International Day of Happiness : आपण आरोग्याची काळजी घेण्यासाठी कित्येक गोष्टी करत असतो पण आपण आनंदी किंवा दुखी असताना आपण काय खातो याकडे लक्ष देतो का? नसेल तर आता तुम्हाला लक्ष द्यायला हवे. कारण आपल्या मानसिक स्थितीचा आणि आपण काय खातो यामध्ये खूप मोठा संबध आहे. आपल्यापैकी बरेच जण आपल्या मुडनुसार अन्नाचे सेवन करतो. जेव्हा एखादी व्यक्ती दुखी किंवा तणावग्रस्त असते तेव्हा मुड सुधारण्यासाठी आवडते पदार्थ खाते. याउलट जेव्हा व्यक्ती आनंदी असते तेव्हाही ती आवडते पदार्थ खाते. नुकत्याच एका संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे. या अहवालानुसार, ७२ टक्के भारतीयांनी कबूल केले आहे की, जेव्हा ते आनंदी असतात तेव्हा अधिक स्नॅक्स् खातात.

आंतरराष्ट्रीय आनंद दिनापूर्वी, आनंदाला अधिक प्राधान्य देण्याचे आवाहन करणारा गोदरेज यम्मीझचा इंडिया स्नॅकिंग अहवाल (खंड I) समोर आला आहे. `STTEM’ – सुरक्षितता, तंत्रज्ञान, चव, सुलभता आणि मूड सुधारणे या पाच घटकांवर भर देणाऱ्या या अहवालमध्ये, स्नॅक्स् खाण्यामुळे मुडमध्ये सुधारणा कशी होते यावर प्रकाश टाकला आहे.

स्नॅक्स् खाण्यामुळे मुडमध्ये होते सुधारणा

या अहवालानुसार, स्नॅक्स् खाण्याचा मुड सुधारण्यासोबत संबध आहे माननाऱ्यांपैकी, ७० टक्के भारतीय स्नॅक्स् खाल्ल्यानंतर समाधानी, आनंदी आणि उत्साही वाटतात. या संशोधनात भारतातील सर्व प्रदेशांचा तुलनात्मक अभ्यास केला आहे.

navi mumbai, hawkers, navi mumbai municipal corporation
नवी मुंबईत रस्त्यावरही फेरीवाल्यांचे बस्तान, महापालिका कारवाईबाबत उदासीन; नागरिकांना फेरीवाल्यांची दमदाटी
nagpur, Technical Fault, evm machine, Delays Polling by 1 Hour, jai mata school, dighori polling station, polling day, lok sabha 2024, election 2024, election news, polling news, ngpur news, marathi news,
नागपूर : ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड,’येथे’ मतदानाला एक तास उशिरा सुरुवात
Mumbai is to be developed as a single whole city Union Commerce and Industry Minister Piyush Goyal
मुंबई एकच, संपूर्ण शहराचा विकास करायचा आहे; केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल
Mumbai to Pune share cab fares
मुंबई ते पुणे, नाशिक आणि शिर्डी शेअर कॅबच्या भाड्यात वाढ होणार

आनंदी असताना पुर्व भारतातील नागरिता खातात जास्त स्नॅक्स्

हा अहवाल अधोरेखित करतो की, पूर्व भारतातील ७५ टक्के नागरिक आनंदी असताना जास्त स्नॅक्स् खातात करतात. उत्तर, पश्चिम आणि दक्षिण भारतीयांमध्ये अनुक्रमे ७२ टक्के, ६७ टक्के आणि ७४ टक्के भावनांच्या जवळपास समान पातळी दिसल्या. याबाबत शहर पातळीवरील अभ्यास निष्कर्षाला आणखी पुष्टी देतात.

World Oral Health Day 2023: आपल्या तोंडाशी संबंधित ‘या’ रंजक गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?

आनंदी असताना दिल्लीतील लोक खातात जास्त स्नॅक्स

या शहरांमध्ये, दिल्ली, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता येथील लोक आनंदी असताना जास्त स्नॅक्स् खातात. या यादीत दिल्ली ८१ टक्के, चेन्नई आणि हैदराबाद प्रत्येकी ७७ टक्के आणि कोलकाता ७५टक्क्यांसह या यादीत अव्वल स्थानावर आहे, ज्यामध्ये या शहरांतील स्थानिकांना स्नॅक्स् खाल्यानंतर मूड सुधारणा होत असल्याचे जाणवते. याशिवाय, मुंबईच्या सरासरी ६८ टक्के आणि अहमदाबादच्या सरासरी ६७ टक्के रहिवाशांनी आनंदी असताना स्नॅक्स् खातात. त्यापाठोपाठ पुणे आणि बेंगळुरू प्रत्येकी ६६ टक्के, लखनौ ६२टक्के आणि जयपूर ६१ टक्के आहेत.

पुरुषांपेक्षा महिला आंनदी असताना जास्त स्नॅक्स खातात

अहवालात समोर आलेला आणखी एक पैलू म्हणजे स्त्री-पुरुष दोघांमध्ये अन्न आणि मुड सुधारण्यामधील संबध. पुरुषांपेक्षा स्त्रिया आनंदी असताना जास्त स्नॅक्स् खातात. अहवालानुसार, आनंदी असताना ७४ टक्के स्त्रिया आणि ७० टक्के पुरुष जास्त स्नॅक्स् खातात.

या संशोधनाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), गोदरेज टायसन फूड्स लिमिटेडचे (GTFL), मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), अभय पारनेरकर म्हणाले, “इंडिया स्नॅकिंग रिपोर्ट हा स्नॅकिंग ट्रेंडचे विश्लेषण आणि अंदाज करण्यासाठी एक उपक्रम आहे. अहवाल स्पष्टपणे दर्शवितो की, स्नॅक खाण्यामुळे मूडमध्ये सुधारणा होते.

तुम्ही आनंदी असताना अधिक स्नॅक्स् खाता का? जर प्रश्नाचे उत्तर हो असेल तर तुम्हाला तुमच्या सवयीमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. कारण आंनदी असताना तुम्ही जास्त स्नॅक्स खात असाल तर त्याचा तुमच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या आंनदला प्रधान्य देऊन तुम्ही आवडते पदार्थ, स्नॅक्स खावे पण ते त्यांचे अतिसेवन करु नये.