Bad Cholesterol Removing Tips: कोलेस्ट्रॉल वाढल्याने जगभरात अनेक नागरिक त्रस्त आहेत. कोलेस्ट्रॉल हा शरीराचा छुपा शत्रू ठरू शकतो. जर आपण योग्य जीवनशैली व आहाराचे पालन केले तर आपल्याला नक्कीच कोलेस्ट्रॉल कमी करता येऊ शकतो. कोलेस्ट्रॉलचा अंत करण्यासाठी प्रसिद्ध असणारे एक फळ आज आपण पाहणार आहोत. मूळ पाश्चिमात्य देशात प्रसिद्ध असणारे हे फळ आता मुंबई- पुणे, नाशिक सारख्या अनेक मुख्य शहरांमध्येही पाहायला मिळते. विशेषतः ब्रेकफास्टसाठी या फळाचे सेवन करणे हा ट्रेंडच झाला आहे. तुम्ही ओळखलं असेल आपण अवाकाडो विषयी बोलत आहोत. तुम्हाला माहित आहे का अवाकाडो खाल्ल्याने तुमच्या कोलेस्ट्रॉलसहित वजनावर सुद्धा मोठा प्रभाव दिसून येतो. तो कसा आणि त्यासाठी नेमका किती व कसा अवाकाडो खायला हवा हे जाणून घेऊयात..
२०२१ पासून झालेल्या अनेक संशोधनात हे प्रकर्षाने समोर आले आहे की, अवाकाडो दररोज खाल्ल्याने महिलांच्या पोटाची चरबी आठवड्याभरात कमी होऊ लागते. शिवाय या फळातील कोलेस्टेरॉल-बस्टिंग गुणधर्मांमुळे मेटाबॉलिज्म सुधारते. परिणामी मधुमेह, हृदयरोग आणि कर्करोग होण्याचा धोका कमी होतो.
अवाकाडोमुळे कोलेस्ट्रॉलवर नेमका काय परिणाम होतो? (Avocado Effects On Cholesterol)
हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग टाळण्यासाठी शरीराला फॅटी ऍसिडस्, मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडस् आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडचे प्रमाण आवश्यक आहे. एवोकॅडोचे सेवन खराब कोलेस्ट्रॉल आणि चांगले कोलेस्ट्रॉल या दोघांची पातळी नियंत्रित करू शकते. अवाकाडोमध्ये C आणि K सारखी जीवनसत्त्वे असल्याने ते फायबरचे चांगले स्रोत आहेत.
२०१९ मध्ये, पेन स्टेट युनिव्हर्सिटीच्या एका संशोधनाने असेही सुचवले होते की दिवसातून एक अवाकाडो खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होऊ शकते. दिवसातून एक अवाकाडो खाणे हे लठ्ठपणाने पीडित प्रौढांमधील ऑक्सिडाइज्ड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. दररोज अवाकाडोच्या सेवनामुळे एकूण कोलेस्ट्रॉल २.९ मिलीग्राम प्रति डेसीलिटर (mg/dL) व LDL कोलेस्ट्रॉल २. ५ mg/dL कमी झाल्याचे आढळून आले होते.
अभ्यासात असे आढळून आले की अवाकाडो ऑक्सिडायझेशन केलेले एलडीएल कण कमी करण्यास मदत केली. हे कण घातक असतात. ज्या प्रकारे ऑक्सिजन अन्नाचे नुकसान करू शकते, जसे कापलेले सफरचंद तपकिरी होते.. संशोधकांनी सांगितले की ऑक्सिडेशन मानवी शरीरासाठी देखील वाईट आहे. पाच आठवडे अवाकाडो खाल्ल्यावर सहभागींमधील ऑक्सिडायझ्ड एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी लक्षणीयरीत्या कमी झाली होती.
अवाकाडोचे किती सेवन करावे? (How Much Avocado Should Have)
हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की अवाकाडोमध्ये कॅलरी आणि फॅट्स जास्त असतात. अवाकाडोमधील फॅट्स मोनो सॅच्युरेटेड असूनही जास्त प्रमाणात सेवन केल्याने वजन वाढू शकते. त्यामुळे, आहाराचा भाग म्हणून शिफारस केलेल्या प्रमाणात अवाकाडोचे सेवन करणे गरजेचे आहे.
हे ही वाचा<< खराब कोलेस्ट्रॉल सकाळी शौचावाटे बाहेर फेकतो ‘हा’ एक पदार्थ; किती प्रमाणात व कसे करावे सेवन जाणून घ्या
साधारणतः एका फळात २०० कॅलरीज असतात,एका दिवसात मध्यम आकाराचे किंवा अर्धे मोठे फळ पुरेसे आहे. तुम्ही पूर्ण ब्रेकफास्ट म्हणून फक्त अवाकाडो खाऊ शकत नाही. सकाळी उशिरा किंवा दुपारच्या जेवणाआधी अवाकाडो टोस्ट किंवा सॅलेड खाऊ शकता. समजा तुम्ही वजन कमी करण्यासाठी 1,500-कॅलरी जेवणाची योजना आखत असाल, तर तुम्ही या कॅलरींचाही हिशोब घ्या.
अवाकाडोच्या रेसिपी (Avocado Recipes)
अवाकाडो ग्वाकामोल व नाचो चिप्स (संपूर्ण धान्याचे चिप्स) ही रेसिपी अत्यंत प्रसिद्ध आहे. तुम्हाला गोड खायला आवडत असेल तर तुम्ही चॉकलेट एवोकॅडो मूस नक्कीच करून पहा. नुसता अवाकाडो खायचा असल्यास त्यावर काळी मिरी घालून खाणे तुमच्या जिभेसाठी ट्रीट ठरू शकते.