आज चैत्र नवरात्रीचा दुसरा दिवस आहे. वर्षातून चार वेळा नवरात्र साजरी केली जाते, तर देशभरात केवळ चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्रमोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत ९ दिवस उपवास करतात आणि कन्या पूजनाने समारोप करतात. जेव्हा नवरात्रीच्या आहाराचा विचार केला जातो तेव्हा पौष्टिक पर्यायांचा समावेश करणे महत्वाचे आहे.या नऊ दिवसांमध्ये उपवासाच्या मदतीने तुम्ही वजन कमी करू शकता. यासाठी योग्य आहाराचे पालन करणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून शरीरात अशक्तपणा आणि सुस्ती येणार नाही आणि वजनही सहज कमी करता येईल. चला तर मग जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी कोणता आहार या नऊ दिवसांमध्ये घेता येऊ शकतो.

​शरीर डिटॉक्स होण्यासाठी उपवासाचा महत्त्वाचा फायदा मिळतो. तसंच आठवडाभर पोटात साठलेले विषारी पदार्थ बाहेर येण्यास मदत मिळते. तसंच आपल्या शरीरातील अन्नसाखळीला आराम देण्यासाठी हे महत्त्वाचे आहे.यामुळे चरबी कमी होते आणि वजनही कमी होते. या उपवासाच्या दिवसांमध्ये नक्की आहार काय घ्यायला हवा यासंदर्भात डॉक्टर मेहता यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.

नऊ दिवसांच्या आहाराचं व्यवस्थित नियोजन केल्यास तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. तुमच्या उपवासाच्या थाळीमध्ये फळे, भाज्या आणि ड्रायफ्रूटचा समावेश असला पाहिजे. जड पदार्थांऐवजी तुम्ही या दिवशी ताज्या फळांचा रस, फलाहार अथवा पाणी आणि तरल पदार्थ खावेत. द्रव पदार्थांचे सेवन तुमच्या पोटाला आराम मिळवून देतात. तुमच्या मेंदूला शांत करते आणि तुम्हाला गाढ झोपही मिळते.

हेही वाचा >> Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

उपवासादरम्यान आहारत सामक तांदूळ, ज्याला बार्नयार्ड बाजरी देखील म्हणतात. या तांदळाचा समावेश करण्याचा सल्लाडॉक्टर मिकी मेहता देतात. यामध्ये प्रथिने, लोहासारख्या सूक्ष्म पोषक घटकांनी भरलेले असते. यामध्ये फायबर आणि प्रथिने जास्त आहे तसेच कॅलरी देखील कमी आहे. यामुळे वजन कमी करण्यासही मदत करू शकते. “ऋतू बदलत असताना शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी आणि श्वसनाचे आरोग्य राखण्यासाठीही याची मदत होते. तांदळात फायटिक ऍसिडचे प्रमाण कमी असते, त्यामुळे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारख्या महत्त्वाच्या खनिजांचे अधिक प्रमाणात शोषण करण्यासही मदत होते.

कोणत्या भाज्या, फळे चालतात?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बेंगळुरूच्या मुख्य पोषणतज्ञ वाणी कृष्णा सांगतात, “बटाटे आणि रताळे हे उर्जेसाठी सर्वोत्तम आहे. परंतु मधुमेह असलेल्या लोकांनी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. खजूर, मनुका आणि जर्दाळू यांसारख्या सुक्या मेव्याचाही आहारात समावेश करु शकता”