scorecardresearch

Food that sharpens brain: लहान मुलांची स्मरणशक्ती वाढवायची आहे? आहारामध्ये करा ‘या’ पौष्टिक पदार्थांचा समावेश

हे पदार्थ खाल्यांचा मुलांना खूप फायदा होईल.

memory
(लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Diet for sharp memory: संतुलित आहार शारीरिक वृद्धीसाठी खूप आवश्यक असतो. आपण काय खातो यावर आपल्या आयुष्यातील बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. अवतीभवती सुरु असलेल्या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी शरीर निरोगी असणे आवश्यक असते. सध्याच्या पिढीसमोर देखील स्पर्धेची आव्हाने आहेत. आपल्या मुलांना या आव्हानांवर मात करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक स्थिरतेची गरज असते. शरीराची संपूर्ण वाढ होण्यासाठी काही ठराविक पदार्थांचा समावेश जेवणामध्ये असणे आवश्यक असते. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी व बौद्धिक सक्षमता प्रदान करण्यासाठी फायदेशीर असणाऱ्या पदार्थांची माहिती पुढे देण्यात आली आहे.

अंडी

लहान मुलांची बौद्धिक वाढ होण्यासाठी जेवणामध्ये अंड्याचा समावेश करावा. कोलीन, व्हिटामिन बी १२, प्रोटीन, सेलेनियम असे अनेक पौष्टिक घटक अंड्यांमध्ये असतात. त्यातील कोलीन या व्हिटामिनमुळे लहान मुलांच्या मेंदूची वाढ होते. शरीर सुदृढ राहण्यासाठी दररोज एक अंडे खाणे अतिशय आवश्यक आहे. अंडी खाल्याने पोट भरल्यासारखे वाटते. परिणामी खाण्यावर नियंत्रण राखण्यास मदत होते.

दही

मेंदू नीट कार्यरत राहण्यासाठी फॅट्सची गरज असते. दह्यामध्ये प्रोटीन्स आणि फॅट्स मुबलक प्रमाणामध्ये असतात. दही खाल्याचे शरीराला इतर फायदे देखील होत असतात. त्यामधील पॉलीफेनॉल्समुळे मेंदूपर्यंत रक्त प्रवाह पोहण्याचे प्रमाण वाढत जाते. दही पचनासाठीही उपयुक्त असते.

हिरव्या पालेभाज्या

लहान मुलांना हिरव्या पालेभाज्या खायला घालणे कठीण असते. पौष्टिकतेने परिपूर्ण असलेल्या हिरव्या पालेभाज्या खाल्याने मेंदूला चालना मिळते. पालक, मेथी अशा पालेभाज्या पचनासाठीही मदत करतात. त्यांमध्ये फोलेट, फ्लवनॉइड्स, कॅरटनॉइट्स, व्हिटामिन-ई आणि व्हिटामिन के १ अशा तत्त्वांचा समावेश असतो.

सुका मेवा

बदाम, काजू, खारीक अशा पदार्थांमध्ये व्हिटामिन ई, झिंक, फोलेट, आयर्न आणि प्रोटीन ही तत्त्वे असतात. सुका मेवा शरीरासाठी देखील उपयुक्त मानला जातो. या पदार्थांमुळे मेंदूला चालना मिळते.

मासे

मासे हे व्हिटामिन डीच्या प्रमुख स्त्रोतांपैकी एक आहेत. माश्यांमध्ये ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड्स असतात. या दोन्ही तत्त्वांमुळे बुद्धीला चालना मिळण्यास मदत होते. स्मरणशक्ती वाढावी यासाठी मासे खाण्याचा सल्ला दिला जातो.

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-02-2023 at 19:08 IST