Heart-Health Tips for Women : ‘बिग बॉस १३’फेम लोकप्रिय अभिनेत्री शेफाली जरीवालाचं वयाच्या ४२ व्या वर्षी निधन झालं आहे. शेफालीला हृदयविकाराचा झटका आल्यावर रात्री तिला तातडीने मुंबईतील बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण त्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. २००२ मध्ये ‘कांटा लगा’ या गाण्यामुळे तिने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. शेफालीने ‘बिग बॉस १३’ या रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला होता. या शोमुळे तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. सध्या तिच्या निधनाने मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

हृदयाशी संबंधित आजार हे महिलांमध्ये मृत्यूचे प्रमुख कारण आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? पबमेड सेंट्रलमध्ये (PubMed Central) प्रकाशित केलेल्या २०१७ च्या अभ्यासानुसार, अमेरिकेत दर तीन महिलांपैकी एक महिला हृदयाशी संबंधित आजारामुळे मृत्युमुखी पडते. याशिवाय भारतातील महिलांमध्ये मृत्यूचे प्रमुख कारण हृदयरोग आहे, त्यामुळे महिलांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

हृदयविकार टाळण्यासाठी महिला आपल्या जीवनशैलीत बदल करू शकतात. हृदयरोग आणि हृदयविकारापासून सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येक महिलेनी या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे.

१. हृदयाशी संबंधित आजार हे महिलांमध्ये मृत्यूचे प्रमुख कारण आहे, पण अनेकांना अजूनही हा ‘पुरुषांचा आजार’ असल्याचे वाटते. हा गैरसमज दूर करण्याची वेळ आली आहे.

२. महिलांमध्ये हृदयविकाराची लक्षणे वेगळी असतात. हृदयविकाराचं प्रमुख लक्षण म्हणजे छातीत दुखणे होय. पण, महिलांना त्याऐवजी मळमळ, थकवा, चक्कर येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो, ज्यामुळे अनेकदा चुकीचे निदान होऊ शकते.

४. महिलांच्या धमन्यांमध्ये (arteries) प्लेक वेगवेगळ्या प्रकारे तयार होतो, ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजार शोधणे कठीण असते. काही स्टँडर्ड टेस्ट असतात, ज्या पुरुषांच्या हृदयाशी संबंधित आजारांवर आधारित असतात, ज्यामुळे महिलांच्या बाबतीत निदान चुकू शकते.

५. मानसिक तणाव आणि भावनिक आरोग्यामुळे महिलांना हृदयरोगाचा धोका जास्त असतो. एन्झायटी किंवा नैराश्यसारख्या समस्या हा धोका आणखी वाढवू शकतो. अनेकदा या घटकांकडे दुर्लक्ष केले जाते.

६. मासिक पाळी कायमची थांबल्यानंतर महिलांमध्ये हृदयाशी संबंधित आजाराचा धोका जास्त वाढतो. शरीरात इस्ट्रोजेनचे प्रमाण कमी झाल्यामुळे एक संरक्षण देणारी लेअर निघून जाते, ज्यामुळे उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते.

८. अनेकदा हृदयाशी संबंधित आजारांपासून सुटका मिळू शकते. हृदय-निरोगी राहील अशी जीवनशैली स्वीकारणे, नियमित आरोग्य तपासणी करणे आणि शरीराकडे नीट लक्ष दिल्याने तुम्ही निरोगी जीवन जगू शकता.

महिलांनी कोणती काळजी घ्यावी?

१. पौष्टिक आहार घ्यावा.

२. नियमित व्यायाम करावा.

३. तणाव मुक्त जीवनशैली स्वीकारावी.

४. धूम्रपान करणे टाळावे.

५. मद्यपान करणे टाळावे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

६. दीर्घकालीन आजार असतील, त्याविषयी काळजी घ्यावी.