Diabetes and Potatoes: डायबिटीज हा एक असा आजार आहे ज्याच्यावर वेळोवेळी नियंत्रण न राखल्यास तो शरीरात रक्तासारखाच पसरू शकतो. डायबिटीजला जोडून अनेक आजारही शरीराला विळखा घालू लागतात परिणामी अशा रुग्णांना गंभीर वैद्यकीय समस्या जाणवू शकतात. अशावेळी आहार व जीवनशैलीचे संतुलन राखणे हा सर्वात स्वस्त, सोपा व साधा उपाय ठरतो. आपल्याला डायबिटीज असल्यास असेच पदार्थ खायला हवेत ज्यांचा ग्लाइसेमिक इंडेक्स कमी असतो. हे पदार्थ रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवत नाहीत याची आपण खात्री करून घ्यायला हवी. अनेकदा डायबिटीजच्या रुग्णांना बटाटा खाण्याबाबत अनेक प्रश्न पडतात. बटाटा हा बहुतांश लोकांचा आवडता असतो, अगदी प्रत्येक भाजीत, चिकनमध्येही बटाटा घालून अनेकजण खातात. आपण अगदी क्वचितही फास्टफूड खात असाल तर त्यातही बटाट्याचा समावेश असतोच. अशावेळी डायबिटीज व बटाट्याचे काय कनेक्शन आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. चला तर मग पाहुयात..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डायबिटीजच्या रुग्णांनी बटाटा खावा की खाऊ नये?

बटाटा हा भाजीचा प्रकार असला तरी त्याचे गुण हे धान्याप्रमाणेच असतात, यात स्टार्च, कार्बोहायड्रेट असतात जे धान्यातही मुबलक प्रमाणात असतात. वैद्यकीय तज्ज्ञांच्या माहितीनुसार, बटाट्यामध्ये फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी ६ सारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो, ज्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत होते. याचे सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते. मात्र WebMD.com नुसार, बटाट्याचे सेवन केल्यास मधुमेह असलेल्या रुग्णांच्या शरीरातील कार्बोहायड्रेट्स साध्या साखरेच्या रूपात रक्तात मिसळतात आणि रक्ताभिसरण करत राहतात, ज्यामुळे रक्तातील साखर दीर्घकाळ वाढते.

बटाट्याचा ग्लाइसेमिक इंडेक्स काय असतो?

बटाट्याचा ग्लाइसेमिक इंडेक्स जवळपास ७० इतका असतो. ७० हुन अधिक ग्लाइसेमिक इंडेक्स असणे हे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. डायबिटीजचे रुग्ण बटाट्याचे सेवन करू शकतात मात्र आहारात बटाट्याचे प्रमाण हे संतुलित असणे गरजेचे आहे. एक सोप्पी टीप म्हणजे जर तुम्ही बटाट्याचे सेवन पालेभाज्यांसह केले तर ग्लाइसेमिक इंडेक्स नियंत्रणात राहण्यात मदत होऊ शकते. तसेच बटाट्याची भाजी वारंवार गरम करणे टाळावे असाही सल्ला तज्ज्ञ देतात यामुळे ग्लाइसेमिक इंडेक्स वाढण्याचा धोका असतो. डायबिटीजचे रुग्ण एका दिवसात २०० ग्राम कार्बोहायड्रेट खाऊ शकतात. यासाठी तुम्ही बटाटा किंवा भात खाण्याचे नियोजन करू शकता.

हे ही वाचा<< विश्लेषण: चेहऱ्यावर एकाच जागी सतत पिंपल्स का येतात? पिंपल्समुळे चेहरा काळवंडत असेल तर काय करावे?

‘या’ स्थितीत बटाट्याचे सेवन करणे टाळावे..

जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर बटाटे आहारात टाळावे.
ज्यांना किडनीशी संबंधित त्रास असतील तर बटाट्याचे सेवन टाळावे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये)

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Can diabetes patient eat potatoes easy recipes trick that control blood sugar lifestyle health news svs
First published on: 23-11-2022 at 09:59 IST