आई होणे हा स्त्रीसाठी जगातील सर्वांत सुखद अनुभव असतो. प्रत्येक स्त्रीला लग्नानंतर आईपण अनुभवायचे असते. आई होणे ही स्त्रीसाठी खूप सुंदर भावना असली तरी तो अनुभव घेण्यापासून ते बाळ जन्माला आल्यानंतर अनेक स्त्रियांना विविध आरोग्य समस्या आणि आव्हानांना सामोरे जावे लागत असते. त्यात आजची बदलती जीवनशैली, आहाराच्या चुकीच्या सवयी यांमुळे बाळंतपणानंतर मातांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, दरवर्षी जगभरातील किमान ४० दशलक्ष मातांना बाळंतपणानंतर दीर्घकालीन आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची शक्यता ‘द लॅन्सेट ग्लोबल हेल्थ’मध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासातून वर्तवण्यात आली आहे.

या अभ्यासानुसार, दरवर्षी पहिल्यांदाच बाळाला जन्म देणाऱ्या १४० दशलक्ष नवीन मातांपैकी बहुतेकांना बाळाच्या जन्मानंतर सहा आठवड्यांत कोणतेही आजारपण जाणवत नाही. पण, काही मातांनी योनीमार्गे बाळाला जन्म दिला तरी त्यांना प्रसूतीनंतरच्या गंभीर आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते.

4 Essential Tests Every Woman Over 20 Should Do
हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी विसाव्या वर्षापासून प्रत्येक महिलेने कराव्यात ‘या’ चार चाचण्या; जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात… –
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
leopard trapped Surgana Taluka Avalpada,
आदिवासी महिलेच्या धैर्यामुळे मुलांची सुटका अन बिबट्या बंदिस्त
Bollywood actor Vicky Kaushal on Overcoming Anxiety
विकी कौशल एंग्झायटीचा कसा सामना करतो? जाणून घ्या, तज्ज्ञ याविषयी काय सांगतात?
Kishanganj Bihar
Kishanganj : बिहारच्या किशनगंजमध्ये गूढ आजाराने ३ मुलांचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक, गावात पसरलं घबराटीचं वातावरण
Why extreme heat can trigger headaches
अतिउष्णतेमुळे डोकेदुखी का होते? तज्ज्ञांनी सांगितले कारण अन् उपाय
Six hundred gram babys struggle to survive is finally successful
सहाशे ग्रॅम वजनाच्या बाळाचा जगण्याचा संघर्ष अखेर यशस्वी!
Health Special Diwali for mental health
Health Special : मानसिक स्वास्थ्यासाठी दिवाळी

मातेच्या आरोग्यावरील एका विशेष मालिकेचा भाग म्हणून या अभ्यासात प्रसूतीनंतर मातेची आरोग्यस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यात बाळाच्या जन्मानंतर माता काही महिने किंवा अनेक वर्षे कोणत्या आरोग्य समस्यांचा सामना करते यावर विस्तृत माहिती देण्यात आली आहे

अभ्यासानुसार. बाळाच्या जन्मानंतर पुन्हा लैंगिक संबंध ठेवताना वेदना (डिस्पेरेयुनिया) होणे. प्रसूतीनंतर एक-तृतीयांश (३५ टक्के)पेक्षा जास्त मातांना ही समस्या जाणवते. त्याशिवाय पाठदुखी (३२ टक्के), गुदद्वारासंबंधीची समस्या (१९ टक्के), मूत्रमार्गासंबंधित समस्या (८-३१ टक्के) यांनाही सामोरे जावे लागते. तसेच अनेक माता मानसिक समस्यांनाही तोंड देत असतात. त्यामध्ये चिंता (९-२४ टक्के), नैराश्य (११-१७ टक्के), पेरीनियल वेदना (११ टक्के), बाळंतपणाची भीती (टोकोफोबिया- ६-१५ टक्के) व दुय्यम वंध्यत्व (११ टक्के) या बाबींचा समावेश असतो.

या अभ्यासासंबंधीच्या लेखकांनी आपल्या निष्कर्षांच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य सेवाप्रणालीमध्ये प्रसूतीनंतर मातांच्या आरोग्यस्थितींवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे, असे अधोरेखित केले आहे. कारण- त्यापैकी अनेक महिलांमध्ये प्रसूतीपश्चात सेवांचा लाभ घेतल्यानंतरही अनेक समस्या विकसित होताना दिसत आहेत. त्यात गर्भधारणेदरम्यान आणि बाळंतपणानंतरही मातेची प्रभावी काळजी घेणे हादेखील एक महत्त्वपूर्ण प्रतिबंधात्मक घटक आहे, असेही ते म्हणाले. कारण यातून जोखीम शोधून बाळाच्या जन्मानंतरची गुंतागुंत टाळता येऊ शकते. परंतु, या परिस्थितीसंदर्भात अधिक चांगला आणि प्रभावी डाटा तातडीने गोळा केला जाणेही गरजेचे आहे.

सध्या उपलब्ध डेटामधून काही परिस्थितीत कमी मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये बाळंपणानंतर मातेला विविध आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे स्पष्ट होत आहे. पण, या देशांमधील हे प्रमाण किती आहे ते निश्चितपणे सांगता येत नाही, असेही या अहवालात म्हटले आहे.

या विषयावर पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमधील प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ सल्लागार डॉ. नीना मनसुखानी (अभ्यासाशी संबंधित नाहीत) यांनी सांगितले की, अपुरे पोषण, कुपोषण व अशक्तपणा हेदेखील यामागचे प्रमुख जोखीम घटक आहेत.

विश्रांतीशिवाय वारंवार प्रसूती होणे, शिवाय गर्भधारणेदरम्यान अपुरे पोषण यांमुळे बाळाच्या जन्मावेळची गुंतागुंत नसली तरीही गर्भधारणेदरम्यान प्रसरण आणि पेल्विक फ्लोअरमध्ये अडथळा येऊ शकतो. त्यात बाळाचा जन्म नॉर्मल झाला असला तरी या अडचणी जाणवू शकतात.

लैंगिक आणि पुनरुत्पादक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. पास्केल अॅलोटे यांनी म्हटले आहे की, प्रसूतीनंतरच्या अनेक परिस्थितींमुळे स्त्रियांना दैनंदिन जीवनात भावनिक आणि शारीरिक अशा दोन्ही रीतींनी खूप त्रास होत असतो. पण, हा त्रास काही वेळा कमी-अधिक प्रमाणात होतो; पण प्रत्यक्षात फार कमी वेळा त्याची नोंद घेतली जाते.

यावेळी अनेका मातांना त्यांच्या संपूर्ण आयुष्यात आणि मातृत्वाच्या पलीकडे एक स्त्री म्हणून त्यांच्या समस्या ऐकणाऱ्या आणि त्यांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या आरोग्य सेवांची गरज असते; जेणेकरून त्या केवळ बाळंतपणातच नाही तर इतर वेळीही चांगले आरोग्य आणि दर्जेदार जीवन उपभोगू शकतात, असेही लेखकांनी म्हटले आहे.

सामान्य योनीमार्गे बाळंतपण झाल्यानंतरही अनेक वर्षांनी काही वेळा मातांच्या जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो, असे सहमत देशातील अनेक प्रसूतीतज्ज्ञांनी नोंदवले आहे.

डॉ. मनसुखानी म्हणाले की, प्रसूतीनंतर वा दरम्यान गुंतागुंत असताना बाळाचा जन्म झाला आणि त्यानंतर मातेच्या आरोग्याची योग्य काळजी घेतली नाही, तर पेल्विक फ्लोअर स्नायूंच्या कार्यात अडथळा निर्माण होतो. पेल्विक फ्लोअरच्या स्नायूंचे कार्य बिघडल्यास मूत्रमार्गावर त्याचा परिणाम दिसून येतो.या परिणामास्तव रुग्ण जेव्हा खोकतो, शिंकतो किंवा कठोर क्रियाकलाप करतो तेव्हा त्याला पटकन लघवी होते. पेल्विक फ्लोअर स्नायूंचे कार्य अनियंत्रित झाल्यास गर्भाशय आणि योनीमार्गाचा भाग वाढू शकतो.

कोणत्याही अडचणीशिवाय ज्या महिलांची प्रसूती झाली त्यांनाही हल्ली अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे गर्भधारणेपूर्वी महिलेची आरोग्य स्थिती आणि गर्भधारणेदरम्यान तिची शारीरिक शक्ती आणि क्रियाकलाप किती व्यवस्थित आहे, यावर मातेची पुढील आरोग्य स्थिती अवलंबून असते, असते सांगितले जात आहे. जर एखाद्या मातेने प्रसूतीनंतर पेल्विक फ्लोअर स्नायूंवर उपचारांसाठी फिजिओथेरपीची मदत घेतली असेल, तर तिला या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही, असेही डॉ. मनसुखानी म्हणाल्या.

रुग्णालयांमध्ये जन्मानंतरच्या कोडीफाईड प्रोटोकॉलचा अभाव आणि शहरी-ग्रामीण विभाजनामुळे अनेक मातांचे प्रसूतीनंतरचे आरोग्य अधिक असुरक्षित बनत आहे. यावर पुण्यातील अंकुरा हॉस्पिटलमधील वंध्यत्व तज्ज्ञ डॉ. सुप्रिया पुराणिक म्हणाल्या की, भारतीय संदर्भात विचार करायचा झाल्यास, सामाजिक-आर्थिक विषमता, आरोग्य सेवेपर्यंत पोहोचण्यात अडचणी आणि सांस्कृतिक प्रभाव यांमुळे स्त्रियांच्या प्रसूतीनंतरच्या आरोग्यावर वेगवेगळ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतात. त्यामुळे देशभरात आरोग्य सेवांबाबत पायाभूत सुविधा, जागरूकता कार्यक्रम आणि धोरणात्मक उपक्रम यांचा विचार करणाऱ्या सर्वसमावेशक दृष्टिकोनाची गरज असल्याचे म्हटले आहे.

लॅन्सेट लेखकांनी प्रसूतीनंतर मातेच्या आरोग्यासंबंधित गोष्टींकडे होणाऱ्या दुर्लक्षावर खेद व्यक्त केला आहे. त्यासंदर्भात त्यांनी म्हटलेय की, प्रसूतीनंतरच्या गुंतागुंतीकडे नैदानिक ​​​​संशोधन, सराव व धोरणांमध्येही मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले गेले आहे. गेल्या १२ वर्षांच्या साहित्य पुनरावलोकनादरम्यान लेखकांनी त्यांच्या अभ्यासात विश्‍लेषित केलेल्या ३२ प्राधान्य परिस्थितींपैकी ४० टक्के प्रभावी उपचारांना समर्थन देणारी कोणतीही उच्च गुणवत्तेची मार्गदर्शक तत्त्वे यात आढळली नाहीत. तसेच प्रसूतीनंतर मातेच्या आरोग्याची काळजी घेण्यासंदर्भात कोणतेही मार्गदर्शक तत्त्व नव्हते किंवा कोणताही डेटा नव्हता, असे ते म्हणाले.