आपल्या रोजच्या जीवनशैलीत आहार हा खूप महत्त्वाचा असतो. आपण आहारामध्ये काय खातो, किती खातो, कधी आणि कसे खातो हे अत्यंत महत्त्वाचे असते कारण आपल्या आहाराचा शरीराच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. तुम्ही तुमच्या आहारात बऱ्याचदा अशा पदार्थांचा समावेश करता जे खाण्यापूर्वी भिजवले जातात पण असे करण्यामागीले कारण तुम्हाला माहित आहे का? नसेल तर काळजी करू नका आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुमच्या आहारात असे काही पदार्थ असतात ज्यांचे पौष्टिक मुल्य वाढविण्यासाठी आणि त्यांच्यातील उष्णता कमी करण्यासाठी त्यांना भिजवण्याची शिफारस केली जाते. तसेच त्यामुळे तुमच्या पोटाचे विकार टाळण्यास मदत होते आणि शरीराला अनेक फायदे देखील होतात. म्हणूनच तुम्हाला कोणत्या पदार्थांना खाण्यापूर्वी रात्रभर भिजवले पाहिजे हे माहित असले पाहिजे आणि या प्रक्रियेमागील फायदे -तोटे जाणून घेतले पाहिजे

१. कडधान्ये, डाळ आणि शेंगा ( बीन्स)

कडधान्ये, डाळ आणि शेंगा ( बीन्स) खाण्यापूर्वी पाण्यात भिजवल्याच पाहिजेत. असे केल्यानेत त्यातील फायटीक अॅसिड कमी होते ज्याला फायटेट म्हणूनही ओळखले जाते. फायटीक अॅसिड हे लोह , झिंक आणि कॅल्शिअम सारख्या प्रथिने आणि खनिजांना बांधून ठेवते ज्यामुळे शरीरात शोषले जाण्याची या पौषणमुल्यांची क्षमता कमी होते आणि आपल्याला शरीराला त्याचे फायदे मिळत नाही.

२. मेथी दाणे :

मेथीचे दाणे पाण्यात भिजवल्यामुळे त्यातील फायबर आणि त्याचे गुणधर्म वाढतात. तसेच पाण्यात भिजल्यामुळे पोट ते सहज पचवू शकते आणि आपली पचनक्रिया निरोगी राहते.

हेही वाचा: फ्रेंच फ्राईज खाताय? सावधान! नैराश्याला पडू शकता बळी, नव्या संशोधनातून समोर आला निष्कर्ष

३. बदाम आणि अळशी

बदाम आणि अळशी यांच्या सेवन करताना तुम्हाला त्यांच्यातून बाहेर पडणारे टॅनिन घटक टाळायचे असेल तर तुम्ही ते दोन्ही पदार्थ पाण्यात भिजवून खाऊ शकता. याशिवाय, दोन्ही पदार्थ पाण्यात भिजवून खाल्यामुळे त्यांच्यातील फायबर आणि न्युट्रीशिअट्स वाढतात. तसेच त्यातील प्रथिनांमुळे पोटातील उष्णता वाढत नाही.

४. आंबा

आंबा पाण्यात भिजवून खाल्यामुळे त्यातील उष्णता कमी होते. तसेच ज्यांना आंब्यातील उष्णतेमुळे त्वचेच्या समस्या होताता त्यांमुळे अशा परिस्थितीमध्ये, हा त्रास टाळण्यासाठी आंबे पाण्यात भिजवून खाण्याचा सल्ला दिला जातो.

हेही वाचा – ‘Best Before’ तारीख ओलांडलेले खाद्यपदार्थ खाणे सुरक्षित आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

५. मनुके

मनुके खाण्यापूर्वी ते भिजवल्यास शरीरातील लोहची पातळी वाढविण्यास मदत होते. तसेच, फायबर देखील वाढतात ज्यामुळे रुग्णाची बद्धकोष्टता आणि मुळव्याधाची समस्या दूर होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, अधिकच्या माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा)