Shahrukh Khan diet plan: वयाच्या ५९व्या वर्षीही बॉलीवूडचा किंग खान शाहरूख खान त्याच्या फिटनेस आणि यंग लूकने चाहत्यांना भुरळ घालतो. शाहरूखने त्याच्या आहाराबाबत माहिती दिली आहे. रोजच्या आहारात मोड आलेले कडधान्य, ग्रील्ड चिकन, ब्रोकोली आणि काही प्रमाणात मसूरचा समावेश असतो. हा साधा आहार त्याच्या निरोगी त्वचेचे आणि ऊर्जेचे रहस्य आहे.

गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. पॉल माणिकम यांच्या मते, शाहरूख खानचा आहार पौष्टिकतेने समृद्ध आहे. यामुळे तो निरोगी, तंदुरूस्त आणि तरूण राहतो. ग्रील्ड चिकन, ब्रोकोली, मोड आलेले कडधान्य आणि मसूर यांसारखे पदार्थ केवळ ऊर्जा प्रदान करत नाहीत, तर आतड्यांचे आरोग्य, स्नायूंची ताकद आणि चमकदार त्वचादेखील वाढवतात.

ग्रील्ड चिकन

डॉ. पाल यांनी सांगितल्याप्रमाणे, शाहरूखच्या आहारात ग्रील्ड चिकन हा एक महत्त्वाचा घटक आहे, कारण तो लीन प्रोटीनचा एक उत्कृष्ट स्त्रोत आहे. वाढत्या वयात स्नायूंच्या दुरूस्तीसाठी आणि ताकदीसाठी प्रथिने आवश्यक असतात. १०० ग्रॅम ग्रील्ड चिकनमधून अंदाजे ३० ग्रॅम प्रथिने मिळतात. यामुळे स्नायू मजबूत होतात आणि ऊर्जेची पातळी राखली जाते. चिकनचा संतुलित आहारात समावेश आहे. त्यामुळे ताकद मिळते आणि वयानुसार स्नायूंचा कमकुवतपणा कमी होतो.

ब्रोकोली

शाहरूखच्या आहारात समाविष्ट असलेल्या ब्रोकोलीमध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यातील फायबर पचनसंस्था मजबूत करते आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या टाळते. त्यातील अँटीऑक्सिडंट्स जळजळ कमी करतात आणि त्वचेला निरोगी चमक देतात. आतड्यांचे आरोग्य चांगले राहिल्याने जळजळ कमी होते आणि वृद्धत्वाची लक्षणे मंदावतात.

मोडाचे पदार्थ

डॉ. पाल सांगतात की, अंकुरांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि पाचक एंजाइम भरपूर प्रमाणात असतात. ते सहज पचतात आणि शरीराला आवश्यक पोषण देतात. त्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स पेशींना फ्री-रॅडिकल्सच्या नुकसानापासून वाचवून वृद्धत्व रोखण्यास मदत करतात. अंकुरलेले पदार्थ खाल्ल्याने ऊर्जेची पातळी वाढते आणि शरीर अधिक काळ सक्रिय राहते.

मसूर

शाहरूख खान त्याच्या आहारात काही प्रमाणात मसूरचा समावेश करतो. मसूरमध्ये वनस्पती प्रथिने, फायबर आणि खनिजे असतात. ते संतुलित आहारासाठी आवश्यक असतात. ते आतड्यांचे आरोग्यदेखील वाढवतात आणि पचनास मदत करतात. प्राण्यांच्या प्रथिनांचे सेवन कमी करू इच्छिणाऱअयांसाठी मसूर हा एक निरोगी आणि शाश्वत पर्याय आहे.