तुम्हालाही हेडफोन लावून किंवा तुमच्या आवडीची गाणी ऐकत चालण्याची सवय असू शकते. परंतु, ही पद्धत शारीरिक व्यायामाचे फायदे मिळवण्याचा आदर्श मार्ग असू शकत नाही. कारण असा व्यायाम केल्यामुळे तुमचे लक्ष विचलित होते आणि मन एकाग्र होण्याऐवजी ते भरकटते. जेव्हा आपण स्वतःला शांत करतो आणि कोणत्याही बाह्य प्रभावापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो, यावेळी आपण बरीच ऊर्जा वाचवतो, जी सामान्यपणे बोलताना किंवा कोणत्याही प्रकारच्या क्रिया करण्यासाठी वापरतो. शिवाय जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा तुमचे मन शांत स्थितीत असते. यामुळे तुमची ऊर्जा वाचते, शिवाय मन एकाग्र व्हायलादेखील मदत होते. यासाठीच लोक आजकाल “सायलेंट वॉक”ची चर्चा करताना दिसत आहेत. तर जेव्हा तुम्ही स्वतःला उपकरणांपासून डिस्कनेक्ट करता तेव्हा चालण्याचे फायदे जास्त प्रमाणात होतात. तर चालण्याचे नेमके फायदे आणि सायलेंट वॉक याबाबतची सविस्तर माहिती आरोग्यतज्ज्ञ डॉ. मिकी मेहता यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सविस्तर दिली आहे ती जाणून घेऊ या.

सायलेंट वॉक काय आहे?

सायलेंट वॉक ही एक साधी संकल्पना असून यामध्ये केवळ शांत चित्ताने चालण्याचा समावेश आहे. नियमित चालण्याच्या विरूद्ध म्हणजेच मनोरंजन, किंवा व्यायामाच्या उद्देशाने न चालता केवळ शांत चित्ताने चालण्याचा सराव करणे म्हणजे सायलेट वॉक. ज्यामध्ये सभोवतालच्या वातावरणाची जाणीव ठेवून फक्त शांतपणे चालत राहणे हेच एकमेव ध्येय असते.

सायलेंट वॉक करताना तुम्ही श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित केल्याने किंवा समुद्र, पाणी आणि पक्ष्यांचे आवाज ऐकल्याने ऊर्जेची आरामदायी तरंग निघतात, जे तुमचे पोषण करण्यासह तुमचे हार्मोन्स नियंत्रित करण्यास मदत करतात. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जंगलात थोडं अंतर चालण्याचाही शरीरावर आणि मनावर सकारात्मक प्रभाव पडतो. २०२३ मधील एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, शहरी उद्यानात ३० मिनिटांच्या चालण्यामुळे नकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करण्याचा लोकांचा वेळ कमी झाला आहे. शिवाय शांतता मेंदूच्या विकासाला चालना देते आणि मन शांत केल्याने मेंदू निरोगी होऊ शकतो.

हेही वाचा- चारपैकी एका व्यक्तीला होतोय उच्च रक्तदाबाचा त्रास, लक्षणे न दिसताच कसा वाढतो धोका? हृदयरोगतज्ज्ञ सांगतात… 

सायलेंट वॉक फायदे काय आहेत?

ग्राउंडिंग : शांत चित्ताने अनवाणी चालण्यामुळे तुम्हाला ग्राउंडिंगमध्ये मदत होते. तुमची नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि शारीरिक आणि मानसिक संतुलन सुधारण्यास मदत होते. अर्थिंग समर्थकांचा दावा आहे की, ही पद्धत तुमचा मूड सुधारू शकते, झोप वाढवू शकते आणि जळजळ कमी करू शकते. या पद्धतीचा अजूनही वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास सुरू आहे. तसेच निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारू शकते. या सर्वसाधारण समजुतीनुसार सायलेंट वॉक हा ट्रेंड योग्य आणि फायदेशी आहे.

तणावमुक्ती : शांत राहणे हा तणावमुक्त होण्याचा एक उत्तम मार्ग आहे. जे लोक आजूबाजूला मोठा आवाज सुरू असताना काम करतात, त्यांच्यात तणावाला कारणीभूत ठरणारे कोर्टिसोल या संप्रेरकाची पातळी वाढत असल्याचे लक्षात आले आहे. तर शांत चित्ताने चालल्यामुळे प्रसन्न भावनेची अनुभूती देणारे एंडोर्फिन (एंडोर्फिन हे शरीरातील तणाव आणि वेदना कमी करण्यासाठी तयार केले जाणारे केमिकल आहे. ) तयार होते. ज्यामुळे अशा प्रकारचे चालणे मज्जासंस्थेला शांत करण्यास मदत करते.

भावनिक नियंत्रण : नियमितपणे सायलेंट वॉक केल्याने भावना नियंत्रित होण्यास मदत होऊ शकते. यामुळे लोक त्यांच्या भावना अधिक प्रभावीपणे समजू शकतात आणि त्या नियंत्रितही करू शकतात.

रक्तदाब नियंत्रण : उच्च रक्तदाबाला अनेकदा ‘सायलेंट’ किलर म्हटले जाते. पण, सायलेंट वॉक केल्याने म्हणजेच शांत चित्ताने चालल्यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते.

डिजिटल डिटॉक्स : ज्या वयात स्क्रीन आपल्या जीवनावर राज्य करतात त्यावेळी सायलेंट ट्रोल इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून आपल्याला आवश्यक विश्रांती देण्यास मदत करते. तसेच तंत्रज्ञानापासून दूर राहण्यासाठी आणि बाहेरील जगाशी संवाद साधण्यासाठी प्रेरित करते.

एकाग्रता : एकाच वेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे आपल्या कामाची गती आणि शांतता वाढविण्यास मदत होते. जेव्हा आपण एका वेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपलं मन भरकटत नाही. त्यामुळे मन स्थिर राहते आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते.

हेही वाचा- दारू, सिगारेट ओढणाऱ्या तरुणांना हाय ब्लड प्रेशरचा सर्वाधिक धोका? डॉक्टरांनी सुचवले बचावासाठी ‘हे’ उपाय 

झोपेची गुणवत्ता सुधारते : शांतता मेंदूच्या विकासास चालना देतात आणि तणाव कमी करण्यात खूप मदत करते. शांतपणे काम केल्यामुळे लोकांना खूप आराम मिळतो, ज्यामुळे त्यांचा तणाव कमी होतो आणि तणाव कमी झाल्यामुळे आपोआप झोपेची गुणवत्ता सुधारते.

वर्तमानातात राहणे : आपण शांत राहिल्यास वर्तमानातील क्षण उपभोगण्याची संधी मिळते. तसेच मन शांत होऊ शकते आणि शरीर त्याची पॅरासिम्पेथेटिक (पॅरासिम्पेथेटिक मज्जासंस्था पचन कार्य सुरळीत ठेवण्यास मदत करते.) स्थिती पुन्हा सुरू करू शकते. सायलेंट वॉक हे ध्यानाचे साधन बनू शकते.