Cataracts Causes and Symptoms: अनेक वर्षांपासून आपण आपल्या आजी-आजोबांना आणि वडिलधाऱ्यांना मोतीबिंदू झालेला पाहिला आहे. अनेक लोकांना असलेल्या गैरसमजानुसार मोतीबिंदू हा केवळ वृद्धापकाळात होणारी समस्या आहे, पण तरुणांनादेखील मोतीबिंदू होऊ शकतो अशा अनेक बातम्या हल्ली समोर येत असतात. त्यामुळे हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे की, या आजाराची मुख्य कारणे कोणती आहेत आणि तुम्हाला तुमच्या डोळ्यांची काळजी घेण्यासाठी काय करायला हवे; जेणेकरून भविष्यात मोतीबिंदूचा धोका उद्भवणार नाही.

‘द इंडियन एक्स्प्रेस’ने डोळ्यांची स्वच्छता राखण्यासाठी आणि डोळ्यांची काळजी घेण्याच्या बाबतीत काय करावे आणि करू नये, याबाबत माहिती मिळवली आहे.

मोतीबिंदू कशामुळे होतो? (Cataracts Causes)

डॉ. दीप्ती मेहता, सल्लागार नेत्रतज्ज्ञ, केअर हॉस्पिटल्स हायटेक सिटी, हैदराबाद यांनी सांगितले की, “आपल्या डोळ्यातील लेन्स सामान्यतः दृष्टीस मदत करण्यासाठी स्पष्ट असतात. जसजसे वय वाढत जाते आणि आपण ४० च्या आसपास पोहोचतो तेव्हा लेन्समधील प्रथिने तुटायला लागतात. त्यामुळे लेन्सला अस्पष्ट दिसू लागते. ज्याचे दृष्टी बाधित होऊ शकते.”

त्यांच्या मते, वृद्धत्व हे मोतीबिंदूच्या विकासाशी संबंधित सर्वात सामान्य कारण आहे.

त्यांनी सांगितले की, “निळा प्रकाश कमी करणे, पुरेसा सूर्यप्रकाश मिळवणे आणि अँटिऑक्सिडंट्सचे सेवन केल्यामुळे मोतीबिंदू होण्याचा धोका कमी होण्यास मदत होते. निळा प्रकाश कमी केल्याने डोळ्यांवरील ताण कमी होण्यास मदत होते, तर पुरेसा सूर्यप्रकाश मिळाल्याने सर्कैडिलय आणि अँटीऑक्सिडंट्स शरीरावरील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करतात.”

‘या’ गोष्टींची खबरदारी घ्या

नियमितपणे डोळ्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
वारंवार डोळ्यांची तपासणी करा.
तुमच्या डोळ्यांना UV किरणांपासून संरक्षण द्या.
तीव्र प्रकाश रोखण्यासाठी सनग्लासेस वापरा, विशेषतः घराबाहेर असताना
धूम्रपान करत असाल तर ते बंद करा.
अल्कोहोलचा वापर कमी प्रमाणात करा.
मोतीबिंदूच्या रुग्णांसाठी व्हिटॅमिन-सी युक्त आहार करण्याचा सल्ला दिला जातो.
तुमच्या डोळ्यांवर जास्त ताण येणार नाही याची काळजी घ्या.

हेही वाचा: हर्बल पान मसाला तंबाखू, गुटख्याचे व्यसन सोडण्यासाठी सुरक्षित आहे का? तज्ज्ञ काय सांगतात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोतीबिंदू कधी काढावा?

डॉक्टर सांगतात की, “तुमचा मोतीबिंदू शस्त्रक्रियेने काढून टाकण्याची योग्य वेळ म्हणजे, जेव्हा तुमची दैनंदिन कामे करण्याच्या क्षमतेत व्यत्यय येतो. जेव्हा मोतीबिंदूमुळे वाचनासारखी साधी कामे कठीण होतात, अशावेळी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यावर उपचार करा.