वर्षा ऋतूमध्ये (पावसाळ्यात) येणार्‍या नारळी पौर्णिमा या सणाच्या दिवशी नारळी भात आणि गणेशचतुर्थी च्या दिवशी किंबहुना संपूर्ण गणेश उत्सवामध्ये मोदकांचा प्रसाद म्हणून आपण उपयोग करतो. पावसाळ्याच्या या दिवसांत त्यातही श्रावण महिन्यात नारळाचा अर्थात खोबर्‍याचा उपयोग मुबलक केला जातो. त्यामागे आरोग्याचा काय विचार आहे हे समजून घेऊ.

नारळ वातशामक आहे(…पुराणं वातनुत्‌। राजनिघण्टु) पावसाळ्यात प्रकुपित होणार्‍या वाताला व तत्संबंधित वातविकारांमध्ये खोबरे निश्चीत उपयुक्त सिद्ध होते.सांधे, हाडे, स्नायु, कंडरा नसा संबंधित विविध वातविकार होऊ नयेत किंवा झाले तर त्यांचा उपचार म्हणून खोबरे उपयोगी आहेच.त्यातही जे अशक्त,कृश व वातप्रकृतीचे आहेत त्यांना आवश्यक असणारी उर्जा ओल्या खोबर्‍यामधुन मुबलक म्हणजे ४४४ ग्रॅम इतकी मिळते, अर्थात पचायला जड खोबरे पचवण्या साठी अग्नी (भूक व पचनशक्ती) चांगली हवी.

mango face mask for summer
उन्हाळ्यात फळांचा राजा घेईल तुमच्या थकलेल्या चेहऱ्याची काळजी! पाहा घरगुती मँगो फेस मास्क DIY
Breakfast Recipe
Breakfast Recipe : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी बनवा मुगडाळीचा पौष्टिक नाश्ता, जाणून घ्या ही हटके रेसिपी
How To Save Electricity Bill Through Cooler
उन्हाळ्यात कुलरमुळे येणारं वीज बिल कमी करण्यासाठी कमाल जुगाड; प्लास्टिकच्या बाटलीचा ‘असा’ वापर करुन पाहा अन् पैसे वाचवा
How to soften your face with Malai Dry Skin Care
Skin Care: दुधाची २ चमचे साय घ्या आणि उन्हाने काळवंडलेल्या-निस्तेज चेहऱ्यावर करा जादू

पावसाळ्यात विविध वातविकारांने त्रस्त असणार्‍यांना हाडांना पोषण देणारा फॉस्फरस ओल्या खोबर्‍यामधून २४० मिलिग्रॅम इतका मिळतो. ओल्या खोबर्‍यामधुन कॅल्शियम कमी मिळते, मात्र सुक्या खोबर्‍यामधुन भरपूर (४००मिग्रॅ) मिळते.

आणखी वाचा: Health Special: ढगाळ वातावरणात खाणं का टाळावं?

नारळाला आयुर्वेदाने मांसप्रद सांगितले आहे (बलमांसप्रदं…..।सुश्रुतसंहिता १.४६.१८०) आणि प्रत्यक्षातही पावसाळयात कमजोर होणाऱ्या स्नायूंचे बल वाढवण्यासाठी नारळ उपयोगी पडतो, कारण ओले खोबरे ४.५% प्रथिने पुरवते.

पावसाळयात वाढणाऱ्या वाताच्या रुक्षत्वाला (कोरडेपणाला) कमी करण्यास आवश्यक स्नेह (चरबी) खोबरे शरीराला तब्बल ४१.६ ग्रॅम इतक्या प्रमाणात देते. खोबरेल तेलाचा उपयोग जेवण शिजवण्यासाठी करणार्‍यांना सहसा वातविकार त्रास देत नाहीत, यामागील महत्त्वाचे कारण त्यामधील वातविरोधी स्नेहाचे मुबलक प्रमाण हे आहे.

याशिवाय भारतीय ज्या समस्येने ग्रस्त आहेत, त्या एनिमिया या समस्येमध्ये शरीराला आवश्यक असणारे रक्तवर्धक लोह (iron) ओल्या खोबर्‍यामधून १.७ तर सुक्या खोबर्‍यामधून ७.८ मिग्रॅ इतके मिळते. एकंदर पाहता चवीला गोड असणारे खोबरे चांगलेच पौष्टिक आहे.

आणखी वाचा: Health Special: पावसाळ्यात कडधान्ये खावीत का?

ओले खोबरे शरीराला ३६.३ ग्रॅम इतका भरपूर ओलावा (moisture) पुरवते. हा गुण असला तरी तो ज्यांच्या शरीराला ओलाव्याची गरज आहे अशा कृश, सडसडीत, कोरड्या,वातप्रकृती शरीराच्या मंडळींना उपयुक्त सिद्ध होईल. अन्यथा अंगावर सूज असलेले, शरीरात पाण्याचे प्रमाण अधिक असणारे, स्थूल, जाडजूड शरीराचे असे कफप्रकृतीचे लोक असतात त्यांनी शरीरात ओलावा वाढवणारे पदार्थ टाळावे. त्यातही पावसाळ्याच्या आरंभी अर्थात प्रावृट्‌ ऋतुमध्ये शरीरातला ओलावा आधीच वाढलेला असताना ओल्या खोबर्‍याचे सेवन योग्य नाही. सर्वत्र ओलावा असताना शरीरात ओलसरपणा वाढवणारे पदार्थ टाळावेत किंवा मर्यादेत खावे. सुके खोबरे वापरायला हरकत नाही. कारण त्यामध्ये ओलाव्याचे प्रमाण केवळ ४.३ ग्रॅम असते. मात्र सुके खोबरे पचायला जड आहे हे विसरु नये. तसेही खोबरे ओले असो वा सुके पचायला जड असते. साहजिकच ज्यांचा अग्नी मंद आहे त्यांनी खोबरे टाळावे किंवा तारतम्याने खावे.

याच कारणासाठी पावसाळ्यात उशिराने म्हणजे श्रावणात नारळी पौर्णिमेला आणि भाद्रपदामध्ये गणेश चतुर्थीला नारळ खाण्याचे मार्गदर्शन भारतीय संस्कृतीने केले आहे.

खोबर्‍याचा एक दोषसुद्धा तुम्हा वाचकांना सांगितला पाहिजे. घशाला सूज असल्यामुळे जर तुम्हाला घशाला खवखव, घसादुखी, बोलण्यास त्रास,कोरडा खोकला किंवा श्वसनास त्रास वगैरे तक्रारींचा त्रास असेल तर तो त्रास खोबरे खाल्ल्यामुळे वाढू शकतो.त्यातही जे मुळातच या आजारांचे रुग्ण आहेत, त्यातल्या काही जणांना खोबरे खाल्ल्यानंतर वरील त्रास सुरु झाल्याचा अनुभव येतो. सहसा हा त्रास सुक्या खोबर्‍यामुळे होतो.त्यामुळे सुक्या खोबर्‍याची वडी, बर्फ़ी, चिक्की, सुके खोबर्‍याचे सारण घातलेल्या करंज्या असे पदार्थ अशा रुग्णांनी टाळावे.

(पोषण संदर्भ – Nutritive value of Indian foods)