निरोगी जीवनासाठी शरीराच्या इतर अवयवांप्रमाणे मेंदूचे पोषण करणे हीदेखील एक महत्त्वाची बाब आहे; परंतु अनेकदा मेंदूच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते. आपल्या शरीराचे संज्ञानात्मक कार्य, भावना व चेतनेचे केंद्र असणाऱ्या मेंदूकडे विशेष लक्ष द्यायची आणि त्याची काळजी घेण्याची खूप आवश्यकता आहे. मेंदूच्या आरोग्यासाठी सुपरफूड्सचा आपल्या आहारात समावेश करणे गरजेचे आहे. पौष्टिक-समृद्ध पॉवरहाऊसची एक विशिष्ट रचना ही मेंदूचे संज्ञानात्मक कार्य आणि मानसिक आरोग्य वाढवण्यास मदत करते, असा दावा केला जातो.

एकता सिंघवाल (आहारतज्ज्ञ, उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स) यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, मेंदूचे आरोग्य राखण्यासाठी संतुलित व पोषक आहाराचा समावेश करणे गरजेचे आहे. शिवाय त्यांनी यासाठी काय आहार घ्यावा, याबाबतची माहितीही सांगितली आहे. त्यांनी सुचवलेले पर्याय पुढीलप्रमाणे :

This is what happens when you chew cloves everyday
रोज एक-दोन लवंग चघळल्या तर शरीरावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उत्तर…
Sleeping At This Time Reduce Spike In Diabetes Type 2
मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी ‘या’ वेळी व ‘इतका’ वेळ झोपणं गरजेचं! खाणं-पिणं, व्यायामाशिवाय ‘ही’ चूक ठरते घातक
printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

ओमेगा-३ फॅटी अॅसिड : मेंदूच्या आरोग्यासाठी ओमेगा-३ फॅटी अॅसिडचा स्रोत असलेल्या आहाराचा समावेश करणे आवश्यक आहे; ज्यामध्ये फॅटी फिश (सॅल्मन, ट्राउट), फ्लेक्स सीड्स, चिया सीड्स (Chia Seeds) व अक्रोड यांचा समावेश आहे. ओमेगा-३ मेंदूच्या कार्यासाठी महत्त्वपूर्ण असून, ते संज्ञानात्मक फायद्यांशी संबंधित आहेत.

हेही वाचा- थंडीत ‘या’ व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे कुरळे केस देतात त्रास, केसगळती रोखण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितलं खास उपाय 

अँटीऑक्सिडंट-समृद्ध अन्न : अँटिऑक्सिडंट्सने (Antioxidant) भरपूर फळे आणि भाज्यांचे सेवन करा; ज्यामध्ये बेरी, पालेभाज्या व रंगीबेरंगी भाज्यांचा समावेश करा. अँटिऑक्सिडंट्स मेंदूचे ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करण्यास मदत करतो; जे संज्ञानात्मक घट होण्याशी संबंधित आहे. अँटीऑक्सिडंट्स म्हणजे अन्नातील नैसर्गिक पदार्थ; जे आपल्याला काही आजारांपासून वाचवितात.

संपूर्ण धान्य : तपकिरी तांदूळ, क्विनोआ व ओट्ससारखे संपूर्ण धान्य; जे मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा करतात. त्याशिवाय ते फायबरचा चांगला स्रोत असतात. संपूर्ण धान्य हे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित आरोग्याला सक्रिय ठेवण्यास मदत करतात.

प्रथिने : अंडी, टोफू व शेंगा यांसारख्या लीन प्रथिनांचा (Lean Protein) आहारात समावेश करा. प्रथिने अमिनो अॅसिड पुरवतात.

हेही वाचा- Mental Health Special : मुलांच्या प्रायव्हसीचा आईवडील म्हणून तुम्ही विचार करता का?

मेंदूच्या चांगल्या आरोग्यासाठी पाच सुपरफूड

ब्ल्यूबेरी : अँटिऑक्सिडंट्स, विशेषत: फ्लेव्होनॉइड्सने समृद्ध, ब्ल्यूबेरी चांगल्या स्मृती व संज्ञानात्मक कार्यक्षमतेशी संबंधित आहेत. ते ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करतात.

फॅटी फिश (सॅल्मन) : हा मेंदूच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या ओमेगा-३ फॅटी अॅसिडचा प्रमुख स्रोत आहे. ओमेगा-३ मेंदूच्या संरचनेला आणि कार्यास मदत करतो, तसेच संज्ञानात्मक कार्याला प्रोत्साहन देतो.

ब्रोकोली : अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन केने समृद्ध ब्रोकोली मेंदूच्या निरोगी कार्याला मदत करते. त्यामध्ये संज्ञानात्मक कार्यक्षमतेशी जोडलेली संयुगेदेखील आहेत.

हळद : हळदीत कर्क्युमिन नावाचे सक्रिय संयुग असते. त्यामध्ये दाहकविरोधी आणि अँटीऑक्सिडंट्सचे फायदे आहेत; जे मेंदूच्या आरोग्याला फायदेशीर आहेत.

नट आणि बिया : अक्रोड, बदाम व फ्लेक्स सीड्समध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिडस्, अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ईने समृद्ध असतात. हे पोषक घटक मेंदूच्या संपूर्ण आरोग्यासाठी योगदान देतात आणि वयाशी संबंधित संज्ञानात्मक घट होण्यापासून संरक्षण करण्यास मदत करू शकतात.

सुपरफूडचा समावेश करणे फायदेशीर असले तरी संपूर्ण आहारातील संतुलन राखणे, हायड्रेटेड राहणे आणि नियमित शारीरिक हालचाली व पुरेशी झोप यांसह निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणेदेखील महत्त्वाचे आहे. त्याव्यतिरिक्त वैयक्तिक आहाराच्या गरजा भिन्न असू शकतात. त्यामुळे डॉक्टर किंवा पोषणतज्ज्ञाचा सल्ला घेऊन, योग्य आहाराद्वारे मेंदूचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मार्गदर्शन घेऊ शकता.