Is Palm Oil Really Bad: इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन (NIN) यांनी एकत्रितपणे भारतीय आहाराविषयी मार्गदर्शक तत्त्वांचे अपडेट्स अलीकडेच जाहीर केले आहेत. या मार्गदर्शक तत्वांमधील एक अत्यंत अनपेक्षित व आश्चर्यकारक असा मुद्दा म्हणजे पाम तेलाचा वापर. पाम तेल हे गुणवत्तेने कमी असल्याचे म्हणत अनेकदा वापरणे टाळले जाते. इतकंच नाही तर पाम तेलाचा वापर करून बनवलेले पदार्थ सुद्धा भेसळयुक्त असतात असाही समज अनेकांच्या मनात असतो. पाम तेल घरी आणले तरी फार फार तर दिव्यात वापरले जाते, किचनमध्ये या तेलाला स्थान मिळतच नाही. मात्र सध्या समोर आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मध्यम प्रमाणात पाम तेलाचे सेवन केल्याने रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊ शकते असे समजतेय.

नवीन आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वांचे उद्दिष्ट भारतीयांना माहितीपूर्ण निवड करण्यासाठी सक्षम बनवणे व एकूणच चांगल्या आरोग्याला चालना देणे असे आहे. केअर हॉस्पिटल्समधील क्लिनिकल आहारतज्ज्ञ जी सुषमा यांनी इंडियन एक्सस्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, पाम तेल हे त्यामधील संतृप्त चरबीच्या प्रमाणामुळे घातक मानले जाते पण आश्चर्याची बाब म्हणजे या तेलाच्या वापराचे काही फायदे सुद्धा आहेत. आपण योग्य पद्धतीने या तेलाचा वापर केल्यास नेमका कसा लाभ होऊ शकतो हे जाणून घेऊया..

What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Incense Sticks Causing Cancer
घरी धूप, उदबत्ती लावताना १० वेळा विचार कराल, डॉक्टरांनी सांगितलेले हे परिणाम वाचा, मंदिरात झालेला अभ्यास काय सांगतो?
puneri pati viral there is no love like father Emotional Slogan Written Behind puneri riksha Video
“आज पाहिलेली सगळ्यात भारी पुणेरी पाटी” रिक्षामागची पाटी पाहून व्हाल भावूक; पुण्यातला VIDEO व्हायरल
Nagpur Results Nitin Gadkari Major Win Can Change Prime Minister Power Game
नितीन गडकरींचा विजय पालटणार सत्तेचा खेळ? ज्योतिषतज्ज्ञ म्हणतायत, “२०२४ पर्यंत काळजी, तर २०२६ ला मोठा..”
mrunal dusanis says live in america is more difficult than India
“अमेरिकेत राहणं खूप अवघड”, चार वर्षांनी भारतात आलेल्या मृणाल दुसानिसने सांगितलं परदेशातील राहणीमान, म्हणाली…
What Kiran Mane Said About Manusmruti?
“सुंदर स्त्री हीन जातीतली असली तरी तिला भोगण्यात…”, ‘मनुस्मृती’तलं वाक्य सांगत किरण मानेंची खरमरीत पोस्ट
Heart-touching Letters to Son from father
Photo: “प्रेम ही एक क्षणिक भावना” प्रत्येक बापानं वयात येणाऱ्या मुलाला लिहावं असं पत्र; नक्की वाचा
puneri pati viral
PHOTO: पुणेकरांचा नाद नाय! बंद बंगल्याबाहेर लिहली अशी पाटी की…वाचून पोट धरुन हसाल

पाम तेलाचे पोषण प्रोफाइल

पाम तेल हे चरबीच्या बाबतीत मिश्रित असते. त्यात सॅच्युरेटेड फॅट्स असतात, जे एलडीएल (खराब) कोलेस्टेरॉल वाढवू शकतात, पण त्यात निरोगी मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स देखील असतात. याव्यतिरिक्त, पाम ऑइलमध्ये अ आणि ई जीवनसत्त्वे असतात, जी रोग प्रतिकारशक्ती आणि निरोगी त्वचेसाठी आवश्यक आहेत, सुषमा सांगतात की, पाम तेलात असणारे अँटिऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्सच्या नुकसानाशी लढतात.

पाम तेल आणि कोलेस्ट्रॉल

अभ्यास सुचवितो की, ट्रान्स फॅट्सपेक्षा तुलनेने कमी वेगात का होईना पण पाम तेल एलडीएल कोलेस्ट्रॉल वाढवू शकते, मात्र त्याच बरोबरीने एचडीएल (चांगले) कोलेस्ट्रॉल वाढवण्याची क्षमता हा सुद्धा पाम तेलाचा एक छुपा फायदा आहे. यामुळे रक्तप्रवाहातून (एलडीएल) कोलेस्टेरॉल काढून टाकण्यास मदत होते परिणामी हृदयाचे आरोग्य सुधारण्यास हातभार लागू शकतो.

पाम तेलाला एक निरोगी निवड कसे बनवता येईल?

संयम महत्त्वाचा: इतर तेलांप्रमाणेच पाम तेलाचा वापर हा प्रमाणात कारण आवश्यक आहे. जास्त प्रमाणात सॅच्युरेटेड फॅटचे सेवन केल्याने तुमच्या हृदयाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. ऑलिव्ह ऑईल, मासे, नट्स आणि बियांमधून निरोगी फॅट्सचा शरीराला पुरवठा करा व संतृप्त चरबीचे सेवन टाळा.

आहारातील संतुलन आवश्यक आहे: पाम तेलाचा वापर हा फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि पातळ प्रथिने असलेल्या संतुलित आहाराचा एक भाग असावा.

हे ही वाचा<< कलिंगड व टरबुजामुळे विषबाधा होण्याचा धोका कसा टाळावा? लाल, रसाळ फळ दिसलं तरी ‘या’ गोष्टी करूनच खा

स्मार्ट कुकिंग पद्धती: तळणे आणि बेकिंग यांसारख्या कमी उष्णता आवश्यक असलेल्या कुकिंग पद्धतींसाठी पाम तेल वापरा. तळण्यासारख्या उच्च-तापमान आवश्यक असणाऱ्या पद्धतींमध्ये पाम तेल वापरणे टाळा कारण यामध्ये हानिकारक संयुगे तयार होऊ शकतात. अधिक उष्णता आवश्यक असणाऱ्या पदार्थांमध्ये ऑलिव्ह ऑईल किंवा कॅनोला तेल यांसारख्या आरोग्यदायी तेलांसह पाम तेलाचे मिश्रण करू शकता.

RSPO (राऊंडटेबल ऑन सस्टेनेबल पाम ऑइल) सर्टिफिकेट असणारे पाम तेल निवडा. यासाठी उत्पादनावर छापलेले तपशील आवर्जून वाचा.

विचारपूर्वक सेवन केल्यास पाम तेल निरोगी आहाराचा भाग असू शकतो.