How To Lose Belly Fat : सध्या धावपळीच्या जगात आपण अनेकदा आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. पोटावरील चरबी वाढणे ही समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. आठ-नऊ तास बसून काम करणे, नीट आहार न घेणे, नियमित व्यायाम न करणे इत्यादी कारणांमुळे पोटाची चरबी वाढते. कोणतेही पेय लगेच तुमच्या पोटावरील चरबी कमी करीत नाही; पण संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैलीमध्ये काही घरगुती पेयांचा समावेश केल्याने तुमचे एकंदरीत वजन कमी होऊ शकते.

हैदराबाद येथील यशोदा हॉस्पिटल्सचे वरिष्ठ सल्लागार फिजिशियन डॉ. दिलीप गुडे द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगतात, “जर तुम्हाला पोटाची चरबी कमी करायची असेल, तर घरी बनवलेली पेये फायदेशीर ठरू शकतात; पण फक्त घरगुती पेयाचे सेवन केल्याने तुम्हाला परिणाम दिसून येईल, असे नाही.”

5 drinks to lose belly fat and weight loss
पोटावरची चरबी आणि वजन दोन्ही घटेल; पाहा ही पाच घरगुती पेये करतील मदत….
Healthy Morning Routine
झटपट वजन कमी करायचंय? सकाळी उठल्या-उठल्या करा ‘या’ ६ गोष्टी; महिन्याभरात कमी होईल वजन, दिसाल स्लिम-ट्रिम!
Indian Diet and exercise Plan for Weight Loss How to start your weight loss journey as a beginner
वजन कमी करण्याची सुरुवात कशी करावी? काय खावे? कोणता व्यायाम करावा? जाणून घ्या तज्ज्ञांकडून
priya bapat reacts on not having baby
लग्नाला १३ वर्षे होऊनही बाळ नाही, प्रिया बापट म्हणाली, “ज्यांना मुलं नकोयत…”

आहारतज्ज्ञ शिखा कुमारी यांनी सहा घरगुती पेये सांगितले आहेत. ही पेये वजन कमी करण्यासाठी मदत करतात. त्याबाबत त्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

आल्याचा चहा

आल्याच्या चहामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढविणारे आणि चयापचय क्रिया सुधारणारे घटक असतात. त्यासह आल्याचा चहा प्यायल्याने कॅलरीज कमी होतात आणि पचनक्रिया सुधारते. या चहामुळे पोटाची चरबी कमी होण्यासही मदत होते.

हेही वाचा : तुम्हाला दूध प्यायला आवडत नाही? मग शरीरात कॅल्शियमची पातळी कशी वाढवाल? तज्ज्ञांनी सुचविले हे चांगले पर्याय….

कोरफडीचा रस

कोरफड पचनक्रियेसाठी अधिक फायदेशीर आहे. पोटाची चरबी कमी करण्यासाठी याचा फायदा होऊ शकतो; पण त्यासाठी संयम असणे आवश्यक आहे.

काकडी – पुदिना पाणी

काकडी आणि पुदिना पाण्यात अधिक चविष्ट वाटतात. काकडी – पुदिन्याचे पाणी कॅलरीज कमी करण्यास मदत करतात आणि शरीराला पाण्याची कमतरता भासत नाही.

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर घेऊन, त्यात पाणी टाका आणि ते जेवणापूर्वी प्या. आहारतज्ज्ञ शिखा कुमारी सांगतात, “काही अभ्यासांनुसार अ‍ॅपल सायडर व्हिनेगर चरबी कमी करण्यास मदत करू शकते.” त्याबाबत डॉ. गुडेसु्द्धा सांगतात, “जेव्हा अ‍ॅपल सायडर व्हिनेगर तुम्ही पाण्यात मिसळून पिता तेव्हा भूक कमी होते आणि शरीरातील कॅलरीज नियंत्रणात राहतात.”

दालचिनीचा चहा

दालचिनीचा चहाचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि सतत खाण्याची इच्छा होत नाही.

डॉ. गुडे सांगतात, “ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट्स असून, त्यात कॅटेचिन असतात; जे चयापचय क्रिया सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे काही दिवसांनी पोटावरील चरबी कमी होते. त्याशिवाय कमी कॅलरीज असलेले आणि व्हिटॅमिन सीसाठी ओळखले जाणारे लिंबू पाणीसुद्धा पचनक्रिया आणि चयापचय क्रिया सुरळीत करण्यास मदत करते.”
डॉ. पुढे सांगतात, “ही पेये पोटावरील चरबी कमी करण्यास फायदेशीर ठरू शकतात; पण त्याबरोबरच सर्वसमावेशक दृष्टिकोन असणे गरजेचे आहे. त्यामध्ये संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करणे अपेक्षित आहे. याबाबत प्रत्येकाला वेगवेगळा अनुभव येऊ शकतो. आहारात कोणताही बदल करण्यापूर्वी तुमच्या जवळच्या आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.