Gut Health: आपली गट हेल्थ अर्थात आतड्यांचे आरोग्य आपल्या एकूण आरोग्यावर थेट परिणाम करते हे खपू कमी लोकांना माहीत असते. जर आतडे योग्य पद्धतीने काम करत नसेल तर शरीरात दीर्घकालीन दाह वाढू शकतो, त्यामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात.
गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. पॉल माणिकम यांनी असे पाच पदार्थ सांगितले आहेत, ज्यामुळे तुमच्या आतड्यांचे आरोग्य खराब होऊ शकते. त्यांनी सांगितलेले हे पदार्थ प्रमाणाबाहेर खाल्ल्यास गंभीर धोका होऊ शकतो. दर दोन-तीन महिन्यांपेक्षा एकदा किंवा त्याहून कमी वेळा खाल्यास फारसा धोका नाही. चला तर मग जाणून घ्या हे कोणते पदार्थ आहेत…
प्रोसेस केलेले मांस
सॉसेज, बेकन, हॉट डॉग आणि डेली मीट चवीला चविष्ट वाटतात, पण त्यात अनेक हानिकारक घटक असतात. त्यात मीठ, नायट्रेट्स, प्रिझर्व्हेटिव्ह आणि सॅच्युरेटेड फॅट जास्त असतात. त्यामुळे आतड्यांमध्ये जळजळ वाढू शकते. तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, हे मांस पचायला कठीण असते आणि त्यामुळे कोलन कर्करोगाचा धोकादेखील वाढू शकतो.
जर तुम्ही मांसाहारी पदार्थ खात असाल तर तुमच्या आहारात कमी चरबीयुक्त मांस निवडणे किंवा वनस्पती आधारित प्रथिने समाविष्ट करणे चांगले. हे तुमच्या पचनसंस्थेसाठी आणि हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहे.
साखरयुक्त पेये
सॉफ्ट ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स किंवा पॅकेज्ड ज्यूसमुळे तात्काळ ऊर्जा मिळते, पण ते कोणतेही पोषक त्तव देत नाहीत. त्यातील साखरेचे प्रमाण जास्त असल्याने आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांना नुकसान होते, त्यामुळे जळजळ होते आणि अनेक आरोग्य समस्या उद्भवतात. या पेयांचे वारंवार सेवन केल्याने इन्सुलिन प्रतिरोध, लठ्ठपणा, मधुमेह आणि फॅटी लिव्हर सारख्या आजारांचा धोका वाढतो. तज्ज्ञ स्पष्ट करतात की, जास्त साखरेचे पेय रक्तातील साखरेचे प्रमाण लगेचच वाढवतात. मात्र, काही काळानंतर ती झपाट्याने कमी होते. यामुळे थकवा येतो आणि वारंवार गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते. जर तुम्हाला गोड पदार्थ खाण्याची इच्छा होत असेल, तर आठवड्यातून एकदा गोड पदार्थ खा किंवा दररोज तुमच्या आवडत्या फळांपैकी एक फळ खा.
अतिप्रक्रिया केलेले अन्न
रेडी टू इट पॅकेज किंवा जेवण हे फक्त जंक फूड नाही, तर ते कार्बोहायड्रेट्स, वाईट चरबी, प्रिझर्व्हेटिव्ह आणि रासायनिक पदार्थांनी भरलेले अशतात. या पदार्थांमध्ये फायबरचे प्रमाण कमी असते, जे आपल्या आतड्यांना स्वच्छ ठेवण्यासाठी आणि चांगल्या बॅक्टेरियांना प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक आहे. हे पदार्थ वारंवार खाल्याने आतड्यांचे निरोगी अस्तर कमकुवत होते आणि आयबीएस (इरिटेबल बोवेल सिंड्रोम), लठ्ठपणा आणि मेटाबॉलिक सिंड्रोम सारख्या समस्या उद्भवू शकतात.
आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याऐवजी संपूर्ण अन्न ताजे, कमीत कमी प्रक्रिया केलेले खा. यामुळे आतड्यातील सूक्ष्मजीवांचे संतुलन राखण्यास मदत होते.
रिफाइंड पीठ (मैदा)
ब्रेड, पेस्ट्री, पिझ्झा आणि बेकरी आयटममध्ये वापरल्या जाणाऱ्या रिफाइंड मैद्याचे उत्पादन करताना त्याचे फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे नष्ट होतात. हे पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढू शकते, त्यामुळे इन्सुलिन प्रतिरोध आणि लठ्ठपणासारख्या समस्या उद्भवू शकतात. रिफाइंड मैद्यामध्ये फायबरचे प्रमाण कमी असल्याने ते पचनक्रिया मंदावते आणि बद्धकोष्ठता वाढवते.
तज्ज्ञांनी रिफाइंड पीठाऐवजी संपूर्ण धान्याचे पीठ (गहू, बार्ली किंवा मल्टीग्रेन पीठ) वापरण्याची शिफारस करतात. यामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतील, आतडे स्वच्छ राहतील आणि चांगले बॅक्टेरिया मजबूत होतील.
