Does Really Cooking Time tell Pasta is Healthy on not : पास्ता हा कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ असू शकतो, जो प्रामुख्याने पीठ, लोणी आणि चीजपासून बनवला जातो; पण या स्वादिष्ट इटालियन पदार्थाचे जगभरात चाहते आहेत. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेकांना पास्ता आवडतो. अलीकडेच ऑनलाइन माध्यमांवर पास्ताच्या बनवण्याच्या वेळेवरून समज-गैरसमज पसरलेले दिसून आले. पास्ता बनवायला जास्त वेळ लागतो, त्यामुळे तो आरोग्यदायी असतो असे मत अनेकांनी सोशल मीडियावर मांडले. पण, हे खरंय का याविषयी द इंडियन एक्स्प्रेसनी तज्ज्ञांशी संवाद साधला आणि यामागील सत्य शोधून काढले.

चेन्नईतील प्रॅग्मॅटिक न्युट्रिशन येथील मुख्य न्युट्रिशनिस्ट मीनू बालाजी यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले, “पास्ता शिजण्यास जितका जास्त वेळ लागतो तितका तो कमी प्रक्रिया केलेला असतो, ही संकल्पना चुकीची आहे. जर असे असेल तर ताजा पास्ता सर्वात लवकर शिजतो. तसेच, जेव्हा तुम्ही जास्त आचेवर शिजवता तेव्हा पास्ता शिजण्यास जास्त वेळ लागतो, कारण पाणी हे नेहमी कमी तापमानात उकळते.”

काही प्रकारचे पास्ता शिजण्यास जास्त वेळ का लागतो?

बालाजी यांच्या मते, काही पास्ता शिजण्यास जास्त वेळ का लागतो यामागे वेगवेगळी कारणे आहेत.

१. जाडसरपी : रिगाटोनी किंवा फारफेले (rigatoni or farfelle) सारख्या काही प्रकारचे पास्ता इतरांपेक्षा शिजण्यास जास्त वेळ घेतात. या पास्तांवर त्यातील प्रोटिनचासुद्धा परिणाम होतो.

२. आकार : काही पास्तांचे आकार शेलच्या आकारासारखे असमान असतात आणि त्यामुळे त्यांना शिजण्यास जास्त वेळ लागतो.

३. पास्ता आणि पाण्याचे प्रमाण : लहान भांडे किंवा कमी पाण्याचे प्रमाण यामुळेसुद्धा पास्ता शिजवण्यास वेळ लागू शकतो.

अहमदाबाद येथील अपोलो हॉस्पिटल्सच्या क्लिनिकल आहारतज्ज्ञ माधवी सावनी सांगतात की, पास्ताचे सेवन करताना ते कशापासून तयार केलेले आहेत हे तपासणे महत्त्वाचे आहे.
“रिफाइंड गव्हाच्या पिठापासून बनवलेला पास्ता आणि पांढऱ्या प्युरीमध्ये बनवलेला पास्ता नियमित सेवन करू नये. अशा रिफाइंड पदार्थांचे नियमित सेवन केल्याने कालांतराने वजन वाढू शकते आणि पचनक्रिया बिघडू शकते,” असे त्या पुढे सांगतात.
जर तुम्हाला तुमच्या आहारात पास्ताचा समावेश करायचा असेल तर त्याऐवजी रवा वापरलेले पास्ताचे पर्याय निवडा.
त्यांच्या मते, हे तुलनेने पौष्टिक असते आणि बनवताना त्यात भाज्यांचा समावेश केला तर पौष्टिक गुणवत्ता आणखी वाढवता येते; यामुळे आहार अधिक संतुलित होण्यास मदत होते.

पास्ताचे आरोग्यदायी प्रकारसुद्धा मर्यादित प्रमाणात खावेत. “जर तुम्ही संतुलित आणि आरोग्यदायी आहार घेण्याचे ठरवले असेल तर महिन्यातून एकदा पास्ता खाणे हा एक उत्तम पर्याय आहे,” असे सावनी सांगतात. पास्ता खरेदी करताना त्यात असलेल्या घटकांची सुची काळजीपूर्वक वाचणेसुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे.

त्यांनी ४ ते ८ मिनिटांत शिजणाऱ्या इन्स्टंट पास्ताच्या प्रकारांचे सेवन टाळण्याचा सल्ला दिला, कारण असे पास्ता जास्त प्रक्रिया केलेले असतात आणि त्यात अनेकदा अतिरिक्त प्रिझरव्हेटिव्ह, आर्टिफिशियल फ्लेवर्स किंवा अनहेल्दी फॅट्स असतात, जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर नाही.

तुम्ही पास्ताची गुणवत्ता कशी ठरवता?

बालाजी यांनी काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत, ज्यामुळे तुम्ही उत्तम दर्जाचा पास्ता खात आहात की नाही हे तपासू शकता.

१. रंग : डुरम गव्हापासून (durum wheat) बनवलेला चांगल्या दर्जाचा पास्ता सहसा फिकट पिवळ्या रंगाचा असतो. जर तुम्ही ग्लुटेनमुक्त पर्याय निवडला तर पास्ताचा रंग त्यातील घटकांनुसार बदलू शकतो.

२. टेक्स्चर : एकसमान टेक्स्चर असलेला पास्ता लवकर शिजतो. काही पास्तांमध्ये खरबडीत टेक्स्चर असू शकते. यातून कळते की ब्रॉन्झ कट असेल तर सॉस चांगल्या प्रकारे शोषू शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“जर तुम्ही नियमितपणे पास्ता खात असाल तर घरी बनवलेला फ्रेश पास्ता फायदेशीर आहे. जर तुम्ही प्रक्रिया केलेला पास्ता निवडत असाल तर लेसिथिन, गम किंवा स्टार्चसारख्या फीलरचा समावेश नसलेले आणि कमी घटक असलेले पर्याय शोधा,” असे बालाजी सांगतात. लोकांना साध्या प्लेन सॉस पास्ताऐवजी भरपूर ताज्या भाज्या आणि चिकन पास्ता सॅलेडसारखे प्रोटिन्सचे स्रोत घेण्यास प्रोत्साहित करा.