Avoid drinking water after these food: पाणी हे आपल्या शरीराचे अन्न आहे, जे आपले शरीर आतून स्वच्छ करण्यास मदत करते, शरीर हायड्रेटेड ठेवते आणि शरीराचे अवयव योग्यरित्या कार्य करतात. शरीर निरोगी ठेवण्यासाठी दररोज दीड ते दोन लिटर पाणी पिणे महत्त्वाचे आहे. ते पचन, पोषक तत्वांचे शोषण आणि एकूण शरीराच्या कार्यात मदत करते. ते चयापचय नियंत्रित करते, बद्धकोष्ठता प्रतिबंधित करते आणि दिवसभर ऊर्जेची पातळी राखते. पाणी आरोग्यासाठी आवश्यक आहे. साधारणपणे पाणी पिणं फायदेशीर मानलं जात असलं तरी, काही पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने पचन बिघडू शकते. काही पदार्थ जे नैसर्गिकरित्या पाण्यासारखे असतात, त्यात जास्त पोषक घटक असतात. ते पाण्यात मिसळल्यास पचनावर परिणाम होऊ शकतो.
लाइफ सायन्सेस जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने पाचक एन्झाइम कमकुवत होऊ शकतात आणि पचन मंदावते. आयुर्वेदाने जेवणानंतर किमान ३० मिनिटे वाट पाहण्याची शिफारस केली आहे. जेणेकरून पाचक शक्ती मजबूत राहील आणि पचन योग्य राहील. आता प्रश्न उद्भवतो की कोणते पदार्थ खाल्ल्यावर पाणी प्यावे आणि किंवा कोणते पाणी प्यावे तसंच कोणते नाही हे कसे ओळखावे. कोणते पदार्थ खाल्ल्यानंतर सेवन केल्यास आम्लता वाढते आणि आतड्यांचे आरोग्य बिघडते ते जाणून घेऊ…
टरबूज खाल्ल्यावर पाणी पिऊ नका
टरबूजमध्ये अंदाजे ९६ टक्के पाणी असते. जेवणानंतर लगेच जास्त पाणी प्यायल्याने पचनावर परिणाम होऊ शकतो. टरबूजमध्ये आधीच भरपूर पाणी असते, त्यामुळे खाल्ल्यानंतर जास्त पाणी प्यायल्याने पाचक रस पातळ होऊ शकतो, पचन मंदावते आणि पोटफुगी वाढते. टरबूज खाल्ल्यानंतर किंमान ४० ते ५० मिनिटे थांबून पाणी पिणे उत्तम.
केळं खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये
केळामध्ये पोटॅशियम, फायबर आणि नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते. केळी खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने मळमळ आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. केळी पचण्यासाठी पुरेसे पाचक एन्झाइम आणि आम्ल आवश्यक असते. केळी खाल्ल्यानंतर जर तुम्हाला पाणी प्यायचे असेल तर अर्धा तास थांबा.
लिंबूवर्गीय फळे
संत्री, लिंबू आणि द्राक्ष यासारख्या लिंबूवर्गीय फळांमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात. असं असताना खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने पचनावर परिणाम होऊ शकतो. लिंबूवर्गीय फळे पोटात आम्ल उत्पादन वाढवतात आणि पाणी प्यायल्याने हे संतुलन बिघडू शकते. त्यामुळे गॅस, पोटफुगी किंवा पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. लिंबूवर्गीय फळे खाल्ल्यानंतर किमान अर्धा तास पाणी पिणं टाळा.
शेंगदाण्यांसोबत पाणी पिऊ नका
शेंगदाण्यांत प्रथिने असतात आणि शरीराचे तापमान वाढवून चयापचय वाढवतात. शेंगदाणे खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने पचन मंदावते. प्रामुख्याने मुलांमध्ये. पाण्यामुळे पचन प्रक्रिया मंदावते. त्यामुळे पोटात जडपणा किंवा अस्वस्थता येऊ शकते. शेंगदाणे खाल्ल्यानंतर २० ते ३० मिनिटे पाणी पिऊ नका.
दुधासोबत पाणी पिऊ नका
दुधात कॅल्शियम, प्रथिने आणि आवश्यक जीवनसत्वे असतात. गरम दूध प्यायल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो. पाणी दुधाच्या पचनासाठी आवश्यक असलेले आम्ल आणि एन्झाइम पातळ करते, त्यामुळे चयापचय मंदावतो आणि पोटातील आम्लता वाढते. दूध प्यायल्यानंतर किमान ३० मिनिटे ते १ तास थांबा आणि मग पाणी प्या.
