अनेकदा आपण दूध आणि दह्यासोबत फळे खाण्याचीही सवय असते. दुधात फळे मिसळून शेक बनवला जातो, फळांचे कस्टर्ड दह्यासोबत बनवले जाते. दूध आणि दहीमध्ये फळे मिसळणे ही एक सामान्य गोष्ट आहे, परंतु तुम्हाला माहित आहे का की फळांसोबत दूध आणि दही खाणे फायदेशीर कमी आणि आरोग्यासाठी जास्त हानिकारक आहे. आयुर्वेद प्रशिक्षक डॉ. डिंपल जांगडा यांनी इंस्टाग्रामवर सांगितले आहे की दूध आणि दह्यासह फळांचे सेवन आरोग्यासाठी धोकादायक आहे.

एक्सपर्टने सांगितले दुधासोबत लिंबूचे सेवन केल्याने नक्की काय होते? तज्ज्ञांनी स्पष्ट केले की सर्व फळांमध्ये सायट्रिक ऍसिड, मॅलिक ऍसिड, टार्टरिक ऍसिड आणि फ्युमॅरिक ऍसिड सारखी एन्झाईम्स आणि ऍसिड असतात. हे सर्व एन्झाम्स आणि ऍसिडस् दुग्धजन्य पदार्थांमध्ये आढळणाऱ्या लॅक्टिक ऍसिडमध्ये चांगले मिसळत नाहीत.

Fatty Liver Can Happen Without Drinking Alcohol Check These Changes Signs
मद्यपान न करताही होतो फॅटी लिव्हर; भूक, लघवीचा रंग व त्वचेसह ‘या’ ८ बदलांमधून शरीर देतं संकेत, उपचार काय?
speech fasting benefits if you stay silent for an entire day this is what happens to your body
तुम्ही पूर्ण दिवस न बोलता शांत राहिल्यास शरीरात नेमके काय बदल होतात? जाणून घ्या ‘स्पीच फास्टिंग’चे फायदे
gut health diet
आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी ‘या’ बाबी आवश्यक; अन्यथा पोटाची दुर्दशा
पाणी किंवा चहात फक्त १५ मिली ‘हे’ द्रव घातल्यास कंबरेचा घेर व वजन होईल कमी; नवीन अभ्यास काय सांगतो?

( हे ही वाचा: यूरिक ॲसिड झपाट्याने नियंत्रणात आणेल ‘या’ कडू भाजीचा रस; जाणून घ्या या चमत्कारिक भाजीबद्दल..)

दूध, दही आणि पनीर सोबत काही फळे खाल्ल्याने आतड्याची वरची लेयर होऊ शकते. या पदार्थांचे एकत्र सेवन केल्याने तुमच्या शरीरात न पचलेला मेटाबॉलिक कचरा जमा होतो. या पदार्थांचे एकत्र सेवन केल्यास त्वचेचे नुकसान होऊ शकते. दुध आणि दही सोबत फळांचे सेवन केल्याने आरोग्यावर होणारे विषासारखे परिणाम तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

तज्ज्ञांच्या मते, हे पदार्थ एकत्र करून खाल्ल्याने आरोग्याला हानी पोहोचू शकते. हे पदार्थ पचनसंस्था खराब करू शकतात, त्वचेचे विकार वाढवू शकतात आणि आतड्यांसंबंधी समस्या निर्माण करू शकतात.

( हे ही वाचा: Acidity आणि Gas मधला नेमका फरक काय? झटपट आराम मिळवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय ट्राय करा)

  • फळे आणि दूध
  • फळे आणि दही
  • डेअरी आणि चिंच
  • डेअरी आणि चिंच
  • फळे आणि व्हिनेगर
  • डेअरी आणि टोमॅटो

चुकूनही ‘ही’ फळे दूध आणि दह्यासोबत खाऊ नका

  • सफरचंदात मॅलिक अॅसिड, टार्टेरिक अॅसिड आणि फ्युमेरिक अॅसिड असते, त्यामुळे दुधासोबत खाऊ नका.
  • जर्दाळूमध्ये मॅलिक अॅसिड, टार्टरिक अॅसिड आणि सायट्रिक अॅसिड असते, दुधासोबत सेवन करू नका.
  • चेरी आणि द्राक्षांमध्ये मॅलिक अॅसिड आणि टार्टरिक अॅसिड असते, ते एकच खा.
  • द्राक्षे, पेरू, चुना, लिंबू आणि संत्र्यामध्ये सायट्रिक अॅसिड आणि मॅलिक अॅसिड असते, ते एकटेच खा.
  • आंब्यामध्ये सायट्रिक ऍसिड, मॅलिक ऍसिड आणि टार्टेरिक ऍसिड असते, ते फक्त सेवन करा.