती मिळवू शकतो. मासिक पाळीच्यावेळी होणारा त्रास कमी करण्यासाठी सूर्यफुलाच्या बियाही अत्यंत गुणकारी ठरतात.

प्रत्येक फुलाला त्याचा खास रंग, वास, आकार असतो. त्याचप्रमाणे त्या फुलाचं वैशिष्ट्य आणि महत्त्वदेखील वेगवेगळं असतं. पिवळ्या रंगाचं मोठं टपोरं फुललेलं सूर्यफूल अनेकांचं लक्ष वेधून घेत असतं. खरं तर सूर्यफूलाचे असंख्य फायदे आहेत. मात्र आपण त्या पासून अनभिज्ञ आहोत.

साधारणपणे सूर्यफूलांच्या बियांपासून तेल काढण्यात येते हा एकच उपयोग आपल्याला माहित आहे. मात्र या बियाचे अनेक फायदे आहेत. या बियांमध्ये व्हिटॅमिन-ई, कॅल्शिअम, खनिजे असतात. त्यामुळे या बिया खाण्याचे अत्यंत महत्त्वाचे आणि गुणकारी फायदे आहेत. त्यामुळे या बिया खाण्याचे नेमके फायदे कोणते ते जाणून घेऊया.

नवविवाहित जोडप्यांना लग्नाचं गिफ्ट म्हणून ‘हे’ राज्य देणार कंडोम किट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • भाजलेल्या किंवा खारवलेल्या सूर्यफूलाच्या बिया शरीरासाठी फायदेशीर आहेत. त्यामुळे सकाळच्या नाश्त्याच्या वेळी या बिया खाणं फायदेशीर ठरेल.
  • सूर्यफुलांच्या बियांमध्ये व्हिटॅमिन-ई मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे केसांसाठी ते फायदेशीर ठरतं.
  • या बिया प्रचंड पौष्टिक असतात. त्यामुळे त्या खाव्यात. यांचा वापर आपण सलाडमध्येदेखील करु शकतो.
  • सूर्यफुलांच्या बियामध्ये कॅल्शिअमही असते. त्यामुळे या बियांचं सेवन केल्यास शरीरातील कॅल्शिअमची कमतरता भरून निघते.
  • सूर्यफुलाच्या बिया खाल्लाने मासिक पाळीच्या वेळी होणारी चिडचिड, मूड स्विंग, पोटदुखी यासारखे त्रास कमी होतात.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)