आगामी चित्रपट ‘फतेह’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र असलेला अभिनेता सोनू सूद याने अलीकडेच त्याच्या फिटनेसचे रहस्य सांगितले. तो काटेकोरपणे त्याच्या आहाराचे पालन करतो. ‘जिस्ट’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याच्या आहाराची पद्धत सांगितली आणि त्याने चपाती खाणे पूर्णपणे सोडून दिल्याचे उघड केले. “मी शाकाहारी आहे. माझा आहार खूप कंटाळवाणा आहे. जेव्हा जेव्हा कोणी घरी येते तेव्हा ते मला म्हणतात, “मी हॉस्पिटलमध्ये दिले जाणारे जेवण खातो.” मी त्यांना सांगतो, “हा माझा आहार आहे. तुम्ही तुम्हाला जे हवे ते खा. माझ्याशिवाय सर्व जण मांसाहारी जेवण जेवतात. सर्वांसाठी चांगले जेवणन बनवले जाते. आमच्याकडे सर्वोत्तम स्वयंपाकी आहेत.”

तसेच तो म्हणाला, “मी शाळेत, कॉलेजमध्ये किंवा आताही कधीही आहारासाठी त्रास दिला नाही. अलीकडच्या काळात मी चपात्या खाणे बंद केले आहे. दुपारी मी एक छोटी वाटी डाळ आणि भात खातो. नाश्त्यामध्ये मी अंड्याच्मा पांढर्‍या भागाचे ऑम्लेट, सॅलड, ॲव्होकॅडो, परतलेल्या भाज्या किंवा पपई खातो. पण हो, मी निरोगी आहार खातो. मी माझ्या आहाराशिवाय इतर काहीच खात नाही. मी कधी कधी मक्याची रोटी खातो; पण फक्त एकदाच. पण सातत्य राखणे महत्त्वाचे आहे.”

MLA Rohit Pawar experienced sorghum harvesting farm karjat jamkhed
आमदार रोहित पवार यांनी शेतामध्ये घेतला ज्वारी काढणीचा अनुभव
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
How To Make Dahi Mirchi dahi mirchi recipe in Marathi
झणझणीत दही मिरची; दोन भाकऱ्या जास्त खाल या दह्यातल्या मिरचीसोबत, ही घ्या सोपी मराठी रेसिपी
नाशिक : पवननगरमध्ये जेसीबीच्या धक्क्याने गॅस गळती ( छायाचित्र - लोकसत्ता टीम )
नाशिक : पवननगरमध्ये जेसीबीच्या धक्क्याने गॅस गळती
nashik gas leakage latest news in marathi
नाशिक : पवननगरमध्ये जेसीबीच्या धक्क्याने गॅस गळती
PM Modi on obesity Cut oil in diet by 10 per cent
“आहारातून तेलाचे प्रमाण १० टक्क्यांनी कमी करा”: लठ्ठपणा कमी करण्यासाठी पंतप्रधान मोदींचा सल्ला! सामान्य भारतीयाला किती तेलाची आवश्यकता असते?
Safety demonstration at fuel storage depot in Miraj sangli news
मिरजेतील इंधन साठवण आगारात सुरक्षा प्रात्यक्षिक
india sugar production declines by 2 million tonnes
देशांतर्गत साखर उत्पादनात २० लाख टनांची घट; घट ४० लाख टनांवर जाण्याची भीती

अनेक भारतीय घरांमध्ये रोज बनवली जाणारी संपूर्ण गव्हाच्या पिठाची चपाती ही कार्बोहायड्रेट्सचा प्राथमिक स्रोत मानली जाते. पण जेव्हा असे मुख्य अन्न रोजच्या जेवणातून काढून टाकले जाते तेव्हा काय होते?

आहारातून चपाती वगळण्याचे संभाव्य फायदे किंवा तोटे (Potential benefits or drawbacks of eliminating chapatis from the diet)

क्लिनिकल डाएटिशियन डॉ. रिधिमा खामेसरा यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले, “तुमच्या आहारातून चपाती किंवा इतर कार्बोहायड्रेट्सयुक्त पदार्थ वगळल्याने सुरुवातीला काही फायदे मिळू शकतात. पहिल्या महिन्यात तुम्हाला पोटफुगी कमी होणे, चेहऱ्याचा आकार कमी होणे आणि अधिक हलके किंवा उत्साही वाटू शकते. पण, कालातंराने चपाती न खाण्याचे काही लक्षणीय तोटे जाणवू शकतात. कार्बोहायड्रेट्स हा शरीरासाठी मेंदूसह ऊर्जेचा प्राथमिक स्रोत आहे आणि चांगल्या कार्यासाठी त्यांची आवश्यकता असते.”

खामेसरा सांगतात,”पुरेशा बाह्य कार्बोहायड्रेट स्रोतांशिवाय शरीर ऊर्जा मिळविण्यासाठी प्रथिनांचा वापर करण्यास सुरुवात करते; ज्यामुळे फॅट्स कमी होण्याऐवजी स्नायूंचे बल कमी होते. त्यामुळे चयापचय मंदावते ज्यामुळे वजन कमी होते. त्याशिवाय चपातीसारख्या स्रोतांमधून योग्य फायबरचे सेवन न केल्याने पचनाच्या समस्या उद्भवू शकतात, ज्यामध्ये आतड्यांची हालचाल खराब होणे समाविष्ट आहे. “

हेही वाचा – हिवाळ्यात एक-दोन आठवडे आणि एक महिना सूर्यप्रकाशापासून दूर राहिल्यास काय होईल? तज्ज्ञांनी केला खुलासा…

रक्तातील साखरेच्या पातळीवर आणि एकूण आरोग्यावर परिणाम (Impact on blood sugar levels and overall health)

कार्बोहायड्रेट्सचे सेवन कमी केल्याने रक्तातील साखरेची पातळी आणि एकूण आरोग्यावर अनेक प्रकारे परिणाम होऊ शकतो. सुरुवातीला, चपाती बंद केल्याने रक्तातील साखर स्थिर होऊ शकते आणि इन्सुलिनची वाढ कमी होऊ शकते; विशेषतः इन्सुलिन प्रतिरोधकांसाठी (insulin resistance). पण, दीर्घकाळपर्यंत आहारातून कार्बोहायड्रेट्स काढून टाकल्याने ऊर्जा कमी होऊ शकते, ज्यामुळे काही व्यक्तींच्या मेंदूचे कार्य आणि एकाग्रता प्रभावित होऊ शकते. त्यामुळे आहार संतुलन राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण कार्बोहायड्रेट्सचे अत्यधिक प्रमाण कमी केल्याने फायदे होण्याऐवजी नुकसान जास्त होऊ शकते,” असे डॉ. खमेसरा म्हणतात.

हेही वाचा – तुम्ही रोज कच्चा कांदा खाल्ला तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात…

संतुलित आहार आणि पुरेसे पोषण कसे राखता येईल याची खात्री कोणी कशी करू शकेल?

चपाती वगळताना संतुलित आहार राखण्यासाठी विचारपूर्वक नियोजन करणे आवश्यक आहे. तुमच्या जेवणात आवश्यक सूक्ष्म पोषक घटकांसह सर्व मॅक्रोन्यूट्रिएंट्स – प्रथिने, फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्स – समाविष्ट करा. फॅट डाएट्स बहुतेकदा अल्पकालीन परिणामांवर लक्ष केंद्रित करतात; परंतु ते टिकाऊ नसतात. त्याऐवजी खालील गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, असे डॉ. खमेसरा यांनी सुचवले आहे :

  • कार्बोहायड्रेट्स, प्रथिने आणि निरोगी फॅट्स यांचे पर्यायी स्रोत असलेले संतुलित आहार करणे.
  • नियमित व्यायामाचा (दररोज किमान ३०-४५ मिनिटे) समावेश करणे.
  • पुरेशी झोप आणि हायड्रेशन सुनिश्चित करणे.
  • शेवटी प्रत्येक व्यक्तीचे शरीर वेगळे असते आणि सर्वांसाठी एकसारखे दृष्टिकोन क्वचितच काम करतात. दीर्घकालीन आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठी शाश्वत जीवनशैलीतील बदल महत्त्वाचे आहेत.

(टीप : हा लेख सार्वजनिक डोमेन आणि / किंवा तज्ज्ञांकडून मिळालेल्या माहितीवर आधारित आहे. परंतु, आहाराच्या बाबतीतील कोणताही
दिनक्रम सुरू करण्यापूर्वी नेहमीच तुमच्या आरोग्य व्यावसायिकाचा सल्ला घ्या.)

Story img Loader