कच्चे किंवा शिजवलेले रताळे खायला अनेकांना आवडते. उपवास असताना शिजवलेले रताळे खाल्ले जाते, यामुळे पोट भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. रताळ्यांमध्ये अनेक पोषकतत्त्व आढळतात. रताळ्यामध्ये कार्बोहायड्रेट, स्टार्च, प्रोटीन, पोटॅशिअम, विटामिन ए, विटामिन ई, मॅग्नेशिअम भरपूर प्रमाणात आढळते. पण काही आजारांमध्ये रताळे खाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. कोणते आहेत ते आजार जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या आजारांमध्ये रताळे खाणे ठरू शकते धोकादायक:

आणखी वाचा: ‘या’ फळांमुळे वाढू शकते रक्तातील साखर; मधुमेहाच्या रुग्णांनी वेळीच व्हा सावध

हृदयाचे विकार
रताळ्यांमध्ये पोटॅशिअम आढळते जे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर मानले जाते. ज्यामुळे हृदय विकार टाळण्यास मदत मिळू शकते, पण याचे अति सेवन केल्याने शरीरातील पोटॅशिअमचे प्रमाण वाढू शकते. ज्यामुळे हायपरकलेमियाची समस्या होऊ शकते. हे हृदय विकाराचा झटका येण्याचे मुख्य कारण बनु शकते.

मुतखडा
मुतखड्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी रताळे खाणे टाळावे. जास्त प्रमाणात रताळे खाल्ल्याने हा त्रास आणखी वाढू शकतो.

एलर्जी
काहींना रताळे खाल्ल्याने एलर्जी होऊ शकते. यामध्ये मैनिटोल आढळते, ज्यामुळे एलर्जी होऊ शकते, अशा वेळी रताळे खाणे टाळावे.

मधुमेह
रताळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे नुकसानकारक ठरू शकते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी रताळे खाणे टाळावे.

आणखी वाचा: मधुमेहाच्या रुग्णांची दृष्टी होऊ शकते कमकुवत; हे टाळण्यासाठी अशी घ्या डोळ्यांची काळजी

डोकेदुखी
रताळ्यांमध्ये विटामिन ए भरपूर प्रमाणात आढळते, त्यामुळे याच्या अति सेवनाने डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health tips sweet potato can be dangerous for diabetes heart diseases know its side effects pns
First published on: 17-12-2022 at 10:29 IST