Weight Loss Fruits in Marathi: वाढलेलं वजन कमी करणं म्हणजे बहुतांश लोकांसाठी ही मोठी समस्या असते. डाएट कोणतं फॉलो करावं, वर्कआउट काय करावं असे असंख्य प्रश्न अनेकांच्या मनात असतात. वजन कमी करत असताना एक समस्या सतत भेडसावते ती म्हणजे पोटाची चरबी. अनेकदा व्यायामाचा अभाव, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि बदलती जीवनशैली यामुळे लोकांचे वजन वाढण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. शिवाय बैठे काम वाढल्याने पोटाचा आणि कंबरेचा घेरही वाढलेला दिसतो. 

दिवसेंदिवस पोटावरच्या वाढत्या चरबीमुळे मधुमेह, हृदयविकार, फॅटी लिव्हर अशा समस्यांना सामोरे जावे लागते. यासाठीच पोटावरच्या वाढत्या चरबीकडे अजिबात दुर्लक्ष करु नये आणि ती कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. पोटाची चरबी कमी करणं इतकं सोपं नसतं, पोटाची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी प्रचंड घाम गाळावा लागतो. कमी-कॅलरीज पण पौष्टिक आहार घेणे यासाठी फार गरजेचे असते.

curd in any food be dangerous
कोणत्याही पदार्थांमध्ये दह्याचा सतत वापर करणं ठरू शकतं घातक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Shrimant Dagdusheth Halwai Ganpati latest news
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला तब्बल ११०० नारळांचा महानैवेद्य
Testy bhindi fry khatti mitthi bhindi lady fingars recipe for lunch or diner
भेंडीची खट्टी -मीठी भाजी; ती पण चिकट न होता! पाहा सोपी मराठी रेसिपी
issue of air and noise pollution increase in Thane during Diwali
ठाण्यात दिवाळी काळात हवा आणि ध्वनी प्रदुषणात वाढ, गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत प्रदुषणात घट झाल्याचा पालिकेचा दावा
What is the Leidenfrost effect
Leidenfrost Effect : जेवण बनवण्यासाठी स्टेनलेस स्टीलचा पॅन वापरताय? मग नक्की जाणून घ्या ‘या’ हॅकबद्दल
Seaweed imports What is the use of the element What is the benefit of this decision of the central government
चक्क समुद्र शैवालाची आयात? या घटकाचा उपयोग काय? केंद्र सरकारच्या या निर्णयाचा किती फायदा?
What is the right time to have breakfast
सकाळी ८ ते १० नाही, तर नाश्त्याची ही वेळसुद्धा ठरू शकते फायदेशीर? वाचा तज्ज्ञांचे मत…

डाॅक्टर सांगतात, आहारात तुम्ही जास्तीत जास्त फळांचा समावेश केला पाहिजे. बर्‍याच फळांमध्ये कॅलरीज कमी असतात आणि फायबर भरपूर असतात, जे वजन कमी करण्यास मदत करतात. पण कोणते फळ खाणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते, पपई, संत्री की सफरचंद, कोणते फळ खाल्यास पोटाची वाढलेली चरबी कमी होण्यास मदत होऊ शकते, याच विषयावर अपोलो हॉस्पिटल्सच्या मुख्य पोषणतज्ञ डॉ. प्रियंका रोहतगी यांनी इंडियन एक्स्प्रेसला माहिती दिली आहे.

(हे ही वाचा : पोहण्याने रक्तातील साखर वेगाने कमी होते का? जाणून घ्या डाॅक्टरांचे मत…)

डॉक्टर सांगतात, निरोगी आरोग्यासाठी रोज एक किंवा दोन म महत्वाचं असते. आपल्या आरोग्याशी संबंधित कित्येक समस्यांवर नैसर्गिक औषधोपचार म्हणून फळे खाणे फायदेशीर ठरते. फळे आपल्या शरीराला ऊर्जा पुरवतात तसेच शरीर निरोगी ठेवण्याचे काम करतात, त्यामुळे आपण फळे खाण्यास जास्त पसंती देतो. काही फळांमध्ये वजन कमी करण्याचे गुणधर्म असतात. भरपूर जीवनसत्त्वे, फायबरसह इतर अनेक पोषक घटक अशा असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी फळे खाल्ल्याने फायदा होतो. तसेच, मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, हृदयविकार होण्याची शक्यताही कमी होते.

फळांचे रस काढण्यापेक्षा ते थेट सेवन करणे अधिक फायदेशीर असतात, असे त्या सांगतात. फळं ही आरोग्यासाठी गुणकारी मानली जातात. नैसर्गिक साखर आणि जास्त प्रमाणात फायबर हवे असल्यास, तुम्ही नियमित ताजी फळं नाश्त्यामध्ये खावीत. फळं हा फायबरचा उत्तम सोर्स आहे.

फायबर समृद्ध  

सफरचंदमध्ये फायबर खूप जास्त असते. सफरचंद वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असल्याचेही अनेक अभ्यासांमध्ये आढळून आले आहे. सफरचंद खाणे हृदयाच्या आरोग्यासाठीही चांगले आहे. नियमित सेवन केल्यास फायदे मिळतात. सफरचंद, बेरी आणि नाशपाती यांसारखी फळे फायबरने समृद्ध असतात. हे केवळ पचनास मदत करत नाही तर भूक नियंत्रित करण्यास देखील मदत करतात, हे रक्तातील साखरेचे नियंत्रण राखण्यास देखील मदत करते. याशिवाय, फायबर्स तुमच्या शरीरातून खराब कोलेस्ट्रॉलही बाहेर काढतात.

लिंबूवर्गीय फळ

लिंबूवर्गीय फळे जसे की द्राक्ष आणि संत्री त्यांच्या कमी-कॅलरी सामग्री आणि उच्च व्हिटॅमिन सी पातळीसाठी ओळखले जातात. या लिंबूवर्गीय फळांचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. आहारात या फळांचा समावेश केल्यास तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढते. एका अभ्यासाने असे सुचवले आहे की, व्हिटॅमिन सी चरबीच्या चयापचयात भूमिका बजावू शकते, ज्यामुळे पोटातील चरबीविरूद्धच्या लढाईत ही फळे मोठी भूमिका बजावू शकतात. संत्री फायबरचा एक समृद्ध स्रोत देखील आहे ज्यामुळे आतड्याची हालचाल सुलभ होते, आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि वजन कमी करण्यास मदत मिळते. वजन कमी करण्यासाठी हे एक फायदेशीर फळ असून यामध्ये व्हिटॅमिन सी, कॉपर, झिंक यांसारखे पोषक घटक असतात.

(हे ही वाचा : बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करण्यासाठी रोज करा ‘ही’ ३ योगासने; योगतज्ज्ञ म्हणतात, काही मिनिटांत दूर होईल समस्या!)

पपई

पपई या फळाचे आजवर तुम्ही असंख्य फायदे ऐकले असतील. पपईमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि फायबर उपलब्ध असतं. रोज सकाळी पपई खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत होते. वास्तविक, त्यात कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते. रोज सकाळी पपई खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत होते. पपईमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण खूप कमी आहे. पपईमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ईसह अनेक जीवनसत्त्वे असतात. यातील सर्व जीवनसत्त्वे आणि खनिजे वजन कमी करण्यास मदत करतात.

खरंतर, फळे पोटाची चरबी कमी करण्यास मदत करू शकतात, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, कोणतेही फळ वजन कमी करण्यासाठी कोणताही चमत्कार करु शकत नाही. यासाठी तुम्हाला फळांबरोबरच संतुलित आहार, नियमित व्यायाम, भरपूर पाणी पिणे फार महत्त्वाचे आहे, असे डाॅक्टर सांगतात.