Type 2 Diabetes Patients Tests : मधुमेह हल्ली एक सामान्य आजार बनत आहे. अगदी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत मधुमेहाची समस्या जाणवते. मधुमेहामध्ये शरीरातील ग्लुकोजच्या पातळीवर परिणाम होतो. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाणही वाढते. दरम्यान, मधुमेहाचे दोन प्रकार आहेत. टाइप १ आणि टाइप २. यातील टाइप १ मध्ये लक्षणे सहज दिसतात. पण, टाइप २ मधुमेहात लक्षणं सहसा दिसत नाही. यामुळे व्यक्तीला ह्रदयविकार आणि किडनीसंबंधित गंभीर समस्या निर्माण होईपर्यंत त्यांना मधुमेह आहे हे कळत नाही.

टाईप २ मधुमेहाला अनेकदा मूक महामारी असे संबोधले जाते, कारण बहुतेकांना ही समस्या असतानाही त्यांना ती माहीत नसते. अभ्यासातून असे दिसून येते की, टाइप २ मधुमेहाच्या रुग्णांपैकी ५० टक्के रुग्ण लक्षणे नसलेली असतात. म्हणजे रक्तातील साखरेची पातळी वाढलेली असतानाही त्यांना कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. यामुळे आरोग्याला मोठा धोका निर्माण होतो, कारण मधुमेहाशी निगडीत गंभीर समस्या टाळण्यासाठी लवकर निदान आणि व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. याच विषयावर इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना पुण्यातील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे एचओडी, सल्लागार डायबेटोलॉजिस्ट आणि जेरियाट्रिक मेडिसिन डॉ. अनु गायकवाड यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Blood Pressure drug
रक्तदाबाची औषधे मधेच बंद केल्याने तुम्हाला अधिक नुकसान होऊ शकते? काय सांगतात डाॅक्टर… 
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…
Counselling how to break up without revenge
समुपदेशन : नातं तोडायचंय? पण सूडाशिवाय…

डार्क चॉकलेटमुळे रक्तदाबाचा धोका होतो कमी? दररोज किती प्रमाणात सेवन करणे फायदेशीर? डॉक्टर म्हणाले…

लक्षणे नसलेल्या व्यक्तींना हृदयविकार किंवा किडनीसंबंधित समस्या निर्माण होईपर्यंत त्यांना मधुमेह आहे हे कळत नाही. त्यामुळे, वेळीच उपचार करण्यासाठी विविध चाचण्या करणे गरजेचे आहे.

ब्लड शुगर टेस्ट कधीस कोणी आणि केव्हा करावी?

अमेरिकन डायबिटीज असोसिएशनच्या (एडीए) शिफारसीनुसार, ज्या व्यक्तींना मधुमेह होण्याचा धोका जास्त आहे त्यांनी लवकरात लवकर ब्लड शूगर टेस्ट करणे गरजेचे आहे. यात मधुमेहाचा कौटुंबिक इतिहास, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींचा समावेश होतो. याव्यतिरिक्त आफ्रिकन, अमेरिकन, हिस्पॅनिक, नेटिव्ह अमेरिकन आणि आशियाई अमेरिकन यांसारख्या विशिष्ट वांशिक पार्श्वभूमीतील लोकांचा समावेश होतो. यांनाही टाइप २ मधुमेह होण्याची अधिक शक्यता असते.

मधुमेहाची कोणतीही स्पष्ट लक्षणे नसलेल्या, परंतु या उच्च-जोखीम श्रेणींमध्ये मोडणाऱ्या व्यक्तींनी वयाच्या ४० वर्षांच्या आसपास ब्लड शुगर टेस्ट केली पाहिजे.

टाइप २ मधुमेहींनी कोणत्या चाचण्या केल्या पाहिजेत?

रात्रभर उपाशी राहून तुम्ही शरीरातील ग्लुकोजच्या पातळीचे मोजमाप करण्यासाठी साध्या फास्टिंग ब्लड शुगर टेस्ट आहेत. यात आणखी एक प्रभावी चाचणी म्हणजे ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट (OGTT). यात दिवसभरात वेगवेगळ्या वेळी खाण्यापूर्वी आणि खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी मोजली जाते. जर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी पाणी प्यायल्यानंतर दोन तासांनी १४०-१९९ mg/dL असेल, तर तुम्ही प्रीडायबिटीस अवस्थेत आहात, तर २०० mg/dL पेक्षा जास्त रीडिंग असेल तर तुम्हाला मधुमेह आहे, असे सूचित होते.

हिमोग्लोबिन A1c (HbA1c) टेस्ट, जी कोणत्याही नियमित रक्तकार्याचा भाग म्हणून केली जाते. गेल्या काही महिन्यांतील शरीरातील सरासरी रक्तातील साखरेची पातळी यात मोजता येते. जर तुमची HbA1c पातळी ५.७ पेक्षा जास्त असेल, तर याचा अर्थ तुम्हाला डायबेटोलॉजिस्टचा सल्ला घ्यावा लागेल.

त्यानंतर रँडम ब्लड ग्लुकोज टेस्ट आहे, जी व्यक्तीने काही खाल्ले असो वा नसो याचा विचार न करता केली जाते. कोणत्याही वेळी रक्तातील ग्लुकोजची पातळी किती आहे हे यातून मोजता येते. यातून शरीरातील रक्तातील ग्लुकोजची पातळी कितीने वाढते याचा अंदाज येतो.

तुम्ही तुमच्या रक्तप्रवाहातील ऑटोअँटीबॉडीजदेखील तपासू शकता. हे असे अँटीबॉडीज आहेत, जे चुकून शरीराच्या स्वतःच्या ऊतींना किंवा अवयवांना लक्ष्य करतात आणि त्यांच्यावर हल्ला करतात.

लघवीत ग्लुकोजचे प्रमाण किती आहे हे शोधण्यासाठी एक साधी यूरिन टेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो.

परंतु, व्यक्तीच्या आरोग्यस्थितीनुसार टेस्ट करण्यासंदर्भातील शिफारसी बदलू शकतात. त्यामुळे ज्यांना मधुमेहाचा सर्वाधिक धोका आहे किंवा ज्यांना मधुमेहाचा कौटुंबिक इतिहास आहे, त्यांना ब्लड शूगर टेस्ट आधी सुरू करावी लागेल. परंतु, तुमच्या आरोग्यस्थितीनुसार योग्य मार्गदर्शनासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

वय आणि जोखीम घटकांव्यतिरिक्त ब्लड शूगर टेस्ट इतर कारणांसाठी करणेही आवश्यक आहे. यात वजन कमी होणे, वारंवार संसर्ग होणे आणि गर्भधारणेदरम्यान मधुमेहाची लक्षणे दिसणे, वाढलेली तहान अशी लक्षणे दिसत असल्यास ब्लड शूगर टेस्ट करा, कारण ही लक्षणे मधुमेहाचे सूचक संकेत असू शकतात. परंतु, यासाठीही डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या.