Weight Loss As Per Blood Group: तुमचे योग्य वजन किती असावे हे ठरवण्यासाठी अनेक घटक विचारात घ्यावे लागतात. तुमची उंची, वय हे त्याचेच काही भाग. याचप्रमाणे तुमचे वजन कसे कमी व जास्त करता येईल हे ठरवण्यासाठी सुद्धा काही गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात. तुमची जीवनशैली, व्यायाम, आहार यासह तुमचा ब्लड ग्रुप सुद्धा तुमचे वजन कमी करण्यासाठी महत्त्वाचे काम करतो. रक्तगट कोणता यावरून तुमच्या झोपेपासून, वजनापर्यंत ते अगदी आजाराच्या शक्यतांपर्यंत सगळं काही ठरत असतं. हे तुम्हाला माहीत आहे का?

इंस्टाग्रामवर, पोषणतज्ञ अंजली मुखर्जी यांनी एका पोस्टमध्ये सांगितले की अनेकजण योग्य व्यायाम करतात, वेळोवेळी योग्य आहार घेतात पण तरीही त्यांच्या वजनात काहीच फरक दिसत नाही. तर याचे मुख्य कारण काहीतरी वेगळेच असू शकते. सर्वात आधी तुमचं वजन का वाढतंय हे ओळखणं महत्त्वाचं आहे. वय, चयापचय, हार्मोनल असंतुलन आणि इतर वैद्यकीय परिस्थितींनुसार तुमच्या वजनात वाढ होत असते.

Essay on My Favourite Teacher goes viral
VIRAL: ६ वीतल्या विद्यार्थ्याचा निबंध वाचून शिक्षक कोमात; भूमिका मॅडमसाठी लिहिलेला निबंध होतोय तुफान व्हायरल
diy weight loss mantra work weight loss formula 3 8 3 benefits explained No food 3 hours before bedtime sleep for 8 hours and no solid food 3 hours after waking
वजन कमी करण्यासाठी उपाशी राहण्याची गरज नाही; फॉलो करा एक्सपर्टचा ३-८-३ फॉर्म्युला; वजन झटपट होईल कमी
Indian Diet and exercise Plan for Weight Loss How to start your weight loss journey as a beginner
वजन कमी करण्याची सुरुवात कशी करावी? काय खावे? कोणता व्यायाम करावा? जाणून घ्या तज्ज्ञांकडून
Weight-Loss-Tips
झटपट वजन कमी करायचयं; वापरा ‘ही’ वेगळी पद्धत, आठवड्यातच दिसेल फरक

अंजली मुखर्जी यांच्या माहितीनुसार तुम्ही रक्तगटानुसार आहार ठेवल्यास तुमचे वजन कमी होऊ शकते. तुमच्या रक्तगटानुसार तुमच्या शरीरात पोषण शोषून घेतले जाते यानुसार तुम्ही तणाव कसा हाताळता हे ठरते. मुखर्जी यांनी रक्तगटानुसार तुमचे वजन कमी करण्यासाठी कोणते पदार्थ अधिक अनुकूल आहेत, कोणत्या प्रकारचा व्यायाम तुम्हाला अधिक फायदेशीर ठरेल,हे सांगितले आहे. चला तर मग जाणून घेऊयात रक्तगटानुसार तुम्ही वजन कमी कसं करू शकता.

WebMD चे निसर्गोपचारतज्ज्ञ पीटर जे. डी’अॅडमो यांनी ‘रक्त गटानुसार आहार’ कसा असावा हे सांगितले आहे.

रक्तगटकाय खावे?काय खाऊ नये?
O रक्तगटप्रोटीनचे प्रमाण अधिक असणारा आहार ज्यात हलके मांस, अंडी, मासे भाज्या समाविष्ट असावेत.धान्य, कडधान्य व दुग्धजन्य पदार्थ टाळावेत
A रक्तगटफळे, भाज्या, बीन्स, शेंगा आणि धान्य, (शक्य असल्यास ऑरगॅनिक) यांचा समावेश असावामांसाहार टाळणे फायद्याचे ठरू शकते
B रक्तगटहिरव्या भाज्या, अंडी आणि कमी फॅट्स असणारे दुग्धजन्य पदार्थ आहारात समाविष्ट करू शकताकॉर्न, गहू, मसूर, टोमॅटो, शेंगदाणे आणि तीळ आणि काही प्रमाणात चिकन खाणे टाळायला हवे
AB रक्तगटटोफू (पनीर), सीफूड, दुग्धजन्य पदार्थ आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करावाकॅफिन, दारू आणि स्मोक्ड मांस टाळा.

हे ही वाचा<< तुमच्या वयानुसार तुमचे वजन किती हवे? आजारांना दूर ठेवा, परफेक्ट बॉडीसाठी ‘हा’ सोपा तक्ता पाहा

दरम्यान, फोर्टिस हॉस्पिटल आणि किडनी इन्स्टिट्यूट, कोलकाताचे आहारतज्ञ, सोहिनी बॅनर्जी, यांनी सांगितले की रक्तगटानुसार वजन कमी होते का हे सांगण्यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत, परंतु हा वजन कमी करण्यासाठी महत्त्वाचा रक्तगट एक मुख्य कारण आहे हे सांगणारी उदाहरणे खूप आहेत.

रक्तगट लठ्ठपणा आणि इतर अनेक प्रकारच्या आजारांशी संबंधित आहे. उदाहरणार्थ, O किंवा B रक्तगट असलेल्या महिलांना लठ्ठपणाचा धोका जास्त असतो. त्याचप्रमाणे, A रक्तगट असलेल्या लोकांना हृदयरोग, कर्करोग आणि मधुमेह होण्याची शक्यता असते. AB रक्तगट असलेल्या लोकांना ऍलर्जीचा त्रास होऊ शकतो.