मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी खूप काळजी घेणं गरजेचं असतं. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मधुमेहाच्या रुग्णांना आहारावर नियंत्रण आणि तणावापासून दूर राहावं लागतं. तसंच या रुग्णांना धूम्रपानासारख्या वाईट सवयी बंद करणं अत्यंत आवश्यक असते. मधुमेहाच्या रुग्णांनी जर काही चुकीच्या सवयी अंगीकारल्या तर त्यांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो. धूम्रपानाची सवय सर्वांसाठीच घातक असते, पण मधुमेहाच्या रुग्णांना धूम्रपान करणं जास्तच धोकादायक असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आहारतज्ञ अंजली मुखर्जी आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये स्पष्ट केलं आहे की, मधुमेहाच्या रुग्णांनी धूम्रपान केल्यास त्यांना रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित करणं कठीण होऊ शकतं. कारण, धुम्रपानामुळे निकोटीन शरीरारातील इन्सुलिनला अधिक प्रतिरोधक बनवते आणि रक्तातील साखरेची पातळी वाढवते. त्यामुळे धूम्रपानाची सवय मधुमेहाचा धोका वाढवतेच शिवाय रुग्णाना किडनीच्या आजारांचा धोका निर्माण करु शकते.

हेही वाचा- किडनी निकामी होण्यास कारण ठरेल रक्तातील खराब युरिक ॲसिड; ‘या’ ५ उपायांनी वेळीच करा कंट्रोल

मुखर्जी यांनी पोस्टमध्ये पुढं लिहलं आहे, अनेक संशोधनात असं दिसून आले आहे की, सिगारेट ओढणे आणि तंबाखूचे व्यसन केल्याने मधुमेहाच्या रूग्णांच्या रक्तवाहिन्या कडक होतात, ज्यामुळे शरीराचे दुप्पट नुकसान होते. धूम्रपान करणार्‍या रुग्णांमध्ये हृदयविकार, किडनीचे आजार, डोळ्यांच्या समस्याही वाढू शकतात.’ मधुमेहामुळे आजारांचा धोका कसा वाढतो आणि त्यावर नियंत्रण कसे ठेवायचे त्याबाबत जाणून घेऊया.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी धूम्रपान धोकादायक –

हेही वाचा- किडनी स्टोन झाल्यास शरीरात सर्वात आधी दिसतात ‘ही’ लक्षणे; नेमका धोका कशाने वाढतो?

मुखर्जी यांनी आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहलं आहे की, “अमेरिकन जर्नल ऑफ मेडिसिन अँड डायबिटीजमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, धूम्रपानामुळे ग्लुकोजची पातळी बिघडते ज्यामुळे जलदगतीने रक्तातील साखर वाढण्याचा धोका निर्माण होतो. तज्ज्ञांच्या मते, धूम्रपान न करणाऱ्यांपेक्षा धूम्रपान करणाऱ्यांना टाईप-२ चा मधुमेह निर्माण होण्याचं प्रमाण ४४ टक्क्यांनी जास्त असतं.

मधुमेह कसा नियंत्रित कराल?

हेही वाचा- युरिक ऍसिड वाढून उठता बसता पायांना होतो त्रास; दिवसभरात ‘हे’ ५ उपाय देऊ शकतात झटक्यात आराम

  • मधुमेहाच्या रुग्णांनी नाश्ता टाळू नये. सकाळी नाश्ता करण्याची सवय लावावी. नाश्ता करणं टाळल्याने रक्तातील साखर वाढण्याचा धोका वाढतो.
  • जास्त प्रमाणात पाणी प्यावं, जास्त पाणी प्यायल्याने वाढलेली साखर लघवीद्वारे शरीरातून बाहेर पडते. रोज सकाळी उठल्यावर दोन ग्लास कोमट पाणी प्यायला हवं.
  • रक्तातील साखरेची पातळी नियमित तपासा.
  • शरीर सक्रिय ठेवावं त्यासाठी दररोज ४० मिनिटे चालावं किंवा व्यायाम करावा.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, गरज असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा)

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diabetes patients who smoke may increase the risk of kidney damage know tips to control sugar jap
First published on: 07-01-2023 at 17:41 IST