How Healthy Is Eating Masala Papad: संध्याकाळी भूक लागण्यावर किंवा हॉटेलमध्ये गेल्यावर जेवणाआधी स्टार्टर म्हणून अनेकदा आपण मसाला पापड खाल्ला जातो. हा चविष्ट आणि चटकदार पापड लहानांपासून मोठ्यापर्यंत अनेक जण आवडीने खातात. पण, उडीद डाळीच्या पिठापासून तयार करण्यात आलेले हे पापड आपल्या रक्तातील साखरेच्या पातळीवर कसा परिणाम करतात?
मेटाबॉलिक हेल्थ कोच करण सरीन यांनी सीजीएम वापरून याची चाचणी केली. सरीन यांनी उडीद डाळीपासून बनवलेला पापड तळून, त्यावर कांदा, टोमॅटो , कोथिंबीर व मिरच्या टाकून तो खाल्ला. मसाला पापड खाल्ल्यानंतर दोन तासांनी त्यांना रक्तातील साखरेची वाढ दिसून आली नाही. “हा पापड अत्यंत पातळ आहे आणि जोपर्यंत तुम्ही त्याचे जास्त प्रमाणात सेवन करीत नाही तोपर्यंत कार्बचा भार खूपच कमी असतो,” असे सरीन म्हणाले.
हे खरं आहे का?
“पापड मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास तो आरोग्यदायी असतो, ज्यामध्ये मधुमेहींचाही समावेश आहे. भाजलेले पापड तळलेल्या पापडांपेक्षा चांगले असले तरी ते दररोज खाऊ नयेत,” असे कल्याण येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील क्लिनिकल आहारतज्ज्ञ सुमैया ए. म्हणाल्या.
कारण- पापड बनविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पिठामधील प्रथिने आणि फायबर फायदेशीर ठरू शकतात; परंतु सोडियमचे जास्त प्रमाण किंवा जास्त तळलेला पापड खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
दिल्लीतील सी. के. बिर्ला हॉस्पिटलच्या अंतर्गत औषध संचालक डॉ. मनीषा अरोरा म्हणाल्या की, मसाला पापडात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण खूप कमी असू शकते. “त्यात मैद्याचे पीठ असले तरी, साखरेचे प्रमाण फारसे जास्त नसते. तथापि, रिफाइंड पिठामुळे मसाला पापडाचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) जास्त असतो,”
विचारात घेण्याजोगा महत्त्वाचा घटक म्हणजे पापडाचा आकार. आपण किती प्रमाणात पीठ खातो यावरून आपल्या शरीरात किती प्रमाणात रिफाइंड पीठ जाते हे ठरते, जे उच्च जीआयमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकते. त्याव्यतिरिक्त आपण ते कशासोबत खातो हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
मसाला पापड जास्त फायबर आणि कमी जीआय असलेल्या पदार्थांसोबत खाल्ले जातो, जसे की भाज्या किंवा सॅलड. अशा परिस्थितीत रक्तातील साखरेवर होणारा एकूण परिणाम कमी करता येतो, असे डॉ. अरोरा यांनी नमूद केले. “तथापि, फक्त हा पापड किंवा त्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास सेवनानंतर पहिल्या ३० ते ६० मिनिटांत रक्तातील साखरेच्या पातळीत सौम्य ते मध्यम प्रमाणात वाढ होऊ शकते”, यावर डॉ. अरोरा यांनी जोर दिला.
आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे आपण हा पापड पेयांसह किंवा इतर उच्च-जीआय-अन्नांसह एकत्रितरीत्या सेवन करतो का. उदाहरणार्थ, मसाला पापड साखरयुक्त फिजी पेये किंवा अल्कोहोलसह सेवन केल्याने- ज्यामध्ये रिक्त कॅलरीज जास्त असतात – रक्तातील साखरेची पातळी लक्षणीयरीत्या वाढू शकत , असे डॉ. अरोरा यांनी स्पष्ट केले.
नाश्ता म्हणून मसाला पापड हा कमी प्रमाणात खाल्ल्यास आणि कांदे, टोमॅटो किंवा काकडीसारख्या उच्च-फायबर टॉपिंग्जसह खाल्ल्यास तो एक वाजवी पर्याय असू शकतो. “हे पदार्थ त्यात फायबरचे प्रमाण वाढवतात आणि एकूण ग्लायसेमिक प्रभाव कमी करतात. रक्तातील साखरेचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी डोस मर्यादित करणे आणि त्यासह असलेले अन्न आणि पेये विचारपूर्वक निवडणे उचित आहे,” असे डॉ. अरोरा म्हणाले.