गेल्या काही दिवसांपासून हवेतील प्रदूषणाचा स्तर फारच वाढला असून यामुळे अनेक आजारांचे प्रमाणही वाढू लागले आहे. यातीलच एक महत्त्वाचा आणि गंभीर आजार म्हणजे न्यूमोनिया. न्यूमोनिया हा बॅक्टेरिया स्ट्रेप्टोकोकस आणि न्यूमोकोकस, व्हायरस आणि मायकोप्लाझ्मा बुरशीमुळे होतो. यामध्ये फुप्फुसांना सूज आल्याने त्या भागामध्ये कफ जमा होतो. स्पंजसारखा नरम असणारा फुप्फुसाचा बाधित भाग घट्ट होतो आणि तो श्वसनक्रियेत भाग घेऊ शकत नाही. यानंतर रुग्णाला खोकला, ताप येऊ लागतो. फुप्फुसाचा बहुतांश भाग बाधित झाला असेल तर श्वास घेण्यास त्रास होऊन दम लागतो आणि रुग्णाची प्रकृती अत्यवस्थ होते आणि रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागते.

हा आजार जरी सामान्य वाटत असला तरीही हे देशातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. प्रतिकारशक्ती उत्तम असलेल्या व्यक्तींमध्ये न्यूमोनिया अनेकदा काही उपायांनी बराही होतो. मात्र वृद्ध व्यक्ती, लहान मुले तसेच इतर आजार असलेल्या व्यक्तींना न्यूमोनिया झाल्यास तो गंभीर होण्याची शक्यता वाढते. वृद्धांमध्ये प्रतिकारशक्ती कमी असल्याने तसेच सुरुवातीच्या काळात हा आजार लक्षात न आल्याने काही वेळा गुंतागुंत निर्माण होऊन रुग्णाचा मृत्यू होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे वेळीच या आजारावर उपचार सुरू करणे, आजार ओळखणे अतिशय गरजेचे आहे. न्यूमोनियाच्या प्रकारावरून त्याची लक्षणे बदलतात. पण या आजारामध्ये काही ठरावीक लक्षणे सर्वसाधारणपणे एखाद्या फ्लूसारखी असतात.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हिवाळ्यात सांधेदुखीच्या वेदनेने हैराण आहात? आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश ठरेल रामबाण उपाय

न्यूमोनिया आजाराची लक्षणे

  • ताप येणे
  • थंडी वाजणे
  • भूक न लागणे
  • खोकला येणे
  • दम लागणे
  • छातीत आणि पोटात दुखणे
  • अशक्तपणा जाणवणे

विषाणूजन्य न्यूमोनियाची प्रारंभीच्या काळातील लक्षणे फ्लूसारखी असतात. ताप, कोरडा खोकला, डोकेदुखी, अंगदुखी आणि अशक्तपणा. याशिवाय १२ ते ३६ तासांत रुग्णास श्वास घेण्यास अधिकाधिक अडचणी जाणवू लागतात. श्वसन अपुरे होते, कफ तीव्र होतो तसेच कफ पडतो. तापाची तीव्रता वाढते. श्वास घेणे कठीण होते आणि ओठ निळे पडतात. तुम्हालाही ही लक्षणे जाणवत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे या आजारावर लगेचच उपचार करणे अतिशय आवश्यक आहे.

प्रदूषणामुळे वाढतेय वंध्यत्वाची समस्या; केवळ पुरुषच नाही तर महिलांनाही बसतोय फटका; जाणून घ्या कसा

न्यूमोनिया होऊ नये यासाठी खालील गोष्टींची काळजी घ्यावी

  • शरीर सतत ओले ठेवू नये. त्यामुळे ताप येण्याची शक्यता असते. तुम्ही जर खूप वेळ पाण्यात राहात असाल तर पाण्यातून बाहेर आल्यावर संपूर्ण शरीर स्वच्छ आणि कोरडे करा आणि लगेचच कपडे बदला.
  • सर्दी होणार नाही याची खबरदारी घ्या. कारण शरीरातील कफ वाढला की न्यूमोनियाचा त्रास बळावण्याची दाट शक्यता असते.
  • दमा किंवा अस्थमाचा त्रास असलेल्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
  • हा संसर्गातून पसरणारा आजार असल्यामुळे स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे.
  • योग्य आणि पूरक आहाराचे सेवन करा. शरीराला सर्व जीवनसत्त्वे पुरेशा प्रमाणात मुबलक याची काळजी घ्या.
  • आइस्क्रीम, थंड पाणी इत्यादी थंड गोष्टी टाळा.