Swelling In Legs Cause Heart Issue: खरंतर अनेक कारणांमुळे तुमच्या पायाला सूज येऊ शकते. पण, याकडे लक्ष न दिल्यास यामुळे आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. तुमच्या पायांना सूज येणे हे थेट हृदयाशी संबंधित असू शकते. कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर ही दीर्घकालीन स्थिती आहे. जेव्हा तुमचे हृदय शरीराला आवश्यक तेवढे पुरेसे रक्त पंप करू शकत नाही तेव्हा असे होते. लक्षात घ्या, तुमचे हृदय बंद पडत नाही पण ते आवश्यक प्रमाणात रक्त पंप करू शकत नसल्यामुळे तुमच्या शरीराच्या इतर भागांमध्ये रक्त जमा होते. कालांतराने तुमच्या फुफ्फुसात आणि पायांमध्ये रक्त आणि द्रव जमा होतात.

जेव्हा कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर होते, तुमच्या हृदयाच्या खालच्या कप्प्यांमध्ये रक्त योग्यरित्या पंप होत नसल्याने, तुमचे पाय, घोटे आणि पायांमधील नसांमध्ये रक्त प्रवाह मंदावतो आणि साचून राहतो. यामुळे शरीराच्या ऊतींमध्ये जास्त द्रव अडकल्यामुळे सूज येते.या परिस्थितीला पेरिफेरल एडीमा असेही म्हणतात.

व्हेरीवेल हेल्थच्या मते, या परिस्थितीला पेरिफेरल एडीमाच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये खालील गोष्टी आढळून येऊ शकतात.

  • तुमचे पाय जड वाटू शकतात
  • तुमचे पाय विशेषतः पोटऱ्या सुजलेल्या दिसू शकतात
  • सुजलेल्या त्वचेला दाबल्याने ठसे उमटतात किंवा त्वचा आत दाबली जाते.
  • तुमचे मोजे, लेगिंग किंवा पँट घट्ट होऊ शकतात
  • तुमची त्वचा सतत गरम वाटू शकते
  • तुमचे घोटे, बोटे किंवा पाय कमी लवचिक होऊ शकतात.

हे ही वाचा<< दुधातील भेसळ ओळखण्यासाठी FSSAI ने सांगितली योग्य पद्धत; उकळून बॅक्टेरिया नष्ट होतात का, जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरमुळे पोटाच्या खालच्या भागात सूज येऊ शकते आणि तुम्हाला काही प्रमाणात वजन वाढू शकते. यामुळे फुफ्फुसांमध्ये द्रव तयार होऊ शकतो ज्यामुळे श्वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो. एडीमाच्या मागे एकच कारण असू शकत नाही, म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या पायांमध्ये सतत सूज येत असेल तर तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करणे उत्तम ठरेल.