Avoid cashew in high blood pressure : अयोग्य आहार आणि जीवनशैलीमुळे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. रक्तदाब वाढल्यास अंगदुखी, डोकेदुखी, आणि चक्कर येण्यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. सततच्या उच्च रक्तदाबामुळे ( High blood pressure ) हृदय, मेंदू, किडनी, डोळ्यांना इजा होऊ शकते. त्यामुळे, रक्तदाब नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. यासाठी रोज सकस आहार आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब केला पाहिजे. मात्र, आहार घेताना सुका मेव्याबाबत एक बाब लक्षात ठेवावी. काही सुक्या मेव्यांचे सेवन रुग्णासाठी अडचन निर्माण करू शकते.

काजू ( cashew ) आरोग्यासाठी उपयुक्त आहे. मात्र, उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी ते विषासारखे काम करते. हेल्थ लाइनच्या अहवालानुसार, काजू आहे तसा खाल्ल्यास कोणतेही नुकसान होणार नाही. मात्र काजूचे सेवन मसालेदार पदार्थांसह किंवा भाजून खाल्ल्यास त्याचा उच्च रक्तदाबाच्या रुग्णावर विषाप्रमाणे परिणाम होतो. काजूमुळे रक्तदाबाच्या रुग्णाला धोका कसा वाढू शकतो, याबाबत जाणून घेऊया.

(युरिक ॲसिड वाढल्यास होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार; यापासून सुटका कशी मिळवायची जाणून घ्या)

१) काजूने रक्तदाब वाढण्याचा धोका

कच्च्या काजूत सोडिम नसते मात्र भाजलेल्या मसालेदार काजूममध्ये मीठ असते. मिठासह एक कप कोरड्या भाजलेल्या काजूमध्ये सोडियमचे प्रमाण अधिक असते. अधिक सोडियम उच्च रक्तदाब, हृदय विकार आणि स्ट्रोक सारख्या घातक आजारांना आमंत्रण देऊ शकते.

काजू आरोग्यासाठी चांगले नाही. त्याच्यामुळे शरीरातील फॅट वाढते. फ्राय केलेले काजू आरोग्यासाठी धोकादायक ठरतात. याच्या सेवनाने हृदय विकार होऊ शकतो. हृदय आणि रक्तदाबाच्या रुग्णांनी काजूचे सेवन केल्यास ते शरीरावर विषाप्रमाणे परिणाम करते. हार्टकेअर आणि लाइफस्टाइल एक्सपर्ट डॉक्टर बिम झाजर यांनी उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना काजूचे सेवन टाळण्याचा सल्ला दिला आहे.

(Free Condoms: १८ ते २५ वयोगटातील सर्वांना मिळणार फ्री कंडोम! ‘या’ देशाच्या राष्ट्रध्यक्षांनीच केली घोषणा; दोन कारणांमुळे घेतला निर्णय)

२) काजूच्या सेवनाने वाढते वजन

काजूमध्ये प्रोटीन आणि कॅलरीचे प्रमाण अधिक असते. त्याच्या सेवनाने लठ्ठपणा झपाट्याने वाढतो. काजूमध्ये ५५३ कॅलरी असते जे झपाट्याने वजन वाढवण्यासाठी जबाबदार असते.

३) किडणीच्या रोगांचा धोका वाढतो

काजूमध्ये उच्च ऑक्जिलेट असते जे किडनीला नुकसान करू शकते. तसेच, चवीसाठी लोक काजूचे सेवन करतात मात्र काजू खाल्ल्याने आरोग्याला नुकसान होते आणि फॅट वाढते.