नुकताच नवरात्रोत्सव सुरू झाला आहे. कित्येक लोक नऊ दिवस उपवास करतात. कोणी फक्त पाणी पितात, कोणी फक्त फळे खाऊन उपवास करतात. पण, उपवास करताना काही अशा चुका आपण सर्व जण करतो, ज्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

उपवासाच्या काळात पारंपरिक पद्धतीने काही ठराविक पदार्थ खाण्याची परवानगी असते. मात्र, या मर्यादित पदार्थांमध्येही काही पदार्थ असे असतात अशा असतात, जे उपवासाचे आरोग्यदायी फायदे कमी करू शकतात.

जास्त स्टार्च व कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ, तळलेले पॅकेज्ड उपवास स्नॅक्स अशा छोट्या चुकादेखील सणासुदीच्या काळात आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात.

यंदा योग्य निवड करता यावी यासाठी आम्ही तज्ज्ञांशी संवाद साधला. उपवासात लोकांकडून होणाऱ्या ५ सर्वसाधारण चुका कोणत्या आणि त्याऐवजी घरगुती पर्याय कोणते निवडता येतील हे जाणून घ्या.

उपवासात करताना लोक करतात या ५ सर्वसामान्य चुका आणि त्यावर उपाय (5 common fasting mistakes that people make and how to overcome them)

NutroDynamixच्या संस्थापक, पोषणतज्ज्ञ अदिती प्रभू दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगतात की, “योग्य पद्धतीने उपवास केल्यास आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात.” पण, अनेकदा काही छोट्या चुका लोकांकडून नकळत होतात, ज्यामुळे उपवासाचे फायदे कमी होतात. त्या चुका आणि त्यावरचे उपाय असे आहेत –

चूक १ : आहाराचे नियोजन न करणे

उपाय – जेवणाचे वेळापत्रक आणि मेनू आधीच ठरवून ठेवल्यास दीर्घकाळाची भूक, जास्त खाणे किंवा ऊर्जा कमी होणे टाळता येते.

चूक २ : प्रथिनांकडे दुर्लक्ष करणे

उपाय – प्रथिने (प्रोटीन) हे पोटभर दीर्घकाळ भरलेले राहण्यासाठी आणि साखरेच्या चढ-उतारांपासून वाचवण्यासाठी महत्त्वाचे असतात, म्हणून उपवासात प्रथिनेयुक्त पदार्थ नक्की खावेत.

चूक ३ : फळे जास्त प्रमाणात खाणे योग्य समजणे

उपाय –फळे आरोग्यदायी आहेत, पण दिवसभर मर्यादा न ठेवता खाल्ल्यास साखरेची पातळी वाढू शकते. फळे खाण्याचे प्रमाण ठरवून त्याबरोबर सुका मेवा, काही बिया किंवा दुग्धजन्य पदार्थ घेणे जास्त फायदेशीर ठरते.

चूक ४ : चुकीच्या पद्धतीने द्रवपदार्थ घेणे

उपाय – उपवासात जास्त प्रमाणात चहा, कॉफी, ज्यूस किंवा लस्सी घेतल्यास भूक कमी होते, आम्लपित्त होते किंवा साखर वाढू शकते. त्याऐवजी पाणी, नारळपाणी, ताक किंवा हर्बल/फ्लोरल टी घ्यावेत.

चूक ५ : जास्त प्रमाणात स्टार्चयुक्त, तळलेले आणि पॅकेज्ड पदार्थ खाणे

साबुदाणा खिचडी, बटाट्याच्या टिक्की, उपवासाचे चिवडे- खारे पदार्थ यामध्ये कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि मीठ जास्त असते, पोषक घटक मात्र कमी असतात. त्याऐवजी घरगुती पदार्थ खाणे, भाजणे, वाफवणे किंवा एअर फ्रायिंगसारख्या आरोग्यदायी पद्धती वापराव्यात

उपवासाच्या आहारात पुरेसे प्रथिन (Protein) कसे घ्यावे?(How to get enough protein in a fasting diet?

पोषणतज्ज्ञ अदिती प्रभू सांगतात की, उपवासातही प्रथिनांचा समावेश करणे शक्य आहे. यासाठी आहारात ग्रीक दही, ताक, पनीर, राजगिरा, कुटू (बकव्हीट), सुका मेवा आणि काही बिया यांचा समावेश करावा. काही लोक मुगडाळ उपवासादरम्यान खातात, जी प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. गरज असल्यास प्रमाणात सुरक्षित व्हे प्रोटीन सप्लिमेंटदेखील घेतले जाऊ शकते.

पॅकेज्ड स्नॅक्सऐवजी घरगुती आरोग्यदायी पर्याय (Homemade healthy alternatives to packaged snacks)

प्रभू सांगतात, “सुविधेसाठी अनेक जण पॅकेज्ड उपवास स्नॅक्सवर अवलंबून राहतात, पण त्याऐवजी घरगुती आरोग्यदायी पदार्थ वापरल्यास पोषण आणि समाधान दोन्ही मिळते.”

भाजलेले मखाने, सुका मेव्यासह राजगिरा चिवडा, राजगिरा लाडू,सुका मेवा आणि बियांचा हलका, पौष्टिक मिश्रण, सुक्या मेव्याची चिक्की, फळांबरोबर ग्रीक योगर्ट, चिया पुडिंग, फळांबरोबर नट बटर, भाजलेले किंवा एअर-फ्राईड रताळे, सामा ढोकळा आणि राजगिरा थालीपीठ हे काही चांगले आणि सोपे पर्याय आहेत. हे पदार्थ बनवायला सोपे असून पोषणमूल्यांनी समृद्ध असल्यामुळे उपवासात ऊर्जा, समाधान आणि चव यांचा उत्तम संगम साधला जातो