आपल्या शरीरात चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे कोलेस्ट्रॉल तयार होतात. चांगले कोलेस्ट्रॉल शरीरात असणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे एलडीएल कोलेस्टेरॉल हा एक घाणेरडा पदार्थ आहे ज्याचे शरीरात कोणतेही कार्य नसते. हे एचडीएल कोलेस्टेरॉल म्हणजेच चांगल्या कोलेस्ट्रॉलपेक्षा वेगळे आहे. आपले यकृत पुरेसे चांगले आणि आवश्यक कोलेस्ट्रॉल तयार करते. पण चरबीयुक्त अन्न खाल्ल्याने खराब कोलेस्टेरॉल वाढते आणि नसांमध्ये जमा होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खराब कोलेस्ट्रॉल वाढवणारे पदार्थ?

सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट असलेल्या खाद्यपदार्थांच्या सेवनामुळे खराब कोलेस्टेरॉल वाढू लागते. लोणी, तूप, मांस, चीज, दुग्धजन्य पदार्थ, आइस्क्रीम, खोबरेल तेल इत्यादी खाद्यपदार्थांमध्ये फॅट आढळते, ज्यामुळे उच्च घनता लिपोप्रोटीन कोलेस्ट्रॉल वाढू शकते .

खराब कोलेस्टेरॉल हृदयापर्यंत पोहोचू देऊ नका..

उच्च कोलेस्टेरॉलमुळे शिरामध्ये चिकट पदार्थ जमा होतो. जेव्हा त्याचे प्रमाण खूप जास्त होते तेव्हा तेव्हा हा चिकट पदार्थ रक्तवाहिनी बंद करतो आणि रक्त पुरेशा प्रमाणात वाहू शकत नाही. अनेक वेळा हा पदार्थ तुटून हृदयाजवळ पोहोचतो आणि नसा बंद करतो. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता उद्भवते.

‘हे’ पदार्थ खराब कोलेस्ट्रॉल आतड्यातूनच खेचून घेतील..

फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने कोलेस्टेरॉलची पातळी वाढत नाही. NCBI वर प्रकाशित केलेल्या संशोधनात असे म्हटले आहे की विरघळणारे फायबर कोलेस्टेरॉल आतड्यांमध्ये बांधतात आणि ते विष्ठेच्या रूपात शरीरातून बाहेर काढतात. म्हणूनच खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी फायबर युक्त गोष्टी खाल्ल्या पाहिजेत.

( हे ही वाचा; विवाहित पुरुषांनी गरम दुधात ‘हा’ गोड पदार्थ मिसळून खा; ‘ताकद’ वाढू शकते)

सफरचंद खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होईल

हेल्थलाइननुसार, १ मध्यम आकाराच्या सफरचंदात १ ग्रॅम विरघळणारे फायबर असते. म्हणूनच आहारात सफरचंद खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते. तुम्ही दररोज १ ते २ सफरचंद आरामात खाऊ शकता.

गाजर देखील फायदेशीर आहे

थंडीत उपलब्ध असलेल्या गाजरांमध्ये आहारातील फायबरचे प्रमाण जास्त असते। म्हणूनच गाजर खाल्ल्याने नसांमध्ये घाण जमा होण्यापासून बचाव होतो. १२८ ग्रॅम गाजरांमध्ये सुमारे २.४ ग्रॅम विरघळणारे फायबर असते.

मटार आणि ओट्स खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकतील

मटार आणि ओट्समध्ये विरघळणारे फायबर देखील असते. मटार आणि ओट्सचा समावेश तुमच्या दररोजच्या आहारात करू शकता.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Consume fiber rich foods to prevent bad cholesterol and heart attack know how to reduce ldl level gps
First published on: 23-01-2023 at 10:36 IST