How To Perform CPR During Heart Attack: दरवर्षीं जगभरात हृदयविकारामुळे अनेकजण जीव गमावतात. कालच बॉलिवूड अभिनेते सतीश कौशिक यांची ६६ व्या वर्षी कार्डियाक अरेस्टमुळे प्राणज्योत मालवली. काही हृदयविकाराचे झटके हे अत्यंत तीव्र व वेगवान असतात परिणामी हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचारासाठी सुद्धा वेळ हातात उरत नाही अशावेळी जर हार्ट अटॅकची चाहूल लागताच काही प्राथमिक उपचार केले गेले तर कदाचित प्राण वाचू शकतो. हृदय विकारावरील आजवर सर्वात प्रभावी सिद्ध झालेला उपचार म्हणजे सीपीआर (CPR) अर्थात कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन. जीव वाचवण्याचा हा नामी उपाय आपणही इतरांवर कसा करू शकता हे आज आपण शिकणार आहोत. खालील लेखात आपण कार्डियाक अरेस्ट म्हणजे काय, त्याची लक्षणे व सीपीआर कसा द्यायचा हे पाहणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कार्डियाक अरेस्ट म्हणजे काय? (What Is Cardiac Arrest)

अगदी सोप्या भाषेत, हृदयाची धडधड थांबते तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो. याचा अर्थ हृदय पंपाप्रमाणे काम करणे थांबवते, ज्यामुळे मेंदूला ऑक्सिजन मिळणे थांबते. जेव्हा असे होते, तेव्हा ती व्यक्ती बेशुद्ध होते आणि श्वास घेणे थांबते. तात्काळ सीपीआर न मिळाल्यास व्यक्तीचा मृत्यू होण्याची शक्यता असते.

डॉ मोहम्मद इम्रान सोहेरवर्दी, सल्लागार – आपत्कालीन औषध, एस्टर आरव्ही हॉस्पिटल यांच्या माहितीनुसार सीपीआर करताना छातीवर हलका दाब देऊन आतील बाजूस ढकलणे ही प्रक्रिया मुख्य असते. यामुळे आपण हृदयाला बाहेरून पंपिंग करण्यासाठी बळ देऊ शकतो. तसेच हाताच्या दबावाने रक्त व ऑक्सिजन शरीराभोवती व महत्त्वाचे म्हणजे मेंदूकडे ढकलले जाऊ शकते.

प्रौढांवर सीपीआर करण्यासाठी सोप्या स्टेप्स: (How To Perform CPR On Adults)

  • तुमचा हात त्या व्यक्तीच्या छातीच्या मध्यभागी असलेल्या छातीच्या हाडावर ठेवा. तुमची बोटे तुमच्या पहिल्या हाताने तुमच्या दुसऱ्या हाताने इंटरलॉक करा.
  • तुमचे खांदे तुमच्या हातांपेक्षा उंच आहेत याची खात्री करा.
  • तुमचे संपूर्ण वजन (फक्त तुमचे हात नाही) वापरून त्यांच्या छातीवर 5 ते 6cm (2 ते 2.5 इंच) दाबा.
  • कम्प्रेशन सोडा आणि छातीवर हात ठेवून छातीला त्याच्या नैसर्गिक स्थितीत परत येऊ द्या.
  • रुग्णवाहिका येईपर्यंत प्रत्येक मिनिटाला १०० ते १२० कॉम्प्रेशनच्या दराने पुनरावृत्ती करा
  • प्रत्येकी ३० कॉम्प्रेशनच्या दरम्यान दोन वेळा श्वास घ्या.
  • रुग्णाचे डोके हळूवारपणे मागे टेकवा आणि दोन बोटांनी हनुवटी उचला. व्यक्तीचे नाक चिमटीत पकडून तोंडात फुंकूर मारा. 1 सेकंदासाठी तुमचे तोंड त्यांच्या तोंडावर बंद करा. त्यांची छाती श्वास भरून घेत आहे याची खात्री करा. दोन बचाव श्वास घ्या. आणि दाब देणे कायम ठेवा.

हे ही वाचा<< जागीच जीव घेणारा हार्ट अटॅकचा सर्वात भयंकर प्रकार, ‘Widow Maker’, जाणून घ्या ‘ही’ प्रमुख लक्षणे

सीपीआर ही एक महत्त्वाची प्रथमोपचार प्रक्रिया आहे जी एखाद्या व्यक्तीचे आयुष्य वाचवू शकते. एखाद्याला हृदयविकाराचा झटका आल्यास किंवा अपघातामुळे किंवा आघातामुळे श्वासोच्छ्वास घेणे थांबल्यास ही प्रक्रिया वरदान ठरू शकते. वयानुसार या प्रक्रियेची तीव्रता बदलत असते. प्रौढ व्यक्तीने श्वास घेणे थांबवले असेल तरच CPR वापरा. CPR सुरू करण्यापूर्वी, ती व्यक्ती शाब्दिक किंवा शारीरिक उत्तेजनांना प्रतिसाद देते का ते तपासा. दरम्यान या स्टेप्स तुम्ही शक्य असल्यास पुन्हा एकदा वैद्यकीय तज्ज्ञांकडून प्रत्यक्ष शिकून घेणेही उत्तम ठरेल.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satish kaushik died of cardiac arrest how to perform cpr to save life by mouth to mouth if heart pumping breathing stops svs
First published on: 10-03-2023 at 12:21 IST