Mistakes To Avoid While Eating Fruits: जर चुकीच्या पद्धतीने सेवन केलं तर आरोग्याला फायदेशीर पदार्थ सुद्धा आपल्याच जीवावर बेतू शकतात. याचेच एक उदाहरण म्हणजे फलाहार. फळे खाल्ल्याने शरीराला होणारे फायदे आपण आजवर अनेकदा ऐकले आहेत. पण काही जण फळे खाताना अशा चुका करून बसतात की त्यामुळे प्रत्येक अवयवावर गंभीर परिणाम होऊ शकतो. इन्स्टाग्राम पोस्टमध्ये, आयुर्वेद आणि आतड्यांच्या आरोग्याचे तज्ज्ञ, डॉ डिंपल जांगडा यांनी फळे खाताना कोणत्या चुका करणे टाळायला हवे हे जाणून घेणार आहोत..

खूप जेवल्यावर गोड म्हणून फळं खावीत का?

फळांना पचनासाठी साधारण एक तास लागतो. खूप व जड जेवल्यानंतर फळे खाल्ल्याने न पचलेले अन्न (धान्य, कडधान्ये, बीन्स, भाज्या, मांस) लहान आतड्यात ढकलले जाते, ज्यामुळे अपचन आणि सूज येणे, गॅसेस आणि पोट फुगणे यासारखी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे तुमचे जेवण आणि फळांचे सेवन यामध्ये दोन तासांचे अंतर ठेवा. जेवण व फळे खाण्याचा क्रम काहीही असला तरी हरकत नाही पण यात अंतर ठेवायला विसरू नका. महत्त्वाचे म्हणजे हे केवळ रात्रीच्या जेवणाबाबत नसून दिवसभरातील सर्व आहारांना लागू होते.

Health Benefits of Avocado
झपाट्याने वजन कमी करणारे हिरव्या रंगाचे ‘हे’ फळ कापण्यापूर्वी स्वच्छ धुवा; तज्ज्ञ म्हणतात, अन्यथा पडेल महागात
Perfect Brush For Healthy Teeth Why Adults Shall Use Kids Tooth Brush
तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासह ‘या’ फायद्यांसाठी तुम्हीही वापरायला हवा लहान मुलांचा टूथब्रश; डॉक्टर काय सांगतात?
Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?

रात्री जेवणाच्या ऐवजी फळे खावी का?

फळांमध्ये फ्युमॅरिक अॅसिड, टार्टेरिक अॅसिड, ऑक्सॅलिक अॅसिड, क्रिटिक अॅसिड, मॅलिक अॅसिड यासारखे सक्रिय अॅसिड आणि मायक्रोबियल एन्झाईम्स असतात. यामुळे झोपेसाठी आवश्यक असलेल्या मेलाटोनिनच्या उत्पादनात अडथळा येतो. खरं तर, एका सफरचंदाचा शरीरावर आणि मनावर एक कप कॉफी सारखाच प्रभाव पडतो. त्यामुळे सूर्यास्तानंतर फळे खाऊ नयेत. संध्याकाळी ४ च्या सुमारास फळे खाणे उत्तम ठरेल.

३ प्रकारची फळे जी कधीही एकत्र खाऊ नयेत

  • तुरट फळे: सफरचंद, बेरी, चेरी आणि नाशपाती
  • गोड फळे : पपई, आंबा केळी, पीच आणि अवाकॅडो
  • आंबट फळे: संत्रा, लिंबू, टेंजेरिन आणि द्राक्ष

हे ही वाचा<< गव्हापेक्षा वेगाने पचतात मैद्याच्या पोळ्या! न्यूट्रिशनिस्ट सांगतात डायबिटीज व वजन जास्त असल्यास किती करावे सेवन?

जेवणासह फळे का खाऊ नयेत?

पवित्रा एन राज, मुख्य आहारतज्ज्ञ, मणिपाल हॉस्पिटल सांगतात की, सकाळच्या वेळी किंवा दुपारी जेवणांनंतर फळे खाणे केव्हाही चांगले असते कारण ते उत्तम पोषण देते. फळांमध्ये फायबरचे प्रमाण मुबलक असते. फळांमध्ये सूक्ष्म पोषक घटक असतात. जेवणासोबत फळे एकत्र खाल्ल्यास शरीराला आवश्यक पोषण पूर्ण मिळू शकत नाही.

हे ही वाचा<< निर्मला सीतारमण यांनी बजेटमध्ये सांगितलेलं ‘श्रीअन्न’ काय आहे? Millets मुळे शरीराला होणारे फायदे जाणून घ्या

एका वेळी किती फळे खाणे आहे योग्य?

एका वेळी एक फळ खाणे केव्हाही चांगले असते कारण प्रत्येक फळाचे स्वरूप वेगळे असते. काही लिंबूवर्गीय असतात, काही कार्बोहायड्रेट तर काही व्हिटॅमिन आणि पोटॅशियम युक्त असतात. फळे एकत्र केल्याने काही अपचन आणि पोट फुगण्याच्या समस्या उद्भवू शकतात