Infertility Problems : महिला आणि पुरुष दोघांमध्ये वंध्यत्व अथवा गर्भधारणेसंबंधित दोष आढळतात. ही समस्या केवळ शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. याच संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने एक धक्कादायक अहवाल सादर केला आहे. जगभरातील सुमारे १७.५ टक्के प्रौढ लोकसंख्येतील दर सहा व्यक्तींपैकी एक व्यक्ती वंध्यत्वाने ग्रस्त आहे, असे WHO ने नमूद केले आहे. या नव्या अहवालानुसार, जगभरातील सुमारे १७.५ टक्के लोकसंख्या वंध्यत्वाने ग्रस्त आहेत. श्रीमंत देशांमध्ये ही संख्या १७.८ टक्के आहे तर गरीब देशांमध्ये १६.५ टक्के लोक वंध्यत्वाचा सामना करत आहेत.
पुरुष आणि स्त्री दोघांनाही वंध्यत्वाची समस्या जाणवते. जेव्हा एखादे जोडपे एक वर्षाहून अधिक काळ नैसर्गिकरीत्या प्रयत्न करूनही गर्भधारण करू शकत नाही, तेव्हा ते जोडपे इनफर्टिलिटी म्हणजेच वंध्यत्वाच्या समस्येने ग्रस्त असल्याचे मानले जाते. नियमित असुरक्षित लैंगिक संभोगानंतर गर्भधारणा साध्य करण्यात अपयशी ठरते.
या समस्येमुळे अनेकांना सामाजिक, आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहेत. ज्यामुळे लोकांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होत आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने नमूद केले आहे. दरम्यान जगभरातील सुमारे १२.६ टक्के लोक काही काळ वंध्यत्वाच्या समस्येचा सामना करत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या व्याख्येनुसार, गर्भनिरोधकाशिवाय बाळासाठी वर्षभर प्रयत्न करूनही यश न मिळाल्याने एखादी व्यक्ती वंध्यत्वाची शिकार होऊ शकते.
Blood Pressure अचानक कमी झालं तर घरीच कसा कराल उपचार? जाणून घ्या योग्य पद्धत आणि उपाय
जागतिक आरोग्य संघटनेच्या १९९० ते २०२१ या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या १३३ वेगवेगळ्या अभ्यासांच्या विश्लेषणाच्या आधारे ही आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यातील ६६ अभ्यास विवाहित पती- पत्नीवर करण्यात आले तर ५३ अभ्यास अविवाहित पण एकमेकांसोबत राहणाऱ्या लोकांवर करण्यात आले, याशिवाय ११ अभ्यास असे अभ्यास होते ज्यात वैवाहिक स्थितीबद्दलची माहिती उघड झाली नाही.
या अभ्यासात, पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये वंध्यत्वाची समस्या अधिक होती, पण अभ्यासत सहभागी लोकांमध्ये महिलांची संख्याही जास्त होती. यात बहुतेक लोक युरोपमधील होते, ज्यांची संख्या ३५ टक्के होती. तर नऊ टक्के लोक दक्षिण आशियातील होते, ज्यात भारताचाही समावेश होतो.
भारतात वंध्यत्वाचा सामना करणारे अनेक जण आपल्या खिशातून पैसे खर्च करत आहेत. अनेक लोक खासगी आरोग्य केंद्रावर आयव्हीएफ उपचारांसाठी जातात, पण आयव्हीएफ उपचारांचा खर्च खूप जास्त आहे. अशा परिस्थितीत सरकारी रुग्णालयांमध्ये आयव्हीएफसारखी प्रक्रिया खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहे. यात भारतात सर्वाधिक लोक मूल-बाळ होण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्वाधिक खर्च करतात, असेही जागतिक आरोग्य संघटनेने नमूद केले आहे.
भारतातील एक व्यक्ती एआरटी सायकलसाठी सरासरी वार्षिक उत्पन्नापेक्षा १६६ पट जास्त खर्च करते. यात भारतात एका एआरटी सायकलसाठी १५ लाख ३० हजार रुपये इतका खर्च करावा लागतो. यासाठी भारतात होणार खर्च सर्वाधिक आहे. जगभरातील अनेक जोडपी बाळ होण्याच्या उपचारांसाठी किमान एक लाख ७३ हजार रुपये खर्च करतात, तर काही ठिकाणी हा खर्च १५ लाखांच्या पुढे आहे.