Warm Water And Weight Loss: सकाळी उठल्यावर अनेकदा घशाला प्रचंड कोरड पडल्याचं जाणवतं. ओठ सुकणे व तोंडात एक कडवटपणा जाणवणे हा त्रास विशेषतः थंडीत जाणवतो. याचे मुख्य कारण म्हणजे थंडीत आपल्याकडूनच पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते. अशावेळी निदान सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी प्यायल्यास त्वरित ताजे वाटू शकते. आता हे सकाळी प्यायचे पाणी गरम असावं की थंड (साधं) हा प्रश्न अनेकांना असतो. यावर अनेक तज्ज्ञांनी विविध उत्तरे दिली आहेत. मात्र जर तुम्ही खाली दिलेल्या विशिष्ट समस्यांनी त्रस्त असाल तर तुम्हाला दिवसाची सुरुवात गरम किंबहुना कोमट पाण्याने करणेच फायद्याचे ठरू शकते. कोमट पाण्याचे नेमके काय फायदे आहेत व हे पाणी कसे प्यावे जाणून घेऊयात..
वेदामृतया संस्थेच्या संस्थापक डॉ वैशाली शुक्ला यांच्या माहितीनुसार किडनीचे अनेक विकार हे कोमट पाण्याच्या सेवनाने कमी होण्यास मदत होते. इंस्टाग्रामवर डॉ. वैशाली यांनी यासंदर्भात माहिती देत सांगितले की, फायदे ऐकून अनेकजण दोन दोन कप कोमट पाणी प्यायला जातात पण गरजेपेक्षा अधिक पाणी पिणे हे काहीच उपयोगाचे नाही. तुम्ही एक ग्लास गरम पाणी व काही वेळाने एक ग्लास साधं पाणी प्यायलास शरीराला अधिक फायदेशीर ठरू शकते.
पोट झटपट स्वच्छ होण्यास होते मदत: Relieve Constipation
डॉ वैशाली शुक्ला यांनी सांगितल्याप्रमाणे, तुम्हाला शौचास न होण्याची तक्रार असेल तर सकाळी एक ग्लासभर पाण्यात सुंठ किंवा सुकलेल्या आल्याचा तुकडा टाकून उकळून घ्या. ब्रश करण्याआधीच हे गरम पाणी पिणे तुम्हाला सहन होईल त्या तापमानात प्यावे. इधर क्लीवलँड क्लिनिकच्या माहितीनुसार असे पाणी प्यायल्याने कॉन्स्टिपेशन (बद्धकोष्ठ) कमी होण्यास मदत होते व पचनप्रक्रिया सुद्धा सुरळीत होते.
हे ही वाचा<<तुमच्या वयानुसार तुमचे वजन किती हवे? आजारांना दूर ठेवा, परफेक्ट बॉडीसाठी ‘हा’ सोपा तक्ता पाहा
पोटापर्यंत जाण्याचा मार्ग.. (Relieve Throat Infection)
इंटरग्रेटिव न्यूट्रिशनिस्ट व आयुर्वेद तज्ज्ञ करिश्मा शाह यांच्या माहितीनुसार तुम्ही कसेही पाणी प्या पण प्या, कारण तुमच्या शरीरात रात्रभरात तयार झालेले बॅक्टरीया बाहेर पडणे जास्त गरजेचे आहे.
ग्लोबल हॉस्पिटल यूरोलॉजी डिपार्टमेंट चे मुख्य अधिकारी डॉ प्रदीप राव सांगतात की, गरम व साधे पाणी प्यायल्याने वेगळा असा काही परिणाम पडत नाही कारण मुळात जेव्हा तुमच्या शरीरात पाणी जाते तेव्हा ते शरीराच्या तापमानात बदलते . पण याचा फायदा तुम्हाला पोटापर्यंत पाणी पोहचण्याआधी होऊ शकतो. तोंडातील जंतू निघून जाण्यास, गळ्याला व घशाला आराम मिळण्यास गरम व कोमट पाण्याचा फायदा होतो.
हे ही वाचा<< कॉफी व लिंबू एकत्रित प्यायल्याने वजन होते झटपट कमी? आहारतज्ज्ञांनी सांगितलं नेमकं कारण
अनेकदा आपण थंडीत पाणी पिण्यास कंटाळा करतो. पण असे केल्यास डिहायड्रेशनची समस्या वाढू शकते. आपण कोमट पाणी प्यायलास पाणी पिण्याची इच्छाही वाढते व आपले शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते.