Mental Stress pranayam : तणावामुळे जगभरातील लोकांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होत आहे. तणाव हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. तणावामुळे इतर अनेक आजारांचा धोका वाढत जातो, त्यामुळे तणावाचे व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे. तणाव येत असेल तर तुम्ही घरीच काही गोष्टी करू शकता.

जामा नेटवर्क ओपनमध्ये प्रकाशित झालेल्या आणि डॉक्टरांनी आयोजित केलेल्या अलीकडील अभ्यासात असे आढळून आले की, सुदर्शन क्रिया योगाने इतर तणाव व्यवस्थापन तंत्रांच्या तुलनेत तणाव, नैराश्य आणि चिंता लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होत आहे. योगातज्ज्ञ कामिनी बोबडे यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
randeep surjewala made controversial remarks on hema malini
हेमा मालिनी यांच्याबाबत रणदीप सुरजेवालांचं वादग्रस्त वक्तव्य, कंगनाची तिखट शब्दांत प्रतिक्रिया, “द्वेष आणि तिरस्कार..”
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…

सुदर्शन क्रिया योग हा एक प्रकारचा श्वासोच्छवासाचा व्यायाम आहे, ज्यामध्ये लोक वेगाने श्वास घेतात आणि सोडतात. हे ब्रीदिंग एक्सरसाईज श्वासोच्छवासावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो. जेणेकरून तणाव आणि स्ट्रेसच्या समस्येला तोंड देता येईल. हा योग हृदय गती, रक्तवाहिन्या, हृदयाच्या ग्रंथींची क्रिया, फुफ्फुसे आणि पचनसंस्था, यकृत आणि रोगप्रतिकारक प्रणालीचे नियमन याची काळजी घेतो. तसेच जळजळ नियंत्रित करतो. हे आसन पचन आणि रक्ताभिसरणासाठी चांगले असल्याचे म्हटले जाते. या आसनाव्यतिरिक्त भस्त्रिका, त्यानंतर नाडी शोधन प्राणायाम आणि ध्यान सराव यामुळे मानसिक त्रास कमी होतो आणि आरोग्य सुधारते.

भस्त्रिका

‘भस्त्रिका’ Bhastrika या शब्दाचा अर्थ ‘ब्लोअर’ आहे, कारण यामुळे शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह उत्तेजित होतो, शारीरिक आणि मानसिक पातळीवर उष्णता निर्माण होते, ज्यामुळे मन आणि शरीर दोन्ही संतुलित होते.

सुदर्शन क्रियेमध्ये श्वासोच्छवासाचा वेग वारंवार बदलला जातो. सर्वप्रथम सुखासन आसनात बसून श्वास घ्या. त्यानंतर काही वेळ श्वास घेतल्यानंतर श्वासाचा वेग वाढवा. त्याचप्रमाणे श्वास घेण्याची आणि श्वास सोडण्याची गती वाढवा. लक्षात ठेवा की, जेव्हा तुम्ही श्वास घेता तेव्हा श्वास सोडण्याच्या वेळेच्या दुप्पट वेळ शरीरात श्वास रोखून ठेवावा लागतो. मग नंतर बाहेर सोडावा लागेल, यामुळे मनाला शांती मिळते आणि श्वासावर नियंत्रण येते.

भ्रस्त्रिका प्राणायामच्या सरावाने फुफ्फुसं मजबूत होतात, त्यामुळे मनही शांत होते. यामध्ये दीर्घ श्वास घेतला जातो. सुदर्शन क्रिया योग सातत्याने केल्यास त्याचा मानसिक आरोग्यावर जलद परिणाम दिसून येतो. हा योग केल्याने मन शांत होते आणि आत्मविश्वास वाढतो. तणाव दूर झाला की झोप सुधारते. त्यामुळे शरीरातील ऊर्जा पातळी वाढते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

नाडी शोधन –

शारीरिक व मानसिक ताणतणाव घालवण्यासाठी हे प्राणायाम अधिक महत्त्वाचे आहे. या प्राणायामामुळे श्वसनमार्ग मोकळा होतो आणि रक्ताभिसरण सुधारते.

नाडी शोधन कसे करावे

१. सर्वप्रथम सरळ बसा. पाठीचा कणा ताठ ठेवा आणि खांदे सैल सोडा. चेहऱ्यावर मंद स्मित असू द्या.

२. डावा हात डाव्या गुडघ्यावर ठेवा, तळवा आकाशाकडे उघडा ठेवा किंवा अंगठा व तर्जनीचे टोक एकमेकांना हळूवारपणे स्पर्श करत ठेवावे.

३. उजव्या हाताची तर्जनी आणि मधले बोट यांची टोके भुवयांच्या मध्यभागी ठेवा. अनामिका आणि करंगळी डाव्या नाकपुडीवर आणि अंगठा उजव्या नाकपुडीवर. आपण अनामिका आणि करंगळी डावी नाकपुडी बंद करण्यासाठी किंवा उघडण्यासाठी वापरणार आहोत आणि अंगठा उजव्या नाकपुडीसाठी वापरणार आहोत.

४. तुमचा अंगठा उजव्या नाकपुडीवर ठेवा आणि डाव्या नाकपुडीतून हळूवार श्वास घ्या.

हेही वाचा >> वजन कमी करण्याचे हे औषध हृदयविकाराचा झटका टाळू शकते का? Semaglutide बाबत काय सांगतात डॉक्टर?

५. आता डाव्या नाकपुडीतून श्वास घ्या, नंतर अनामिका आणि करंगळीने डावी नाकपुडी बंद करा. उजव्या नाकपुडीवरील अंगठा काढून उजव्या बाजूने श्वास सोडा.

६. उजव्या बाजूने श्वास घ्या आणि डाव्या बाजूने सोडा. आळीपाळीने एकेका नाकपुडीने श्वास घेणे व सोडणे चालू ठेवा.