If You Skip Soda For Three Months Can It Help Weight Loss: वजन कमी करायचंय राव, मी तर बाहेरचं खाणं पण बंद केलंय पण काही फरकच पडत नाही. हे वाक्य रोज म्हणणारी व्यक्ती कदाचित तुमच्याही आयुष्यात असेल, तुम्हीही कदाचित यापैकी एक असू शकता पण अनेकदा आपल्याला विसर पडतो की खाण्यासह आपण सेवन करत असणारी पेयं सुद्धा आपल्या शरीरावर तितकाच प्रभाव पाडत असतात. अनेकदा सेलिब्रिटींचे वजन कमी करण्याचे फंडे चर्चेत असतात, आपल्याला वाटतं की या सेलिब्रिटी मंडळींच्या शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी मोठी टीम असते, जी सगळं नियोजन करते आणि म्हणून ते अगदी परफेक्ट शरीर मिळवू शकतात. आपलं वाटणं अगदी चुकीचं नाही पण अनेकदा खूप मेहनत घेण्यापेक्षा रोजच्या जीवनात केलेला छोटा बदल सुद्धा खूप मदत करून जातो, उदाहरणार्थ, प्रसिद्ध अमेरिकन रॅपर पोस्ट मलोन याने अलीकडेच जवळपास ५५ पाउंड (२५ किलो) वजन कमी करून अनेकांचा चकित केले होते. याचे श्रेय तो आपल्या जीवनशैलीतून काढून टाकलेल्या सोडायुक्त पेयांना देतो. पण खरोखरच सोडायुक्त पेयं टाळल्याने वजन कमी करणे शक्य आहे का? आज आपण याच प्रश्नाचं उत्तर तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत.

अपोलो हॉस्पिटल्सच्या मुख्य पोषणतज्ज्ञ डॉ. प्रियंका रोहतगी, यांनी इंडियन एक्सस्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार एक ते तीन महिन्यांच्या कालावधीसाठी सोडायुक्त पेय टाळल्याने शरीरात काय फरक जाणवू शकतात? तसेच सोड्यामुळे वजनावर खरोखरच काही परिणाम होतो का अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण पाहूयात..

Papaya Leaf Water Benefits in Marathi
Papaya Leaf Water Benefits : आठवड्यातून तीनदा प्या पपईच्या पानांचे एक कप पाणी; जाणून घ्या मधुमेहापासून त्वचा-केसांच्या आरोग्यापर्यंतचे असंख्य फायदे
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Use of plastic will be dangerous for agriculture
प्लास्टिकचा भस्मासूर शेतांना गिळंकृत करू पाहतोय…
Risk of Heart Attack During Angiography
अँजिओग्राफीदरम्यान हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
Coriander Juice benefits
Coriander Juice: रिकाम्या पोटी कोथिंबिरीचा रस प्यायल्यानं शरीरावर काय परिणाम होतो? वाचून व्हाल अवाक…
bike taking petrol fire
पेट्रोल भरताना बाईकचालकाच्या कोणत्या चुकीमुळे आग लागते? अशा दुर्घटना टाळण्यासाठी ‘या’ महत्त्वाच्या टिप्स ठरतील फायदेशीर
5 superfoods that can help prevent clogged arteries
रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होऊ नये म्हणून खा हे पाच सुपरफूड! तज्ज्ञांचा सल्ला
actress Bhagyashree shared recipe of unpeeled potato
‘मैने प्यार किया’फेम भाग्यश्री म्हणते, “न सोललेल्या बटाट्यांमुळे कमी होतो क्रॅम्प्सचा त्रास” खरंच हे शक्य आहे का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….

सोड्यामुळे वजन कसे वाढते? (Does Soda Increase Weight)

साखरयुक्त पेयांमुळे शरीरात कॅलरीजचा अधिक प्रमाणात साठा होऊ लागतो. मानव व प्राणी दोघांवर झालेल्या अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार, कार्बोनेटेड पेयांमधून शरीरात घ्रेलिन नावाच्या हार्मोनचे उत्सर्जन वाढते ज्यामुळे भूक वाढून आपण जास्त खाऊ लागता, ज्याचा एकंदरीत परिणाम वजन वाढण्यावर सुद्धा दिसून येतो. कृत्रिम स्वीटनर्स म्हणजे एखाद्या पदार्थाला गोडवा देण्यासाठी वापरण्यात आलेला सोडायुक्त अतिरिक्त घटक हा उच्च कॅलरी युक्त पदार्थांच्या सेवनाची लालसा निर्माण करतो. त्यामुळे खरंतर जी कार्बोनेटेड पेय शून्य- साखरयुक्त किंवा शुगर फ्री असल्याचा दावा करतात ती सुद्धा आपल्यात अधिक साखर खाण्याची इच्छा वाढवत असतात. यासंदर्भात उंदरांवर झालेल्या अभ्यासात असे दिसून आले होते की, कृत्रिम स्वीटनर, एस्पार्टम, मेंदूच्या काही भागांचे पूर्णतः नुकसान करू शकते.

तुम्ही सोडा सोडून देता तेव्हा काय होते? (What Happens When You Skip Soda)

साहजिक आहे की तुम्ही एखादी घातक गोष्ट जेव्हा सोडू पाहता तेव्हा सुरुवातीला तुमच्या शरीराला सवय मोडण्यासाठी काही प्रमाणात कष्ट घ्यावे लागू शकतात. पण त्याचप्रमाणे सकारात्मक बदल सुद्धा लगेचच दिसू लागतात. सोडा प्यायचे थांबवल्यावर पहिल्याच आठवड्यात शरीरातील अतिरिक्त साखर व सोडियमचे प्रमाण कमी होऊ लागते परिणामी शरीरातील अंतर्गत अवयवांना सूज येणे, जळजळ होणे असे त्रास कमी होऊ लागतात. यानंतर हळूहळू वजन कमी होण्यासाठी सुद्धा याची मदत होऊ लागते. विशेषतः शरीराचे डिटॉक्सिफिकेशन (स्वच्छता) होऊ लागल्याने उतींची जळजळ कमी होऊन त्वचेचा पोत सुधारण्यास देखील मदत होऊ शकते.

वेळेनुसार फरक स्पष्ट व अधिक प्रभावी होऊ लागतात. सोड्याच्या रूपात शरीरात जात असणाऱ्या अतिरिक्त व अनावश्यक कॅलरीज कमी झाल्याने शरीर ऊर्जेसाठी चरबी वितळण्यास सुरुवात करते आणि याची वजन कमी होण्यात मदत होते. याशिवाय आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे यामुळे रक्तातील साखरेची पातळी सुद्धा स्थिर राहण्यास सुरवात होते. रक्तातील साखरेची स्थिर पातळी आपल्याला दिवसभरासाठी ऊर्जा प्रदान करते. तसेच सतत लागणाऱ्या भूकेवर अंकुश ठेवण्यासाठी सुद्धा याची मदत होऊ शकते.

सोडा प्यायचं बंद केल्यानंतर एका महिन्यात काय बदल दिसू शकतात?

एक महिनाभर सोडा पूर्णपणे टाळल्याने शरीर एकतर ५० टक्क्यांहून अधिक डिटॉक्स झालेले असते. याचा परिणाम वजन कमी होण्याच्या स्वरूपात सुद्धा दिसू लागतो. अर्थात याला जीवनशैलीतील अन्य घटक सुद्धा जबाबदार असतात पण आदर्श स्थितीत सोड्याचे सेवन टाळल्याने, पोटाच्या मध्यभागी म्हणजे जिथे व्हिसेरल फॅट्स जमा होत असतात त्याचे प्रमाण कमी होऊ लागते. रक्तातील साखर संतुलित राहिल्याने लक्ष लागणे व एकग्रता वाढणे असेही फायदे होऊ शकतात, अनेकांनी या बदलाची डोकेदुखी कमी होण्यातही मदत झाल्याचे सांगितले आहे.

सोडा प्यायचं बंद केल्यानंतर तीन महिन्यांनी काय बदल दिसू शकतात?

सोडा सोडल्यानंतर तीन महिन्यांत, शरीराला या बदलाची पूर्णतः सवय होते. ऊर्जेसाठी शरीराला फॅट्स वापरण्याची सवय लागल्याने वजनावर सुद्धा लक्षणीय परिणाम दिसून येऊ लागतो. पोट फुगणे, ऍसिडिटी असे त्रास कमी किंवा बंद झालेले असतात. सोड्यातील फॉस्फोरिक ऍसिड आता शरीरात कमी झाल्याने आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास व पचनासाठी शरीरच सक्षम होण्याची सुरुवात झालेली असते. त्वचेचा पोत सुधारलेला असतो. आणि, एक बोनस फायदा म्हणजे दात शुभ्र होण्यासाठी व हिरड्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी सुद्धा याची मदत होऊ लागते.

हे ही वाचा<< एक महिना दुध, दही, चीज, बटर खाणं बंद केल्यास शरीरात काय बदल होतील? वजनापासून ते आजारांपर्यंत परिणाम वाचा

लक्षात घ्या, एक दोन दिवस हा प्रयोग करून कदाचित तुम्हाला हवा तसा परिणाम मिळेलच असे नाही पण जितका जास्त वेळ तुम्ही हा प्रयत्न कायम ठेवाल तसे प्रत्येक टप्प्यावर होणारे फायदे वाढू शकतात.