Digestion Issues: काही लोक खूप पटापट खातात, ही सवय आरोग्यासाठी हानिकारक असू शकते; ज्यामुळे पोटदुखी, गॅस आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात, एका इन्स्टाग्राम व्हिडीओने एका प्रयोगाद्वारे हे अगदी स्पष्ट केले आहे. व्हिडीओमधील महिला पाणी असलेल्या झिप-लॉक बॅगमध्ये बेकिंग सोडा टाकते, त्यातील एका बॅगमधील पाण्याला फेस येऊन बाहेर पडते. याचा संबंध ब्लॉगर महिलेने आपल्या पोटातील अन्नाशी जोडला आहे. तिच्या मते, अन्न जेव्हा पटापट खाल्ले जाते, तेव्हा पोटदेखील असेच अस्वस्थ होते आणि अन्न पचन होण्यास समस्या निर्माण होते.

असे का घडते?

ग्लेनिगल्स हॉस्पिटल, परळ, मुंबई येथील अंतर्गत औषध क्षेत्रातील वरिष्ठ सल्लागार डॉ. मंजुषा अग्रवाल यांनी असे सांगितले आहे की, पटापट अन्न खाताना तुम्ही जास्तीची हवा गिळता म्हणून हे घडते. जेव्हा अन्न व्यवस्थित चावले जात नाही तेव्हा ते पचवण्यासाठी तुमच्या पोटाला जास्त मेहनत करावी लागते, यामुळे अपचन आणि ॲसिडिटी होऊ शकते; यामुळे तुमच्या मेंदूला तुमचे पोट भरले आहे की नाही हे ओळखण्यासदेखील अडथळा येतो, यामुळे जास्त खाण्याची आणि वजन वाढण्याची शक्यता वाढते.”

तज्ज्ञांच्या मते, पटापट खाण्यामुळे पचनावर अतिरिक्त ताण येऊ शकतो, ज्यामुळे आम्लयुक्त रिफ्लक्स आणि पोटात तीव्र वेदना होण्याची शक्यता असते. “यामुळे तुमचे चयापचयदेखील मंदावू शकते, म्हणूनच आरोग्याला प्राधान्य देणे आणि हळूहळू खाणे अत्यंत महत्त्वाचे आहे,” असे डॉ. अग्रवाल म्हणाले.

,”तुम्ही अन्न खाताना हळूहळू चावून खा तसेच पटापट जेवण्यासाठी मोठे घास चावून खाणे टाळा. अन्न नेहमी शांत वातावरणात खाणे उपयुक्त ठरू शकते,” असे डॉ. अग्रवाल म्हणाले.

तसेच, ,”जेवणादरम्यान पाणी पिऊ नका, कारण त्यामुळे तुमचे पोट लवकर भरू शकते. त्याऐवजी पचनास मदत करण्यासाठी जेवणाच्या २० ते ३० मिनिटे आधी पाणी पिण्याचा प्रयत्न करा,” असे डॉ. अग्रवाल म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खाण्याच्या सवयींमध्ये साधे बदल केल्याने आतड्याच्या आरोग्यावर आणि दीर्घकालीन आरोग्यावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो.