पोटावरची वाढलेली चरबी ही बऱ्याच लोकांसाठी चिंतेची बाब आहे. या चरबीमुळे आपले व्यक्तिमत्त्व खराब दिसते. तसेच मधुमेह, हृदयविकार, पक्षाघात, कोलन कॅन्सर यांसारखे धोकादायक आजार होऊ शकतात. त्यामुळे वजन कमी करत फीट राहणे महत्त्वाचे आहे. अनेकांना वाटते आपण एका आठवड्यात विविध पद्धतीने पोटावरची चरबी कमी करू शकतो. मात्र तसे होत नाही, कारण पोटाची चरबी कमी करण्यासाठी वेळ, मेहनत आणि एक खूप वेळ टिकणारा दृष्टिकोण लागतो. त्यामुळे सात दिवसांत पोटावरची चरबी कमी होऊ शकते का? बेली फॅट्स कमी करण्यासाठी कार्डिओला दुसरा पर्याय आहे का अशा पाच मुख्य प्रश्नांची उत्तरे ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना नोयडामधील मेट्रो हॉस्पिटलचे बिलिरी सायन्सेस गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, हेपॅटो-पॅन्क्रियाटिकप्रमुख डॉ. हर्ष कपूर यांनी दिली आहेत.

१) तुम्ही फक्त सात दिवसांत पोटाची चरबी कमी करू शकता का?

एका आठवड्यात पोटाची चरबी कमी करण्याचे उपाय हे आरोग्यासाठी चांगले असू शकत नाहीत. नैसर्गिकरीत्या वजन कमी करण्यासाठी कमी कॅलरीची गरज असते, याचा अर्थ तुम्ही वापरता त्यापेक्षा जास्त कॅलरी घटवा. कमी कालावधीत कमी कॅलरीज निर्माण करणे शक्य असले तरी, वजन कमी होण्याचे प्रमाण कमीत कमी असेल. वजन केवळ पोटाच्या चरबीपुरतेच कमी होत नाही. अधिक कॅलरीजमुळे चयापचय क्रिया मंद होऊ शकते. यामुळे एकूण आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात.

Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Insomnia Before Period
महिलांनो, मासिक पाळीदरम्यान चांगली झोप येत नाही? स्त्रीरोगतज्ज्ञांनी सुचविलेल्या ‘या’ ४ गोष्टी करुन पाहा, लागेल शांत झोप
misbehavior at toll booth where can you complaint how to deal with toll employees nhai fastag helpline
टोल नाक्यावरील कर्मचारी तुमच्याबरोबर चुकीच्या पद्धतीने वागले तर काय कराल? वाचा सविस्तर

२) स्पॉट रिडक्शनमुळे फक्त पोटावरील वाढती चरबी कमी करता येते?

टारगेटेड फॅट लॉस होणे किंवा स्पॉट रिडक्शन हा एक सामान्य समज आहे. संशोधनानुसार, वजन कमी होते तेव्हा संपूर्ण शरीरात ते समान रीतीने होत असते. यामुळे व्यायाम किंवा आहारातून फक्त ठरावीक भागाचेच वजन कमी करता येत नाही. म्हणून पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्हाला संतुलित आहार आणि नियमित व्यायामाद्वारे एकूण वजन कमी करण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

३) पोटाची चरबी कमी करण्यासाठी कार्डिओ करण्याची गरज असते?

धावणे किंवा सायकल चालवणे यासारखे कार्डिओ व्यायाम कॅलरी घटण्यास आणि शरीरातील एकूण चरबी कमी करण्यास मदत करतात. पण पोटाची चरबी कमी करण्यासाठी कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइजची गरज असते. स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे स्नायू बळकट होण्यास मदत होते, ज्यामुळे तुमची चयापचय क्रिया वाढू शकते आणि तुम्ही व्यायाम करीत नसतानाही जास्त कॅलरी घटवू शकता.

४) क्रॅश डाएट आणि खूप व्यायाम करून पोटाची चरबी कमी होते का?

क्रॅश डाएट आणि जास्त व्यायाम करून तुम्ही काही दिवसांत पोटावरची चरबी कमी करू शकता. यामुळे काही दिवसांत तुम्हाला परिणाम दिसू शकतात, परंतु हे तुमच्या निरोगी आरोग्यासाठी चांगले नसते. त्याऐवजी तुम्ही तुमच्या आहारात आणि व्यायामाच्या रुटीनमध्ये लहान पण अर्थपूर्ण बदल करा. यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे पोटावरची चरबी कमी करू शकता. नैसर्गिकरीत्या वजन कमी करण्यासाठी संतुलित आणि पौष्टिक आहार, नियमित व्यायाम आणि जीवनशैलीत बदल आवश्यक आहेत, ज्यामुळे खूप वेळ तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता.

५) पोटाच्या चरबीमुळे फक्त शरीराचा आकार खराब दिसतो?

पोटाच्या चरबीमुळे फक्त शरीराचा आकार खराब दिसत नाही तर त्यामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो, जसे की, इन्सुलिन प्रतिरोधकक्षमता, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग. त्यामुळे, पोटातील चरबी वाढण्याचे मूळ कारण शोधणे आणि वजन कमी करण्यासाठी दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवणे महत्त्वाचे आहे.

पोटाची चरबी कमी करण्यासाठी वेळ, मेहनत आणि शाश्वत दृष्टिकोन लागतो. काही व्यायाम आणि आहारामुळे तुम्हाला अल्पकालीन परिणाम दिसतील. परंतु हे परिणाम दीर्घकालीन किंवा निरोगी नसतात. वजन कमी करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुम्हाला निरोगी समतोल आहार आणि नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे.