Ayurvedic remedy for memory: सध्याच्या जीवनशैलीमध्ये आपल्या डोक्यात एकाच वेळी बरेच विचार सुरू असतात. घर, काम किंवा मित्र तसंच इतर गोष्टींबाबत सातत्याने विचार सुरूच असतात. २०२५मध्ये आपण कितीही टेक्नोसॅव्ही झालो तरी अनेकदा आपल्याला आयुर्वेदाचा आधार हा घ्यावाच लागतो. शिवाय आयुर्वेद हाच अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांवर एकमेव उपाय आहे. परदेशी वैद्यकीय प्रणाली प्रत्येक आजारावर उपचार करते, मात्र ५ हजार वर्षे जुन्या आयुर्वेदाला आव्हान देणे कठीण आहे. म्हणूनच इतका विकास होऊनही आयुर्वेद अजूनही विश्वासार्ह मानले जाते. आयुर्वेद प्रत्येक आजारावर उपचार करते आणि जेव्हा मेंदूंशी संबंधित समस्यांचा विचार केला जातो तेव्हा अधिक चांगली उपलब्धता देते.

आयुर्वेदात मेंदूच्या पोषणाबाबत जाणून घ्या…

आजच्या काळात मेंदू कमकुवत होणे, विसरणे आणि मानसिक थकवा यासारख्या समस्या सर्रास झाल्या आहेत. आयुर्वेदात सांगतात की, यावर दोन औषधांनी उपचार करता येतो. ही औषधं म्हणजे ब्राह्मी आणि शंखपुष्पी. ब्राह्मी आणि शंखपुष्पी हे मेंदूसाठी वरदान मानले जातात. दोन्हीही प्रत्येक समस्येवर उपायकारक आहेत. सर्वात आधी ब्राह्मीबद्दल जाणून घेऊ…

ब्राह्मी वनस्पतीला लहान पाने आणि लहान पांढरी फुले असतात. आपल्या देशातील पावसाळी राज्यांमध्ये या वनस्पतीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. आयुर्वेदात या वनस्पतीला बुद्धीची दाता मानले जाते.

शांतता मिळते

ब्राह्मीचं सेवन केल्याने स्मरणशक्ती वाढते आणि एकाग्रताही वाढते. याव्यतिरिक्त ही वनस्पती चिंता आणि तणाव कमी करते. कारण याच्या सेवनाने डोक्यातील नसा शांत राहतात आणि मेंदू अधिक कार्यक्षम होतो. ब्राह्मीमध्ये बॅकोसाइज असते, जे डोक्यातील नसांना मजबूत बनवतात. तसंच तणाव आणि चिंता कमी करण्यास मदत करतात.

शंखपुष्पीदेखील मेंदूसाठी वरदान आहे. आयुर्वेदात याला मेधावर्धक असे म्हटले जाते. म्हणजेच ते डोक्याला ऊर्जा देण्याचं काम करतात, तसंच भावनिक संतुलन राखण्यासाठी मदतही करते. शंखपुष्पीचं सेवन केल्याने झोपही चांगली लागते. त्यामुळे तुमची मानसिक स्थिती उत्तम राहते आणि जास्त भावनिक करणाऱ्या डोक्याच्या भागावर नियंत्रण ठेवते.

दूधाचं सेवन करा

ब्राह्मीचं चूर्ण तुम्ही घेऊ शकता. हे चूर्ण तूप किंवा दूधासोबत घएऊ शकता. जर मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नसेल तर हे चूर्ण मुलांना एकाग्रता वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. ब्राह्मीच्या तेलाने डोक्याची मालिश करू शकता. शंखपुष्पी काढ्याचेदेखील सेवन करता येईल. बाजारात ते पावडरच्या स्वरुपातही ते उपलब्ध आहे. महत्त्वाचे म्हणजे दोन्हीचे एकत्र सेवन केल्याने परिणाम सुधारतील. तसंच या दोन्ही पावडर कोमट दूधात मिसळून त्याचे सेवन केले जाऊ शकते.