100 gram Sesame Seeds Benefits: जानेवारी महिना सुरु झाला की घरोघरी तिळगुळाचा खमंग सुगंध दरवळू लागतो, साजूक तुपाच्या सुवासाने नवीन वर्षाची गोड सुरुवात होते असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. मेथीपासून ते डिंकापर्यंत अनेक प्रकारचे लाडू घरोघरी केले जातात पण या सगळ्यात तिळाच्या लाडूला कशाचीच तोड नाही. विशेषतः मकरसंक्रांतीच्या निमित्त तिळाचे लाडू, तिळाची पोळी, चिक्की, रेवडी असे विविध प्रकार केले जातात. तीळ हा भारतीय आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे. अगदी नान- रोटीपासून ते लाडूपर्यंत कित्येक रूपात तिळाचं सेवन भारतीय आवडीने करतात. शास्त्रीय भाषेत ‘सेसमम इंडिकम’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या, या लहान, तेल-समृद्ध बियांची लागवड प्रामुख्याने भारताच्या उत्तर भागात तेलासाठी केली जाते.

डॉ उषाकिरण सिसोदिया, नोंदणीकृत आहारतज्ज्ञ आणि क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट, नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मुंबई यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, “तिळाच्या बिया प्रथिने, निरोगी फॅट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजांच्या मुबलक उप्लब्धतेसह तीळ हे मॅक्रोन्यूट्रिएंट्सचा समृद्ध स्रोत आहेत.” अवघ्या १०० ग्रॅम तिळामध्ये असणारे पोषक सत्व आणि त्याच्या सेवनासंबंधित तथ्य आज आपण तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत.

homosexual Women
समलिंगी स्त्रियांना असतो अकाली मृत्यूचा धोका, पण नेमकं कारण काय? संशोधनातून धक्कादायक माहिती उघड!
What is Sleep Divorce
Sleep Divorce म्हणजे काय? जोडप्यांनी रात्री वेगळं झोपणं कितपत फायदेशीर?
Chaturgrahi Yog in meen rashi
Chaturgrahi Yog : १०० वर्षानंतर चतुर्ग्रही योग; ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा, होऊ शकतो मोठा धनलाभ
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?

सिसोदिया यांच्या माहितीनुसार, प्रति 100 ग्रॅम तिळाचे पोषण प्रोफाइल खालीलप्रमाणे:

  • कॅलरीज: अंदाजे 573 kcal
  • प्रथिने: सुमारे 18 ग्रॅम
  • चरबी: सुमारे 50 ग्रॅम
  • कर्बोदके: साधारण २३ ग्रॅम
  • फायबर: सुमारे 12 ग्रॅम
  • कॅल्शियम: अंदाजे 975 मिग्रॅ
  • मॅग्नेशियम: सुमारे 350 मिग्रॅ
  • फॉस्फरस: अंदाजे 638 मिग्रॅ

तिळाचे आरोग्यदायी फायदे

अँटिऑक्सिडंट्समध्ये समृद्ध: डॉ सिसोदिया यांनी सांगितल्याप्रमाणे, तिळाच्या बियांमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात, मुख्यतः तीळ आणि सेसमिन, आपल्याला ऑक्सिडेटिव्ह तणावाशी लढण्यास मदत करतात.

हृदयविकाराचा धोका कमी: तिळांमध्ये असंतृप्त चरबी (अनसॅच्युरेटेड फॅट्स) अधिक प्रमाणात असते. जी कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

हाडांच्या आरोग्यासाठी योगदान: कॅल्शियम आणि फॉस्फरसमुळे ते हाडांच्या आरोग्यासाठी देखील योगदान देतात.

मधुमेह असल्यास तिळाचे सेवन करणे सुरक्षित आहे का?

डॉ सिसोदिया यांच्या माहितीनुसार, तिळाच्या बियांमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स आणि निरोगी फॅट्स असतात, ज्यामुळे ते मधुमेह असलेल्या लोकांसाठी ठरतात. पण सावधगिरीचा उपाय म्हणून प्रत्येक वेळी मधुमेहींनी आहारात नवीन घटक समाविष्ट केल्यावर किंबहुना करतानाच त्यांच्या डॉक्टरांचा किंवा पोषणतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

गर्भवती महिलांसाठी तीळ फायदेशीर आहेत का?

तीळ हे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारख्या विविध पोषक तत्वांचा चांगला स्रोत असतात. हे घटक गर्भधारणेदरम्यान फायदेशीर ठरू शकतात, असे डॉ सिसोदिया म्हणाले. मात्र तिळांचा उष्मांक जास्त असल्याने या बियांचे कमी प्रमाणात सेवन करा. स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या जेणेकरून नुकसानाची शक्यता टाळता येणार नाही.

हे ही वाचा<< सकाळी चालावं की संध्याकाळी, तज्ज्ञांनी वाद सोडवला! तुमच्यासाठी कोणत्या वेळी, किती चालणं योग्य ठरेल पाहा

लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

डॉ सिसोदिया यांनी सांगितले की, तीळ खाण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

  • ऍलर्जी: काही लोकांना तीळाची ऍलर्जी असू शकते.
  • उष्मांक: तिळाचा उष्मांक जास्त असतो. किती प्रमाणात सेवन करता याकडे लक्ष द्या.
  • अतिसेवन: अतिसेवनामुळे पाचन समस्या उद्भवू शकतात. तसेच जास्त कॅलरीजमुळे वजन वाढू शकते.
  • तीळ लोहाचे चांगले स्त्रोत असले तरी, ते अॅनिमियाच्या उपचारांसाठी एकमेव उपाय नाहीत.
  • तिळात साखरेचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे मध्यम प्रमाणात सेवन केल्यास त्रास होण्याची शक्यता कमी असते.