Continuously Sitting Can Be Harmful: सध्याच्या जीवनशैलीनुसार लोकांची शारीरिक हालचाल लक्षणीयरित्या कमी झाली आहे. बहुतेक लोक कामावर किंवा घरी बराच वेळ बसून घालवतात. लोक अनेकदा टीव्ही पाहताना किंवा गाडी चालवतानाही बराच वेळ बसून राहतात. ऑफिसमध्ये कामात मग्न तासनतास खुर्चीवर बसतात. पण तुम्हाला माहीत आहे का अशाप्रकारे कोणत्याही कारणास्तव जास्त काळ बसून राहिल्याने विविध आजार होऊ शकतात? तर मग हे नक्की वाचा की जास्त काळ बसल्याने नेमके कोणते आजार होऊ शकतात?

पाठीचा कणा कमकुवत होणे

जास्त वेळ बसून राहिल्याने पाठीच्या कण्यावर गंभीर परिणाम होतात. तासनतास एकाच जागी बसल्याने पाठीच्या कण्यावर दबाव वाढतो, त्यामुळे पाठदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. जास्त वेळ बसल्याने पाठीचा कणा कमकुवत होतो. तुमचा कणा मजबूत करण्यासाठी दररोज योग करणे फायदेशीर ठरू शकते.

लठ्ठपणा

जास्त वेळ बसल्याने लठ्ठपणा येऊ शकतो. एकाच ठिकाणी बसल्याने शरीराच्या पचनसंस्थेवर हानिकारक परिणाम होतो. अन्न व्यवस्थित पचत नाही, त्यामुळे चरबी जमा होते आणि चयापचयावर परिणाम होतो. जास्त वेळ बसणे टाळा आण चालण्यासाठी ब्रेक घ्या. बसून राहिल्याने अन्न पचनास अडथळा येतो, मग पोटफुगी आणि गॅस असे त्रास होतात. पोटाच्या समस्या सुरू झाल्या की हळूहळू इतर आरोग्य समस्या उद्भवतात.

ब्लड शुगर आणि हृदयावर परिणाम

जास्त वेळ बसल्याने ग्लुकोजचा वापर कमी होऊ शकतो, त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते, त्यामुळे मधुमेह आणि हृदयरोगाचा धोका वाढतो.

दरम्यान, तुमची जीवनशैली अधिक बसण्याकडे झुकलेली असेल तर त्यासोबत तुम्ही योग करणे हा एकमेव उपाय तुम्हाला भविष्यातील गंभीर समस्यांपासून वाचवू शकतो.