रात्रीची झोप आपल्यासाठी अत्यंत आवश्यक असते पण कित्येकदा आपली शांत झोप पायात अचानक तीव्र वेदना होते आणि आपली झोप मोड होते. याला पायात गोळा येणे किंवा क्रँप्स येणे असे म्हणतात. आपल्यापैकी कित्येकांनी ही परिस्थिती अनुभवली असेल. रात्रीच्या वेळी अचानक पायात येणाऱ्या क्रँप्समुळे आपल्याला असह्य वेदणा तर होतातच पण आपली झोप देखील खराब होते. वारंवार जर तुमच्यासोबत असे होत असेल तर तुमच्यासाठी हे अत्यंत त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे रात्रीच्या वेळी पायात अचानक क्रँप्स का येतात हे समजून घेऊन त्यावर योग्य उपचार घेणे आवश्यक आहे.

अमेरिकन फॅमिली फिजिशियन या वैद्यकीय नियतकालिकानुसार, ६० टक्के प्रौढांना रात्रीच्या वेळी पायात क्रँप्स येतात. याला muscle spasms असेही म्हणतात, जेव्हा पायातील एक किंवा अधिक स्नायू अनैच्छिकपणे घट्ट होतात तेव्हा ही परिस्थिती उद्भवते. तुम्ही जागे असताना किंवा झोपेत असताना हे होऊ शकते. बहुतेक वेळा, स्नायू १० मिनिटांत शिथिल होतात, पण कधीकधी ते झोपेमध्ये व्यत्यय आणू शकतात.

याच मुद्द्यावर रेडिओलॉजिस्ट सल्लागार डॉ. नुरी यांनी इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला. तुमच्या शरीरात कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांसारखी रसायने जास्त किंवा पुरेशी नसल्यामुळे या पायामध्ये क्रॅम्प होऊ शकतात.”

रात्रीच्या वेळी पायात क्रँप्स का येतात याचे स्पष्टीकरण देताना डॉ. नुरी सांगतात की, “नाईट पाय क्रॅम्प्स म्हणजे तुमच्या पायांमध्ये अनैच्छिक घट्ट होतात किंवा आकुंचन होतात. सामान्यतः, या पोटऱ्यांचे स्नायू घट्ट होतात. आणि त्यांना गॅस्ट्रोकेनेमिअस स्नायू म्हणूनही ओळखले जाते. तसेच काही प्रकरणांमध्ये, तुमच्या मांडीच्या पुढील स्नायू, ज्याला क्वाड्रिसेप्स म्हणून ओळखले जाते, ते पोटऱ्यांच्या स्नायूंवर देखील परिणाम करू शकतात किंवा मागील बाजूस मांडीचा भाग, ज्याला हॅमस्ट्रिंग म्हणून ओळखले जाते, हे देखील प्रभावित होऊ शकते.

प्रत्येक महिलेला तिच्या मासिक पाळीच्या कालावधीकडे लक्ष दिले पाहिजे, जाणून घ्या ५ कारणे

जेव्हा तुम्हाला पायात क्रँप्स येतात तुम्हाला काय जाणवते?

डॉ नूरी यांच्या मते, रात्रीच्यावेळी पायात येणारे क्रॅम्प्स म्हणजे तुमच्या पायात होणारे अनैच्छिक घट्ट किंवा आकुंचन. अशावेळी रात्रीच्या वेळी तुमच्या पायांमध्ये तुम्हाला घट्टपणा जाणवू शकतो किंवा गाठीसारखे वाटू शकते. म्हणून, तुम्हाला पायांच्या पोटऱ्यांचे स्नायूंमध्ये तीव्र वेदना जाणवेल जे त्या काळासाठी तणावपूर्ण आणि सतत होत असेल,”

रात्रीच्या वेळी पायात क्रँप्स का येतात?

रात्रीच्या वेळी पायात क्रँप्स येण्याचे नेमके कारण तज्ञांना माहित नाही. तुमच्या नसा तुमच्या स्नायूंना चुकीचे सिग्नल पाठवतात त्यामुळे असे होऊ शकते. उदाहरणार्थ, तुमचा मेंदू तुम्हाला स्वप्नात चुकून तुमचा पाय हलवायला सांगू शकतो. यामुळे तुमचे पोटऱ्यांचे स्नायू गोंधळतात आणि ते आकुंचन पावतात.

याबाबत, बंगळूरूचे फोर्टीस हॉस्पिटल, व्हॅस्कुलर अँड एंडो व्हॅस्कुलर सर्जरीचे वरिष्ठ सल्लागार, डॉ. के एन नागभूषण यांनी सांगितले की, “डिहायड्रेशन, स्नायूंचा थकवा, मज्जातंतूंचे नुकसान, काही औषधे आणि मधुमेह आणि परिधीय धमनी रोगसारख्या (peripheral artery disease) वैद्यकीय परिस्थितींसारख्या विविध कारणांमुळे ही स्थिती उद्भवू शकते. “

हेही वाचा : मधुमेहींमध्ये साखर वाढू नये म्हणून आंबा खाण्याचे 5 नियम

तुम्हाला पायात क्रँप्सच्या येण्याची शक्यता जास्त आहे जर :

  • 50 किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे असाल तर
  • तुमच्या स्नायूंना क्षमतेपेक्षा जास्त काम करावे लागत असेल तर
  • हालचाल न करता खूप वेळ बसून असाल तर
  • पुरेसे पाणी पित नसाल तर
  • कठीण पृष्ठभागावर खूप वेळ उभे राहत असाल तर
  • मधुमेह असेल तर
  • गर्भवती असाल तर
  • दारूच्या व्यसन असेल तर
  • अँटी-हायपरटेन्सिव्ह औषधोपचार किंवा अँटी-कोलेस्टेरॉल औषध घेत असाल तर
  • तुमच्या मज्जातंतूचे नुकसान झाले असेल तर
  • हायपोथायरॉईडीझम असेल तर

पायात येणाऱ्या क्रँप्सवर उपचार आणि उपाय

  • स्नायू ताणणे
  • तुमच्या अंथरुणातून बाहेर पडा आणि जमिनीवर पाय टेकवून उभे राहा
  • पायाला मसाज करा
  • तुमचा पाय वाकवा किंवा वळवा- हलचाल करा
  • तुमच्या पायाची बोटे पकडून स्वतःकडे ओढा
  • उबदार आंघोळ केल्याने स्नायूंमधील घट्टपणा कमी होऊ शकतो
  • कधीकधी घट्ट स्नायूंवर स्नायूंवर बर्फ लावल्यानेही फायदा होतो

डॉ नागभूषण यांच्या मते, इतर उपचारांमध्ये गरम पाणी किंवा थंड बर्फाने शेक देणे, वेदनाशामक औषधे आणि अंतर्निहित वैद्यकीय परिस्थितींचा समावेश होतो.

Diabetic Kidney: तुमच्या शरीरातील ही 5 लक्षणे दर्शवतात मधुमेही मूत्रपिंडाचा धोका

पायात क्रँप्स येणे कसे टाळता येईल?

रात्रीच्यावेळी पायांमध्ये येणाऱ्या क्रॅम्प्सपासून बचाव करण्यासाठी काही टिप्स आहेत, यामध्ये दिवसा आणि झोपण्यापूर्वी तुमच्या पोटऱ्यांचे आणि पायाचे स्नायू ताणणे, तळवे आणि पायांचा व्यायाम करण्यासाठी फिरणे, भरपूर पाणी पिणे, आरामदायक शूज घालणे आणि सैल कपडे घालून झोपणे यांचा समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ नागभूषण सांगतात की,“परिधीय धमनी रोग(Peripheral artery disease) हे काही लोकांमध्ये रात्रीच्या वेळी क्रँप्स येण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. या स्थितीकडे दुर्लक्ष केल्यास इस्केमिया आणि गॅंग्रीन सारख्या गंभीर गुंतागुंत होऊ शकतात. ज्या लोकांना सतत रात्रीचे क्रँप्स आणि पायांमध्ये सतत वेदना होत असतात त्यांनी त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी. साधे अल्ट्रासाऊंड स्कॅन हा धमनी रोग ओळखू शकतात आणि औषधोपचार किंवा पेरिफेरल अँजिओप्लास्टी सारख्या कमीतकमी आक्रमक प्रक्रियेमुळे क्रँप्स बरे होतात आणि मोठ्या गुंतागुंत टाळता येतात.