Premium

Health special: उष्ण हवामान मानवी मृत्यूला अधिक कारणीभूत?

उन्हाळ्यात वाढत जाणारे तापमान हे गेल्या काही वर्षांत अधिकच्या संख्येने होणाऱ्या मानवी मृत्यूंना कारणीभूत ठरू लागले आहे…

dr. ashwin sawant heatwave
उष्णतेची लाटही आता जीवघेणी ठरते आहे…

विशिष्ट प्रदेशामधील तापमानामधील बदल आणि मानवी मृत्यू यांचा संबंध असल्याची शक्यता जगामधील अनेक संशोधकांनी दीर्घकाळापासून वर्तवली आहे. तापमानाचा पारा उतरल्याने वातावरण थंड होणे व चढल्याने वातावरण गरम होणे, या दोहोंच्या परिणामी मानवी मृत्यू संभवतात,हे तर निश्चितच आहे. त्यातही अतिशीत वातावरणापेक्षा अतिउष्ण वातावरण मानवास अधिक धोकादायक होते,असे निरिक्षण आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : Health special: त्वचेचा कर्करोग कसा टाळाल? (भाग दुसरा)

वर्षागणिक हवामानामध्ये जे घातक बदल होत आहेत,त्यामुळे मानवी मृत्यूंचे प्रमाण वाढेल अशी शक्यता जगभर व्यक्त होत आहे. एकंदरच वातावरणातील बदल हे मानवी मृत्यूला कारणीभूत होत आहेत याबाबत संशोधकांमध्ये एकवाक्यता आहे. मतभिन्नता असेल तर ती हवामानामधील या बदलांमागील कारणांविषयी व त्याचा आरोग्यावर नेमका कसा परिणाम होतो याविषयी आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जे सर्वाधिक उष्ण तापमानाचे दिवस असतात, ते आरोग्याला सर्वाधिक धोकादायक असतात. संपूर्ण उन्हाळ्याच्या तुलनेमध्ये साधारण १० ते २०% इतकेच दिवस अशाप्रकारे धोकादायक असतात.

आणखी वाचा : Health special: डोळा आळशी का होतो?

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तीव्र उष्णतेची जी पहिली लाट येते ,त्यामध्ये अधिक मृत्यू होतात. त्या तुलनेमध्ये जी दुसरी लाट येते, ती मात्र मृत्यूंना तितकीशी कारणीभूत होत नाही असे निरिक्षण आहे. याचे कारणमीमांसा करताना संशोधक सांगतात, उन्हाळ्यामध्ये येणार्‍या पहिल्या उष्ण लाटेला तोंड दिल्यानंतर शरीराला त्या कडक उष्णतेचा सामना कसा करायचा, शरीरामध्ये कोणते बदल कसे घडवायचे,हे व्यवस्थित कळलेले असते. त्या पूर्वानुभवावर शरीर दुसर्‍या लाटेमध्ये शरीराचा बचाव करण्यास शिकते.दुसरं असं की, समाजामधील उष्ण वातावरणाचा अनेक कारणांमुळे सामना करु न शकणारे पहिल्या लाटेमध्ये बळी पडल्यानंतर समाजातील शेष निरोगी नागरिक दुसर्‍या लाटेच्या वेळी बळी न पडणे, हे स्वाभाविकच असते.

आणखी वाचा : Health special: वृद्धत्व व त्वचारोग

उष्माघात हेच उन्हाळ्यामधील मृत्यूंचे प्रमुख कारण नसून त्यामागे इतर कारणेसुद्धा आहेत.किंबहुना काही संशोधकांच्या मते ही इतर कारणे मरणाला आमंत्रण देण्यात अग्रेसर आहेत.

उष्ण हवामानामुळे होणार्‍या मृत्यूंमागील कारणे

 उष्ण तापमान
 रात्रीचे उष्ण तापमान
 तापमानामधील अकस्मात बदल
 तापमान उष्ण राहण्याचा कालावधी (किती दिवस)
 हवेची आर्द्रता (अति आर्द्रता )
 हवेची गति (हवेचा कमी वेग )
 हवेचा दाब
या सर्व गोष्टींचा मानवी आरोग्यावर होणारा अनुकूल वा प्रतिकूल परिणाम अभ्यासणे ही काळाची गरज आहे.कारण आज कधी नव्हे इतक्या तीव्रतेने मानव वातावरण बदलाच्या कचाट्यात सापडला आहे, ज्यामुळे ‘पर्यावरणाचा मानवावर होणारा परिणाम’ या अभ्यासाने आज जगभर जोर पकडला आहे. भारतामध्ये मात्र या विषयावर फारसे संशोधन होताना दिसत
नाही… ज्या विषयाचा अभ्यास एतद्देशीय आयुर्वेद शास्त्राने मात्र हजारो वर्षांपूर्वी सुरु केला होता.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-05-2023 at 00:48 IST
Next Story
Health special: त्वचेचा कर्करोग कसा टाळाल? (भाग दुसरा)