“पल्लवी हॅलो तू सांगितलेल्या प्रमाणे गेले सहा महिने नियमितपणे खोबरेल तेलाने चूळ भरतोय . बॅड ब्रेथ आणि आणि हिरड्यांच दुखणं देखील कमी झालेय. आय थिंक हे खोबरेल तेल मला सुट होतंय! इट्स मॅजिकल थँक्यू सो मच!” अक्षयचा ऑडिओ मला मेसेज आला होता .
बहुगुणी आणि आरोग्यदायी नारळाचं तेल आपण मधल्या काळात स्वयंपाक घराबाहेरच ठेवून दिलं होतं. नारळाच्या तेलाचं दैनंदिन भारतीय आयुष्यातील महत्त्व अनेकदा अधोरेखित करावं लागतं.

नारळाचं तेल आणि त्याचे वेगवेगळे उपयोग
गेले आठवडाभर नारळ आणि त्याच्या विविध उपयोगांबद्दल आपण वाचलं असेलच. दोन तारखेला जागतिक नारळ दिवस सुद्धा आहे ( होय असा दिवस असतो ) तर त्या निमित्ताने खोबरेल तेला बद्दल फायदे जाणून घेण्यासाठी आजचा दिवस नक्कीच योग्य आहे. नारळाचं तेल हळूहळू आपल्या आहारात येतंय याचा एक वेगळच समाधान माझ्या मनात आहे.

१०० % स्निग्ध पदार्थ असणार नारळाच्या तेलामध्ये या सॅच्युरेटेड फॅट्स मधील लॉरीक ऍसिड तसेच मेरिस्टिक आणि पाल्मेटिक ऍसिड अत्यंत कमी प्रमाणात असतात विचार ज्याने खरंतर वाईट कोलेस्ट्रॉल वाढू शकते मात्र नारळाच्या तेलामध्ये कोलेस्ट्रॉल किंवा तंतुमय पदार्थ यांसारखा कोणताही पदार्थ नसल्यामुळे नारळाचं तेल उपयुक्त असतं. नारळातील तेलामध्ये शंभर टक्के मिडीयम चेन ट्रायग्लिसेराईड्स ज्याला आपण इंग्रजी मध्ये “एम सी टी”(MCT ) असे म्हणतात आपल्या यकृतासाठी अत्यंत उपयुक्त असतात. त्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा असा की तुम्हाला उत्तम भूक लागते आणि तुमच्या शरीरामध्ये चरबीचे प्रमाण साठले जात नाही. ज्या वेळी नारळाचं नारळाचं क्रीम किंवा नारळाचं तेल नारळाचं नारळाची साय किंवा नारळाचं तेल तुमच्या आहारात नेमक्या प्रमाणात वापरलं जातं त्यावेळेला आहाराचे संपूर्ण पोषणमूल्य उत्तम वाढते. नारळाच्या तेलाचा संशोधनामध्ये असे आढळून आलेले आहे की नारळाचे तेल नियमितपणे आहारात वापरणाऱ्यांमध्ये हृदयाचे आरोग्य जपले जाते . आहे तसेच नारळाचे तेल खूप जास्त ऊर्जा असतात पूर्ण पणे असल्यामुळे म्हणजे जवळपास १२० कॅलरी इतकी ऊर्जा आणि चौदा ग्राम इतके स्निग्ध पदार्थ एक चमचा नारळ तेलामध्ये असतात

नारळाच्या तेलाचे विविध प्रकार आढळतात
वर्जिन खोबरेल तेल : ज्याच्यामध्ये नारळाची साय आणि त्यातील नारळातील तेल असे दोन प्रकार वेगळे केले जातात आणि अतिशय जास्त स्मोकिंग पॉईंटला येणारे वर्जिन कोकोनट तेल कायम तळण्यासाठी चांगले आहेत.
कोल्ड प्रेसड : कोणत्याही प्रकारच्या उष्णतेचा उपयोग न करता 120 डिग्री सेल्सिअस पर्यंत नारळाच्या तेलाचे उत्पादन केले जाते या तेलामध्ये सगळ्यात जास्त पोषण मूल्य असल्याचे आढळून आलेले आहे.
रिफाइन खोबरेल तेल : ज्यामध्ये खोबऱ्याला मशीनच्या सहाय्याने प्रेस करून किंवा एका प्रकारे ब्लिचिंग करून तेल तयार केले जाते यामध्ये कोणत्याही प्रकारच्या बॅक्टेरिया चा समावेश असत नाही आणि या तेलाला सगळ्यात जास्त स्मोकिंग पॉईंट मध्ये म्हणजेच तुम्हाला जर 400 ते 450 डिग्रीपर्यंत तेलाचा स्मोकिंग पॉईंट हवं असेल तर रिफाइंड कोकोनट ऑइल वापरले जाऊ शकतात.
अर्धवट हायड्रोजिनेटेड कोकोनट तेल : याच्यामध्ये मात्र मोठ्या प्रमाणात ट्रान्स फॅट्स असल्यामुळे या प्रकारचे खोबरेल तेल खाणे टाळावे नारळाच्या तेलाचा मेल्टिंग पॉईंट हा ७८° पर्यंत असतो . आपल्याला ते वापरताना व्यवस्थित सांभाळून वापरावा लागतो.

खोबरेल तेलासोबत कोणत्याही इतर प्रकारचे तेल एकत्र करणे शक्यतो टाळावे. ज्यांना सकाळी उठून कॉफी प्यायची सवय आहे त्यांच्यासाठी कॉफीमध्ये खोबरेल तेल एकत्र करून पिणे उत्तम पेय आहे. शरीरातील इन्शुलिन वर अंकुश ठेवणे, आतड्याचे आरोग्य उत्तम ठेवणे यासारखे परिणाम मिळतात. दिवसभराच्या भुकेचा नेमका अंदाज येण्यासाठी खोबरेल तेलाचा उत्तम फायदा होतो.

ज्यांना अस्थमा आहे त्यांच्यासाठी किमान १ चमचा कॅब्रेल तेल रोजच्या आहारात असणे आवश्यक आहे. त्वचेचे तेज आणि केसांच्या आरोग्यासाठी देखील खोबरेल तेल आहारात असणे गुणकारी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्हाला माहिती आहे का की फिलिपिन्स मध्ये सगळ्यात जास्त नारळाचे तेल बनत त्यानंतर इंडोनेशिया आणि मग आपल्या भारताचा क्रमांक लागतो. दक्षिण भारतात आणि पश्चिम भारत नारळ आणि खोबरेल तेलाच्या वापर मोठ्या प्रमाणात आढळून येतो. तुमच्या घरात खोबरेल तेलाचा आहारात वापर होतो का?