जर तुम्ही गोड खाण्याचे शौकीन असाल आणि सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सतत काही ना काही गोड खात असाल, तर तुमची ही इच्छा तुमच्या शरीरात काही कमतरता असल्याचे संकेत देत आहे. गोड खाण्याच्या या सवयीला साखरेची लालसा (शुगर क्रेव्हिंग) म्हणतात. यामुळे एखाद्या व्यक्तीला कोणत्याही वेळी गोड खाण्याची इच्छा होते. जास्त साखर खाल्ल्याने लठ्ठपणा, मधुमेह, रक्तदाब आणि नैराश्य यासारख्या समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत गोड खाण्याची लालसा शरीरातील कोणत्या कमतरतेकडे इशारा करत आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे.

  • ग्लुकोजची पातळी कमी होणे

लठ्ठपणा कमी करण्याच्या नादात अनेक लोक उपाशी राहून कडक उपवास करतात. त्यामुळे त्यांच्या शरीराला पूर्ण पोषक तत्व मिळत नाहीत. जेव्हा शरीरातील ग्लुकोजची पातळी खालावते तेव्हा तुम्हाला चॉकलेट किंवा मिठाई खावीशी वाटते.

जिममध्ये न जाताही इलॉन मस्क यांनी कमी केलं तब्बल नऊ किलो वजन; काय आहे यामागचं रहस्य? जाणून घ्या

  • तणाव संप्रेरक

जेव्हा शरीर तणावाखाली असते तेव्हा शरीरात कॉर्टिसॉल आणि अ‍ॅड्रेनालाईन हार्मोन्स अधिक प्रमाणात बनू लागतात. हे दोन्ही हार्मोन आपल्या शरीरात असंतुलन निर्माण करतात, ज्यामुळे रक्तदाब आणि इन्सुलिनची पातळी वाढते. इतकंच नाही तर यामुळे आपल्याला गोड खाण्याची इच्छाही होऊ लागते.

  • रक्तातील साखरेचे कमी झालेले प्रमाण

आपले शरीर हे एक प्रकारचे मशीन आहे आणि याला वेळोवेळी इंधनाची म्हणजेच अन्नाची आवश्यकता असते. जेव्हा आपण कार्बोहायड्रेटयुक्त अन्न खातो, तेव्हा आपली पचनसंस्था याला साखरेमध्ये रूपांतरित करते. ही साखर रक्ताद्वारे पेशींपर्यंत नेऊन तिचे ऊर्जेत रूपांतर होते. पण दीर्घकाळ उपाशी राहिल्यामुळे आपल्या पेशींना इंधनाची गरज भासते. अशा परिस्थितीत, आपल्याला अधिक कार्बोहायड्रेट्स घेणे आवश्यक असते आणि यामुळेच आपल्याला गोड खाण्याची तीव्र इच्छा होऊ लागते.

  • प्रथिनांची गरज

जेव्हा शरीराला प्रथिनांची गरज असते तेव्हा आपल्या गोड खाण्याची तीव्र इच्छा होते. यासाठी न्याहारी, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण इत्यादीमध्ये नैसर्गिक प्रथिन स्त्रोतांनी परिपूर्ण आहार घ्या. प्रथिनांमुळे लेप्टिन या संप्रेरकाची निर्मिती होते, ज्यामुळे वारंवार भूक लागणे आणि गोड खाण्याची तुमची लालसा कमी होते.

हृदयविकाराचा झटका टाळायचा आहे? तर ‘या’ वयापासूनच तपासायला सुरु करा रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी

  • पाण्याची कमतरता

शरीरात पाण्याची कमतरता असली तरी गोड खाण्याची इच्छा होते.

  • पुरेशी झोप न मिळणे

जे लोक रात्रभर जागे राहतात किंवा ज्यांना पुरेशी झोप मिळत नाही, त्यांच्या शरीरात उर्जेची कमतरता असते. तेव्हा त्यांना जंक फूड किंवा गोड पदार्थ खावेसे वाटतात. कमी झोपेमुळे आपल्या हार्मोन्सवर परिणाम होतो. त्यामुळे आपल्याला वारंवार भूक लागते आणि गोड खाण्याची तीव्र इच्छा होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)