How to book Nasal Vaccine Dose Online: चीनमध्ये करोना रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागल्याने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. या भीतीदायक आकडयांमुळे पुन्हा लॉकडाउनची परिस्थिती उद्भवणार का असा प्रश्न सर्वांना पडला आहे. कोरोनाच्या नव्या BF7 व्हेरीयंटपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आता अनेकजण बुस्टर डोसकडे वळत आहेत. बुस्टर डोसमध्ये आता नेजल व्हॅक्सिन म्हणजेच नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीचा समावेश करण्यात आला आहे. ही लस ‘कोवीन अ‍ॅप’वर उपलब्ध झाली आहे. ही लस घेण्यासाठी नोंदणी कशी करायची जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेजल व्हॅक्सिनचा स्लॉट बूक करण्यासाठी वापरा या स्टेप्स

  • cowin.gov.in/ या कोविनच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • तुमच्या रेजिस्ट्रेशन केलेल्या मोबाईलवरून लॉगइन करा.
  • ओटीपी शेअर करा.
  • लॉगइन झाल्यानंतर व्हॅक्सिन स्टेटसवर क्लिक करा. त्यानंतर उपलब्ध बुस्टर डोस या पर्यायावर क्लिक करा.
  • पिनकोड, जिल्ह्याचे नाव टाकून जवळचे व्हॅक्सिन सेंटर शोधा.
  • तुम्हाला सोयीचे असेल ते सेंटर निवडा.
  • त्यानंतर तुम्हाला हवी ती तारीख आणि दिवस निवडा.
  • तुमचा स्लॉट कन्फर्म करा. बुस्टर डोस घेतल्यानंतर वेबसाईटवरून त्याचे सर्टीफिकेट डाउनलोड करा.

आणखी वाचा : नाकावाटे देता येणाऱ्या लसीवर संशोधन सुरू – पंतप्रधान मोदी

बुस्टर डोस घेण्याआधी त्या व्यक्तीने करोना लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. या दोन लस घेतल्यानंतर ९ महिन्यांनी एखादी व्यक्ती बुस्टर डोस घेऊ शकते.

हेही वाचा : समजून घ्या : ‘नेजल व्हॅक्सिन’ म्हणजे काय? लहान मुलांच्या लसीकरणात ती अधिक फायद्याची कशी ठरु शकते?

बुस्टर डोसची किंमत

भारत बायोटेकने एका प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, या लसीची किंमत खाजगी रुग्णालयासाठी ८०० रुपये ठरली असून त्यावर ५ टक्के जीएसटी आकारू शकतात. तसेच सरकारी रुग्णालयात या लसीेसाठी ३२५ आकारण्यात येणार आहेत.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Covid 19 nasal vaccine booster dose is available on cowin know how to book slot use these easy steps pns
First published on: 27-12-2022 at 12:55 IST